आपल्या भारतात बघयला गेले बरेच चांगले सिंगर व रॅपर आहेत ज्यांनी लोकांना त्यांच्या धमाकेदार गाण्यांनी ठेका घेण्यास भाग पाडले आहे. या सुप्रसिद्ध सिंगर पैकी एकाचे नाव म्हणजे यो यो हनी सिंग ज्याने ब्राऊन रंग ब्लू आयज डोप शोप लूंगी डांस चार बोतल वोडका देसी कलाकार अंग्रेजी बीट सारख्या एकापेक्षा एक गाण्यांना स्वताचे संगीत दिले आहे. ही गाणी केवळ देशातच नाही तर जगभरातील लोकांनाही डान्स करण्यास भाग पाडतात. या गाण्याचे संगीत हे हॉलीवूड च्या दर्जाचे आहे.
या गाण्यांमुळे हनी सिंगला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. जरी बऱ्याच लोकांना यो यो हनी सिंगबद्दल सर्व काही माहित आहे पण त्याच्या पर्सनल आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. खरे तर तुम्हाला माहिती असेलच का की हनी सिंग विवाहित आहे आणि त्याची पत्नी ही त्याची शाळेच्या वेळेची मैत्रीण आहे. चला आज आम्ही तुम्हाला हनी सिंग च्या पत्नीविषयी सांगणार आहोत.
हनी सिंगच्या पत्नीबद्दल सांगयचे झाले तर हनी सिंगची पत्नी दिसयला खूपच सुंदर आहे. हनी सिंगच्या पत्नीचे नाव शालिनी तलवार असे आहे. तर शालिनी ही प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक यो यो हनी सिंगची पत्नी आहे हे आपणास कळले. हनी सिंग आणि शालिनी यांनी एकत्र आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते इतकेच नाही तर ते दोघेही त्यांच्या शाळेच्या दिवसापासून एकमेकांना पसंत करत होते आणि एकमेकांना डेट देखील ते करत होते.
शालेय शिक्षण पूर्ण करून हनी सिंग युकेला गेला होता परंतु ब्रिटन मध्ये गेल्यानंतरही हनी सिंग शालिनीला विसरू शकत नव्हता जेव्हा हनी सिंग प्रसिद्ध झाला आणि देशभरात त्याला लोकप्रियता मिळाल्यावर तो शालिनीला भेटायला आला. जेव्हा हनी शालिनीला भेटला त्यावेळी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
परंतु हनी सिंगने आपले लग्न जगापासून खूप वर्ष लपवून ठेवले कारण आपल्या लग्नाच्या बातमीबद्दल इतक्या लवकर कोणालाही कळावे अशी त्याची इच्छा नव्हती कारण त्याकाळी मुलींमध्ये असणारी हनी सिंगची लोकप्रियता कमी होईल असे त्याला वाटत होते.
यो यो हनी सिंग आणि शालिनी यांचे लग्न २३ जानेवारी २०११ रोजी दिल्लीमध्ये त्यांनी लग्न केले होते. शालिनी दिल्लीच्या पंजाबी कुटुंबातील असून दोघांचे शीख परंपरेने लग्न झाले होते आणि दोघांच्या लग्नाचे सर्व विधी दिल्लीतील सरोजिनी नगरच्या पवित्र गुरुद्वारामध्ये करण्यात आले होते. हनी सिंगने आपल्या इंडियन रॉक स्टार शो दरम्यान पहिल्यांदा आपल्या पत्नीला पूर्ण जगा समोर समोर आणले होते.
हनी सिंगने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की त्याची पत्नी शालिनीला त्याची गाणी अजिबात आवडत नाहीत तो म्हणाला की शालिनीला माझी गाणी अजिबात आवडत नाहीत मला असे वाटते की ती माझी गाणी आवडून घेत नाही पण शालिनी प्रत्येक नवीन गणाच्या प्रोजेक्ट वेळी मला पूर्ण साथ देते. शालिनीला बहुतेक रो मँटिक गाणी ऐकायला आवडतात जे मी अद्याप करू शकलो नाही.
जर आपण पहिले तर हनीसिंगची पत्नी खूपच सुंदर दिसते तिच्या सौंदर्यासमोर अगदी बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्रीही फिक्या दिसतात. याचा अंदाज तुम्ही तीचे हे फोटोज बघून लावू शकता.
एक सुप्रसिद्ध सिंगर हनी सिंग याने आपल्या रॅ प गाण्यांनी स्वताचा प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. सलग सुपरहि*ट गाणी देणारा हनी सिंग अचानक गायब झाला होता. आता एका वर्षापूर्वी आलेल्या मखना गाण्यातून त्यानं पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. या नव्या गाण्याला युट्यूब वर फक्त पाच दिवसांत तब्बल ६ कोटी ८लाख व्ह्यूज मिळाले होते.
या गाण्यासाठी त्याने स्वत:चा लूक पूर्णपणे बदललेला आहे. त्याने केस आणि दाढी वाढवली होती. गळ्यात गोल्डन रंगाची जाडजूड साखळी घातली होती. या गाण्यातील मखना हा शब्द देखील चांगलाच गाजला.