Breaking News

अभिनेत्री वर्षा उसगावकरची बहिण आहे तिच्यापेक्षाही सुंदर आणि ग्लॅमरस, फिल्म इंडस्ट्रीपासून दूर करते हे काम..

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकरने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगले नाव कमावले होते. वर्षा उसगावकरने १९८२ मध्ये ब्राम्हचारी या नाटकामधून आपल्या फिल्मी करियरची सुरवात केले होती.

गंमत जंमत, हमाल दे धमाल, लपंडाव, भुताचा भाऊ अशा हिट मराठी चित्रपटांमधून तिने खूपच लोकप्रियता मिळवली. २८ फेब्रुवारी १९६८ रोजी मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकरचा जन्म गोव्यामध्ये झाला होता.

मराठी चित्रपटांमधून लोकप्रियता मिळवल्यानंतर तिने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. वर्षाने परवाने, तिरंगा, हस्ती, दूध का कर्ज, घर आया मेरा परदेसी सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा कामा केले आहे.

पण मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जितके यश तिने मिळवले तितके यश ती हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिळवू शकली नाही.

१९८८ मध्ये छोट्या पडद्यावर प्रसारित होणारी महाभारत मालिका तर तुम्हाला चांगलीच माहिती असेल. या मालिकेमध्ये वर्षा उसगावकरने अभिमन्यूची पत्नी उत्तराची भूमिका साकारली होती.

त्याचबरोबर चंद्रकांत या प्रसिद्ध लोकप्रिय सिरीयलमध्ये सुद्धा तिने काम केले आहे. या सिरीयलमध्ये तिने रूपमतीची व्यक्तिरेखा साकारली आहे. वर्षाला अभिनयासोबतच गायनाची देखील खूप आवड आहे.

अनेक ठिकाणी तिने आपली हि कला सादर केली आहे. विशेष म्हणजे तिच्या कोकणी अल्बमला देखील खूपच प्रसिद्ध मिळाली आहे. २००० मध्ये वर्षाने अजय शर्मासोबत लग्न केले होते. अजय शर्मा हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रविशंकर यांचा मुलगा आहेत.

वर्षा उसगावकरचे वडील हे गोव्यातील महाराष्ट्रवादी गोवंतक पार्टीचे नेते असून त्यांचे नाव अच्युत उसगावकर असे आहे. वर्षाला दोन बहिणी असून त्यांची नावे तोषा कुराडे आणि मनीषा तारकर अशी आहेत.

गोव्यामध्ये तोषा कुराडे यांचे डॉ तोषाज लॅबोरेटरी अँड मेडिकल सेंटर आहे. तोषा या पेशाने डॉक्टर आहेत आणि त्या दिसायला आपली बहिण वर्षासारख्याच सुंदर आहेत.

तर वर्षाची दुसरी बहिण मनीषा तारकर हि एक बिजनेस वूमन आहे. गोव्यामधील प्रसिद्ध माईनस्केप मिनरल्स, तारकर ब्रदर्स अशा अनेक नामवंत कंपन्यांचा त्या स्वतः कारभार व्यवस्थितपणे चालवतात.

About admin

Check Also

“लगिर झालं जी” फेम नितीश चव्हाण म्हणजेच आपला लाडका फौजी आज्या, आहे या मराठमोळ्या अभिनेत्रींच्या प्रेमात….

लागीर झालं जी या फौजीच्या व त्याच्या परिवाराच्या जीवनावर आधारित असेलेल्या मालिकेला आज कोण ओळखत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *