मुंबईमध्ये नुकताच ६४ वा फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यात अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अक्षय कुमार स्टारर फिल्म केसरीला जेवढी प्रसिद्धी मिळाली तितकीच या चित्रपटातील गान्यांचे देखील कौतुक झाले. केसरी चित्रपटाचे तेरी मिट्टी में मिल जावां हे देशभक्तीवर असलेले गाणे लोकांना फार आवडले.
गेल्या वर्षी 2019 मध्ये हे गाणे केवळ सर्वोत्कृष्ट अल्बम गाण्यांमध्येच नव्हे तर वर्षाच्या सर्वोत्कृष्ट ट्रॅकमध्ये समाविष्ट केले गेले होते. पण फिल्मफेअरमध्ये या गाण्याला पुरस्कार न मिळाल्याने दुखावले गेलेले गीतकार मनोज मुंताशिर यांनी या पुरस्कार सोहळ्याचा कायमचा निरोप घेतला आहे.
तेरी मिट्टीचे गीतकार मनोज मुंटाशीर यांनी ट्विटद्वारे या अवॉर्ड शो ला कायमचे बॉयकॉट केले आहे. त्यांनी लिहिले- जर मी पुढे माझ्या संपूर्ण आयुष्यात पुन्हा प्रयत्न केला तरीतू कहती थी तेरा चांद हूं मैं और चांद हमेशा रहता है यापेक्षा मी चांगली ओळ लिहू शकणार नाही.
कोट्यावधी भारतीयांना त्यांच्या मातृभूमीबद्दल प्रेम आणि चिंता निर्माण करणारे या शब्दांना तुम्ही सम्मान देवू शकला नाही. म्हणून आज मी तुम्हाला निरोप देतो.
माझ्या ऑफिशियली अनाउंस करतो कि मी मरेपर्यंत कोणत्याही पुरस्कार कार्यक्रमात जाणार नाही अशी मी अधिकृत घोषणा करत आहे. बाय.
आम्ही तुम्हाला सांगतो की फिल्मफेअर अवॉर्ड मधील सर्वोत्कृष्ट बेस्ट लिरिसिस्ट कैटेगरी प्रकारातील अपना टाइम आएगा या गाण्यासाठी डिवाइन आणि अंकुर तिवारी यांना आणितुझे कितना चाहने लगे या गाण्यासाठी मिथुन बेख्याली गाण्यासाठी इरशाद कामिल आणि तेरी मिट्टी या गाण्यासाठी मनोज मुंतशिर यांना नामांकन देण्यात आले होते.
डिवाइन आणि अंकुर तिवारी यांना गली बॉयच्या अपना टाइम आएगा या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार देण्यात आला. यामुळेच मनोजने अवॉर्ड शोला कायमचा निरोप दिला आहे.
याआधी या हिट गाण्यांच्या लिरिक्स साठी त्यांना पुरस्कार मिळाला आहे:-
मनोज मुंताशिर यांनी एक विल्लन या चित्रपटातील गलियां रुस्तम मधील तेरे संग यारा एमएस धोनी मधील कौन तुझे यूं प्यार करेगा सारख्या सुपरहिट गाण्यांचे गीत त्यांनी लिहिले आहे.
एक विल्लन साठी त्यांनालिसनर्स च्वॉइस एल्बम ऑफ द ईयर अवॉर्ड देण्यात आला आहे. याशिवाय त्यांना गलियां साठी सर्वोत्कृष्ट गीत पुरस्कार आणि तेरे संग यारा यासाठी आयफा ,
पुरस्कार, इंडियन टेली अवॉर्ड्स हंगामा सर्फर्स चॉईस अवॉर्ड रेडिओ मिर्ची म्युझिक अवॉर्ड उत्तर प्रदेश गौरव सन्मान असे अनेक पुरस्कार त्यांना याआधी देण्यात आले आहेत.
या पुरस्कार सोहळ्यात रणवीर सिंग आलिया भटच्या गली बॉय चा दबदबा पाहायला मिळाला. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
गली बॉय ने तब्बल 10 पुरस्कार पटकावत या सोहळ्यात बाजी मारली. मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष हिनेही 65व्या फिल्मफेअर पुरस्कारावर नाव कोरले.
Good bye Awards..!!! pic.twitter.com/iaZm0za40u
— Manoj Muntashir (@manojmuntashir) February 15, 2020