मनोरंजन विश्वात काम करणार्‍या ह्या अभिनेत्रींनां लग्न करायचे नाही, सात फेरे न घेताच बॉयफ्रेंड सोबत जगत आहेत आनंदाचे आयुष्य..

Bollywood Entertenment

टी. व्ही वरती मालिकांमध्ये सून म्हणून काम करणार्‍या अभिनेत्री कदाचित खूप सभ्य आणि सुशील दिसत असतील, परंतु खर्‍या आयुष्यात त्या खूप बिनधास्त व निर्धास्त जीवन जगत असतात. हल्ली लग्नाआधीच  जोडीदाराबरोबर राहणाऱ्याला “लिव्ह इन रिलेशनशिप” असे म्हणतात. तुम्हाला माहीतच आहे, आजकाल ह्या पद्धतीचा एक नवीनच ट्रेंड झाला आहे. आता समाजात असे कितीतरी लोक आहेत, जे कोणाचाही विचार न करता, न भिता आपल्या जोडीदाराबरोबर लग्नाआधी एकत्र राहतात.

श्रीमंत वर्गीय लोकांमध्ये ही गोष्ट आता अगदी सामान्य झाली आहे. लिव्ह-इनच्या विरोधात फक्त बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबे आहेत. तसे बघितले तर लिव्ह-इनमध्ये रहाण्यात खरे तर काही चुकीचे नाही, असा उच्च वर्गातील लोकांचे ठाम मत आहे. त्यांच्या मते, असे राहिल्यामुळे आपण आधीच आपल्या होणार्‍या जोडीदाराबद्दल बरेच काही समजून घेऊ शकतो.

परदेशात हे खूप आधीपासूनच आहे, पण आपल्या भारतात  आता लीव्ह-इनची परंपरा प्रचलित होत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत हे चालूच आहे, पण त्याचबरोबर काही टीव्ही अभिनेते/ अभिनेत्री लिव्ह इनमध्ये राहत आहेत. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला टी.व्ही इंडस्ट्रीत काम करणार्‍या  अशा काही प्रसिद्ध अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्या लग्न न करता आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न न करताच आयुष्य मजेत जगत आहेत.

शिवांगी जोशी:- शिवांगी जोशी ही “स्टार प्लस” वरील “ये रिश्ता क्या कहलाता है” या मालिकेमध्ये  दिसली आहे. यामध्ये तिची व्यक्तिरेखेचे नाव आहे “नायरा”.  २० वर्षे वयाची शिवांगी दिसायला खूपच सुंदर व आकर्षक आहे आणि इतक्या लहान वयात ती टीव्ही वरील  एक अव्वल अभिनेत्री बनली आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इछितो, की शिवांगी आजकाल आपला को-स्टार मोहसिन खानला डेट करते आहे. जातपात न मानता त्यांनी ही जातीची भिंत तोडून एकमेकांना जीवनसाथी बनविण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो आहोत, की ते दोघेही लिव्ह-इन मध्ये राहत आहेत.

हिना खान:- बिगबॉस रीयालिटि शो ९ मध्ये दिसलेली हिना खान हीचे सुद्धा टीव्ही मालिकांमध्ये मोठे नाव आहे. स्टार प्लस चॅनलवरील “ये रिश्ता क्या कहलाता है” या मालिकेतून हिना खान प्रसिद्ध झाली. तिच्या मालिकेला लोकप्रियता मिळाली. या मालिकेनंतरच ती प्रत्येक घरात “अक्षरा” या तिच्या व्यक्तिरेखेमुळे  ओळखली जाऊ लागली.

तुमच्या माहितीसाठी, बिगबॉस शोच्या वेळी असे समजले की हिनाला एक बॉयफ्रेंड आहे आणि त्याचे नाव  रॉकी जैस्वाल असे आहे. बऱ्याच दिवसांच्या प्रेमप्रकरणांनंतर हिना तिच्या प्रियकराबरोबर म्हणजेच  रॉकीबरोबर मुंबईत लिव्ह-इनमध्ये राहत आहे.

सुरभी ज्योति:- सुरभी ज्योती ही देखील छोट्या पडद्यावरील एक उत्तम अभिनेत्री आहे. तिला आपण  “नागीन ३”  मध्ये पाहिले असेल. मूलतः पंजाबी असलेल्या व पंजाबमध्ये जन्मलेल्या सुरभीने आपल्या करिअरची सुरुवात प्रथम पंजाबी चित्रपटांमधून केली होती. यानंतर ती टीव्ही मालिकांमध्ये आली. ती प्रथम आपल्याला दिसली ती “कबुल है” या मालिकेमध्ये.

त्या मालिकेत तिने “झोया” ही व्यक्तिरेखा साकार केली होती. ती तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली. आम्ही सांगू इछितो, की सुरभी आजकाल टीव्ही माध्यमापासून दूर राहून वरुण तुर्कीला डेट करीत आहे आणि ती दोघे एकत्र वेळ घालवीत आहेत. जर आपल्या सूत्रांकडून समजलेल्या माहितीवर विश्वास ठेवला, तर असे समजते की ते दोघेही मिडीयापासून नेहमी दूर राहातात आणि सध्या ते लिव्ह-इन मध्ये  एकत्र राहत आहेत.

अदिती राठोड:- अदिती राठोड ही एक टीव्ही जगातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आता तुम्हाला ती कोणत्याच शोमध्ये काम करताना दिसणार नाही, पण 2020 मध्ये ती नामकरण सिझन 2 पासून परत येऊ शकते.  आता अदिती तिचा मुस्लिम प्रेमी जैन इमामला डेट करते आहे आणि एका मुलाखतीत तिने नमूद केले की, योग्य वेळ आली, की ती लग्न बंधनात अडकणार आहे. पण सध्या तरी ती दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत आहेत आणि त्यांचे आयुष्य एकमेकांबरोबर सुखाने जगत आहेत.

 

ईशा सिंग:- झी टीव्ही वरील लोकप्रिय कार्यक्रम “इश्क सुभान अल्लाह” यामध्ये ईशा सिंग दिसली आहे. ती तिच्या “झारा सिद्दीकी” ह्या व्यक्तिरेखेमुळे घराघरात प्रसिद्ध झाली आहे. तुमच्या माहितीसाठी सध्या ईशा तिचा को-स्टार अदनान खानला डेट करीत आहे आणि लवकरच त्या दोघांच्या लग्नाची बातमी येऊ शकते. मीडियाच्या अहवालानुसार दोघेही लिव्ह-इन मध्ये एका घरात एकत्र राहतात