चाणक्य नीती : ह्या 8 गोष्टी तरुणांनी शक्य तितक्या लवकर टाळाव्यात, नाहीतर पश्चाताप…

Astrology Daily News

आचार्य चाणक्य यांनी आपल्या अनुभवांमधून साचलेले ज्ञान सर्व वयोगटातील सर्व वर्गातील लोकांना सादर केले आहे. चाणक्य यांनी तरुणांसाठी या 8 खास गोष्टी सांगितल्या आहेत ज्या त्यांनी टाळल्या पाहिजेत. आचार्य चाणक्य म्हणतात की जास्त मनोरंजन विद्यार्थ्यांसाठी हानिकारक ठरू शकते. म्हणून आवश्यक तेवढेच मनोरंजन केले पाहिजे.

कोणत्याही देशातील तरुण ही त्या देशाची खरी शक्ती असतात. युवाशक्ती ही समाज आणि देशाचा कणा आहे. तरुणच देशाला नवीन शिखरावर नेवू शकतात. हे लक्षात घेऊन चाणक्य यांनी तरुणांसाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तरुणांनी टाळल्या पाहिजेत. युवा हे देशातील संस्कृती आणि वारसा यांचे रक्षक असतात. चाणक्यने कोणत्या 8 गोष्टींपासून तरुणांना चेतावणी दिली आहे ते जाणून घेवूया आणि अशा  गोष्टीपासून दूर राह्वूया.

१. का मवासना:- चाणक्य म्हणतात की देशातील तरुणांनी काम वासनेपासून दूर राहावे. कारण जेव्हा जेव्हा तरुण या गोष्टींमध्ये अडकतो, तेव्हा तो लक्ष केंद्रित करू शकत नाही म्हणजेच अभ्यास करू शकत नाही किंवा त्याच्या आरोग्याकडेही लक्ष देऊ शकत नाही. यामुळे हळू हळू तो नाशाच्या काठावर जाऊ लागतो. हे एक्टीव  राहण्याचे वय आहे. म्हणून या वयामध्ये काम वासनेपासून दूर राहिले पाहिजे.

२. राग:- राग हा कोणत्याही मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो. आचार्य चाणक्य म्हणतात की एखाद्या व्यक्तीची विचारसरणी व समजण्याची शक्ती राग येताच नष्ट होते. म्हणून, तरुणांनी नेहमी राग टाळावा. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रागावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे.

राग हा आपल्या प्रगतीमधील सर्वांत मोठा अडथळा आहे. राग आल्यावर मानव एकाग्रता गमावून बसतो. त्यामुळे यशप्राप्ती होऊ शकत नाही. राग आल्यावर मानवी शरिरातील हार्मोन्स अनियंत्रित होतात. शरीराची लवचिकता कमी होते.

. लोभ :– स्वार्थ किंवा लोभ कोणत्याही माणसाचा नाश करू शकतो. तरूणांच्या अभ्यासाच्या मार्गात लोभ हा सर्वात मोठा अडथळा मानला जातो. म्हणून तरुणांनी कोणत्याही लोभापासून टाळावे.

म्हणून आचार्य चाणक्य सांगतात अति लोभ करू नये. प्रत्येकाशी गोड बोलावे आणि प्रेम द्यावे. द्वेष कराल तर तुमच्या हातात माणिक- मोती असतील तरी त्यांचे साप होतील. प्रेम कराल तर सापांचे सुद्धा हार बनतील पाखरेसुद्धा मानवांवर प्रेम करत असतात.

४. स्वाद:- चाणक्य म्हणतात की तरुण विद्यार्थ्याने स्वादिष्ट चवदार अन्नाची तल्लफ सोडून दिली पाहिजे आणि त्याऐवजी निरोगी संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरुणांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांनी संतुलित आहार घेणे फार महत्वाचे आहे. आणि असा संतुलित आहार अभ्यासाच्या मार्गात अडथळा आणणार नाही.

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे पाहायला अजिबात वेळ नाही. कारण मानवी जीवन यंत्र बनले आहे. बैठे काम व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहार. यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना काही ना काही आजाराने ग्रासले आहे त्यामुळे आज संतुलित आहार काळाची गरज बनली आहे.

५. श्रृंगार म्हणजेच मेकअपःतरुण विद्यार्थ्यांनी फॅशनपासून दूर रहावे. त्यांनी नेहमीच एक साधी जीवनशैली जगली पाहिजे. स्वच्छ रहा परंतु अधिक सजावट अतिरिक्त मेकअप तरुणांना अभ्यासापासून विचलित करू शकतो. म्हणूनच चाणक्य म्हणतात की अशा आभासी आणि नीरपोयोगी गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे.

६. मनोरंजन :- आचार्य चाणक्य म्हणतात की जास्त मनोरंजन विद्यार्थ्यांसाठी हानिकारक ठरू शकते. म्हणून आवश्यक तेवढेच मनोरंजन करावे. हल्ली च्या चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये मनोरंजनच्या नावाखाली भलतेच काही तरी दाखवले जात असते म्हणून विद्यार्थ्यांनी अशा चुकीच्या मनोरंजक गोष्टी पासून दूर राहावे.

७. झोप :- आवश्यक झोप आरोग्यासाठी चांगली आहे परंतु जास्त झोप घेणे आरोग्यासाठी आणि आपल्या जीवनासाठी हानिकारक आहे. जर तरुण जास्त काळ झोपायला लागले तर त्यांच्यात आळशीपणाचे  प्रमाण वाढते ज्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करण्यास कमी वेळ मिळतो. म्हणून आवश्यक तेवढीच झोप विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे.

८. सेवा:- आपल्याला माहिती आहे की सेवा करणे हे एक चांगले काम आहे, परंतु चाणक्याचे धोरण असे आहे की प्रत्येक सेवाकरांनी स्वताची काळजी घ्यावी. काही तरुण जास्त सेवेमध्ये स्वत: कडे लक्ष देत नाहीत, आणि त्यांचा मौल्यवान वेळ गमावून बसतात. चाणक्य म्हणतात की जो स्वताला विसरून इतरांची सेवा करतो तो शेवटी रिकामाच राहतो.