अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांनी एकत्र अनेक चित्रपट केले आहेत. असे बरेचदा घडते की सेटवर काम करणारे स्टार एकमेकांच्या जवळ येतात आणि या दोघांच्या बाबतीतही असेच घडले होते. जया बच्चन देखील त्यांच्या नात्याशी सहमत असल्याचे म्हटले जाते होते परंतु नंतर जया आणि राणीच्या नात्यात असा बदल झाला की त्याचा अभिषेकच्या नात्यावरही परिणाम झाला.
१. या कारणांमुळे झाला होता ब्रेकअप:- जया आपल्या हुशार स्वभावासाठी ओळखली जाते आणि तिचे आणि राणीचे नाते बिघडण्याचे हे एक मोठे कारण होते. दोघांनीही लागा चुनरी मे डाग या चित्रपटात एकत्र काम केले होते. सुरुवातीला सर्व काही ठीक होते परंतु नंतर त्यांच्यात प्रॉब्लेम येऊ लागले आणि परिस्थिती अशी बनली की त्यांनी एकमेकांशी बोलणेही बंद केले होते.
आमच्या माहितीनुसार जयाने सुरुवातीला राणीला बंगाली असल्यामुळे आपली सून बनवण्यास पसंद केले होते. परंतु चित्रपटाच्या रिलीजनंतर राणीचे कुटुंब बच्चन हाऊसमध्ये पोहोचल्यावर जयाने राणीसाठी काही गोष्टी करायला सांगितल्या ज्या गोष्टी मुखर्जी कुटुंबीयांना आवडल्या नाहीत आणि अखेर अभिषेकबरोबरचे त्यांचे नाते संपले.
२. जयाच्या या स्वभावाचा ना त्यांवर परिणाम:- असे म्हणतात की ऐश्वर्या रायसाठी जया जया एक कडक सासू आहे. यामुळे त्यांच्यात ट्यूनिंग कमी असल्याच्या बातम्या आहेत. बरेचदा असे दिसून येते की या जोडप्याचे नाते लग्नापर्यंत पोहोचत नाही कारण त्यांचे पालक त्याविरूद्ध असतात. जरी बहुतेक वडिलांना यासाठी जबाबदार धरले जाते परंतु सत्य हे आहे की या संपूर्ण गोष्टीमध्ये आईचीही मोठी भूमिका असते.
३.सासू आणि होणाऱ्या सूनेमधील नाते:- खरं तर जेव्हा आई आपल्या मुलासाठी सूनेची निवड करते तेव्हा तिचा मुलगा त्या मुलगीबरोबर खूष आहे का नाही हेच पाहत नाही तर कुटुंबातील गोष्टी आणि त्यांच्यामध्यल्या नात्याला त्या अधिक जोर देतात. जर त्यांना असे वाटले की आपले या सूनेशी जमणार नाही तर ती नाराजी आणि नापसंती व्यक्त करण्यास त्या अजिबात वेळ लावत नाहीत. अशा परिस्थितीतही लग्न झाले असेल तर नवऱ्याला नेहमीच सासू-सूनेच्या वादाला सामोरे जावे लागते.
ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांनी २० एप्रिल २००७ रोजी लग्न केले होते. धूमधडाक्यात पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला सिनेसृष्टीतील बरेच कलाकार उपस्थित होते. मात्र अभिनेत्री राणी मुखर्जी या लग्नात कुठेच दिसली नव्हती. त्यावेळी यावर बरीच चर्चासुद्धा झाली होती. राणीचे अभिषेकसोबतचे नाते आणि ऐश्वर्यासोबतचे भांडण या कारणांमुळे तिला लग्नाचं निमंत्रणच दिलं गेले नव्हते असे म्हटले जाते.
राणी म्हणाली मला लग्नाला का बोलावलं नाही याचं उत्तर अभिषेकच देऊ शकेल. खरंतर एखादा व्यक्ती जर तुम्हाला त्याच्या लग्नाला बोलावत नसेल तर तुमचं त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय स्थान आहे हे लगेच कळते. तुम्ही मैत्रीचा विचार करत बसता पण त्या व्यक्तीने तुम्हाला केवळ सहकलाकार म्हणून समजलेलं असतं.
मला त्याने काही फरक पडत नाही. त्या घटनेमुळे हे स्पष्ट झालं की आम्ही फक्त सहकलाकार होतो, मित्र नव्हतो आणि लग्नाला बोलावणं ही त्या व्यक्तीची वैयक्तिक निवड आहे. जेव्हा माझं लग्न होईल, तेव्हा मीसुद्धा निवडक लोकांनाच आमंत्रित करेन.