“कपड़े काढ, बघुदे तुझी बॉडी या रोलसाठी ठीक आहे की नाही?” ईशा अग्रवालने केला धक्कादायक खुलासा…

Bollywood

“जेव्हा मी माझ्या बहिणीसोबत त्याच्या  कार्यालयात पोहचले तेव्हा त्याने मला माझे कपडे काढण्यास सांगितले कारण त्याला  माझे शरीर बघायचे होते. मी या भूमिकेसाठी योग्य आहे की नाही? हे माझी शरीरयष्टी पाहूनच सांगेन, असे तिने सांगितले.

बॉलीवूडच्या चकचकीत दुनियेची काही रहस्ये आहेत जी उघड झाली आहेत पण बदललेली नाहीत. कास्टिंग काउच ही या ग्लॅमने भरलेल्या दुनियेची एक वस्तुस्थिती आहे, त्याच्या वे’दना अनेक अभिनेत्यांनी सहन केल्या आहेत. अनेकदा काही कलाकार कास्टिंग काउचशी सं’बंधित त्यांचे अनुभव शेअर करतात. आता ‘कहीं है मेरा प्यार’ अभिनेत्री ईशा अग्रवालनेही तिच्या कास्टिंग काउचची धक्कादायक कहाणी सांगितली आहे.

मिस ब्युटी टॉप ऑफ द वर्ल्ड 2019 चे विजेतेपद पटकावणाऱ्या ईशा अग्रवालने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत कास्टिंग काउचचा खुलासा केला आहे. ईशा अग्रवाल असे म्हणाली आहे की, “मनोरंजन जगतात माझा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. यामध्ये मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. लातूरसारख्या छोट्या शहरातून येऊन मुंबईच्या गल्लीबोळात नाव कमावणं हे एका आव्हानापेक्षा कमी नाही.

जेव्हा तुम्ही एका छोट्या शहरातून आलात, तेव्हा पहिली गोष्ट जी तुम्हाला मान्य नसते ती म्हणजे शोबिझमध्ये जाण्याची कल्पना, त्यामुळे हे एक मोठे आव्हान असते. पण कसेबसे मी स्वत:ला सिद्ध केले आहे आणि माझ्या आई-वडिलांना पटवले आणि माझे शिक्षण पूर्ण करून लवकरच मुंबई गाठली आणि काही दिवसांत ऑडिशन द्यायला सुरुवात केली.

ईशा अग्रवाल पुढे असे म्हणाली आहे की, “कास्टिंग काउच आजही खरे आहे. मी मुंबईत नवीन असताना एका कास्टिंग व्यक्तीने मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावले होते. जेव्हा मी माझ्या बहिणीसोबत त्यांच्या ऑफिसमध्ये पोहचली तेव्हा त्यांनी असे सांगितले की, त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांना कास्ट केले आहे आणि ते मला एक चांगला प्रोजेक्टही देतील.

अचानक त्याने मला माझे कपडे काढण्यास सांगितले कारण त्याला माझे शरीर पहायचे आहे. यामागचे कारण त्याने असे सांगितले होते की, तो या भूमिकेसाठी योग्य आहे की नाही हे माझे शरीर पाहूनच सांगेन. मी लगेच त्याची ऑफर नाकारली आणि बहिणीसोबत कार्यालयाच्या बाहेर पडले. त्याने मला बरेच दिवस मेसेज केले पण मी त्याला ब्लॉ’क केले.

ईशा अग्रवाल मुंबईत येणा-या लोकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सल्ला देते. ईशा अग्रवाल असे म्हणाली आहे की, “तुम्हाला असे बरेच लोक भेटतील जे म्हणतील की ते मोठ्या कास्टिंग कंपनीचे आहेत, त्यांच्यापासून दूर राहा. ते तुम्हाला अनेक ऑफर देतील, परंतु तुम्हाला हा सापळा टाळावा लागेल. नेहमी योग्य ते निवडा, जर तुमच्यात क्षमता असेल तर कोणतीही तडजोड न करता तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

नुकतेच दंगल फेम अभिनेत्री फातिमा सना शेख हिने यावर भाष्य केले आहे. एका मुलाखतीत फातिमाने कास्टिंग काउचवर मोठे वक्तव्य केले होते. फातिमा म्हणाली होती, “नक्कीच मी देखील कास्टिंग काउचची शि’कार झाली आहे. माझ्यासोबत असे अनेकवेळा घडले आहे, जेव्हा मला सांगितले गेले की मला काम हवे असेल तर मला से’क्स करावे लागेल. त्याचबरोबर माझे प्रकल्प इतर लोकांपर्यंतही पोहोचले कारण त्यांच्याकडे ओळखी संपर्क होते.