टेलीविजन वरील प्रसिद्ध मालिका बालिका वधू संपल्यानंतरही खूप चर्चेत होती. घराघरात ही मालिका पोचली होती. एक वेळ अशी होती की टेलीविजन वर रात्री आठ वाजता प्रत्येकाच्या घरी फक्त बालिका वधू ही मालिका लावली जात होती.
टीव्ही सीरियल बालिका वधूपासून प्रत्येक घरात लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री अविका गौर आता 23 वर्षांची झाली आहे. अविका गौरने केवळ 11 वर्षांची असतानाच सीरियलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पण काही काळापूर्वी तीचे एका अभिनेत्याशी प्रेमसं-बंध असल्याच्या जो की तिच्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे अशा बर्याच बातम्या समोर आल्या होत्या. अविकाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.
बालिका वधू या मालिकेद्वारे अविकाला लोकप्रियता मिळाली. यापूर्वी तिने राजकुमार आर्यन मेरी आवाज को मिल गई रोशनी कर्म अपना अपना अशा मालिकांमध्येही काम केले होते. २०११ मध्ये अविका देखील ससुराल सिमर का या मालिकेत दिसली होती. त्यावेळी अविकाने एका विवाहित महिलेची भूमिका केली होती. पण त्यावेळी ती केवळ 14 वर्षांची होती.
तिच्या पतीची भूमिका अभिनेता मनीष यांनी केली होती. मात्र यावेळी अविका आणि मनीषच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. त्यावेळी अविका फक्त 16 वर्षांची होती. मनीष रायसिंगानी 34 वर्षांचा होता. एका मुलाखतीत अविका म्हणाली की मी आणि मनीष चांगले मित्र आहोत आणि लोक काय म्हणत आहेत याची आम्हाला पर्वा नाही.
आमच्या दोघांबद्दल अशी बातमी येताच मी मानसिक आणि शारीरिकरित्या कमजोर होऊ लागले होते असे अविकाने सांगितले होते. यामुळे आम्ही एकमेकांशी बोलणेही बंद केले. परंतु तरीही आमच्या लिंकअपची बातमी थांबली नाही मग आम्ही फक्त दूरचे मित्र राहण्याचे ठरविले.
मालिकेतील संपूर्ण कास्ट खूप प्रभावी अशी निवडली गेली होती. या मालिकेने मनोरंजनातून भारतात प्रचलित असणाऱ्या बालविवाहासारख्या रूढीवादी प्रथेवर भाष्य केले. या मालिकेत तीन पिढ्या आहेत. पहिल्या पिढीमध्ये बालविवाहासारख्या जोडप्यामुळे दोन निष्पाप मुलांचे लग्न झाले आहे. आनंदी आणि जगीया अशी ती दोन मुलं. शोमध्ये आनंदीची भूमिका अविका गौरने केली होती.
२००८ मध्ये सुरु झालेली आणि सर्वांच्या मनात घर केलेली बालिका वधू मालिका चांगलीच गाजली. ही मालिका आता पुन्हा एकदा १२ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. लॉकडाऊनमुळे सध्या सुरु असलेल्या मालिकांचे शू टींग बंद असल्यामुळे जुन्या गाजलेल्या मालिका पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये आता बालिका वधू मालिका देखील सुरु झाली आहे.
अविका गौर 2017 पासून कोणत्याही मोठ्या मंचावर दिसली नाही. तसेच तीने कोणतीही मोठी मालिका केली नाही. शांत गोड दिसणारी आनंदी तिच्या वाढत्या वयानुसार दिवसेंदिवस खूप सुंदर दिसत आहे. अविका गौर आपले फोटोज सोशल मीडियावर नेहमी पोस्ट करत असते. अविका गौरला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती म्हणून तिने लहानपणापासूनच अभिनयाच्या जगात काम करण्यास सुरवात केली.
अविका गौरला २०१३ ला उय्यला जम्पला नावाच्या एका तेलगू चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी संधी देखील मिळाली होती. यानंतर देखील अविका गौर मुख्य भूमिकेत अजून काही चित्रपटांत दिसू लागली. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा दुसरा दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कारही तिला मिळाला आहे.