सुष्मिता सेनच्या वहिनीला पति सोबत त्या जिव्हाळ्याच्या फोटोवर बघून लोकांनी दिले होते विचित्र कमेंट,आत्ता मिळाले जबरदस्त उत्तर …

Bollywood Entertenment

टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील स्टार्स आजकाल त्यांच्या घरात कैद आहेत. हे स्टार्स आपल्या कुटुंबासमवेत त्यांचा वेळ घालवत आहेत. ते सोशल मीडियावर त्यांच्या दैनंदिन जीवनातील फोटो शेअर करताना दिसतात.

अशातच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची वहिनी चारु असोपा आणि भाऊ राजीव सेन यांचा एक इंटीमेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्या दोघांना ट्रोलही करण्यात आले होते. आता चारुने त्या फोटोंवरुन पतीसोबत भांडण झाल्याचे सांगितले आहे.

चारू असोपा म्हणाली की आम्ही दोघेही एकत्र घरी वेळ घालवत होतो. या फोटोंसाठी आमच्या दोघांना ट्रोल का केले जात आहे हे मला समजत नाही. जगा आणि जगू द्या.चारू आसोपा पुढे म्हणाली की आजकाल लोक नकारात्मक गोष्टी जास्त बोलत आहेत. परंतु या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर परिणाम होऊ नये याची मी पूर्ण काळजी घेत आहे.

मला वाटते की कोरोना व्हायरसमुळे लोक खूप अस्वस्थ झाले आहेत. यामुळे त्यांचा राग थांबवण्यासाठी लोक संधी शोधत राहतात आणि स्टार्सना लक्ष्य करणे सर्वात सोपे असते.

चारू आसोपा आणि राजीव सेन यांचे फोटोज पाहून लोक म्हणाले होते की तुम्ही दोघे पती-पत्नी असाल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही करू शकता.तुमच्या पर्सनल बेडरूम मधले फोटोज तुम्ही लोकांना कसे काय दाखवू शकता असा सवाल त्यांनी चारू आसोपाला केला.

नुकतेच टाइम्स ऑफ इंडिया ला चारुने सांगितले की फोटो पोस्ट करण्याआधी आमच्यामध्ये काही बोलणे झाले नव्हते. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. पण नंतर आम्हाला कळालं की आम्ही ट्रोल झालो आहोत. त्यानंतर मी राजीवला म्हणाले की मी फोटो पोस्ट करायला नकार दिला असतानाही तू फोटो पोस्ट का केलास.

बघ आता आपण ट्रोल झालो. आमच्यामध्ये भांडण देखील झाले. ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देण्यात काही अर्थ नसतो. त्यांच्याकडे फक्त दुर्लक्ष करायचे असते. आम्ही दोघेही या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे असे चारुने म्हटले आहे.

तसेच या सेल्फी फोटोंमध्ये ते दोघे एकमेकांचे चुंबन घेताना दिसत होते. या फोटोवर चारुने देखील कमेंट केली होती. तिने कमेंट करताना क्वारंटाइनमध्ये आम्ही आनंदात आहोत. घरी राहा. सुरक्षित राहा असे तिने म्हटले आहे.

त्यांच्या या फोटोवर एका यूजरने हे अती प्रायवेट क्षण सोशल नेटवर्किंगवर शेअर करण्याची गरज नव्हती अशी कमेंट केली होती. तसेच तुम्ही पती-पत्नी असलात तरी बेडरुमधील फोटो शेअर करु नये असे म्हणत युजर्सनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

चारु आसोपा सेन आणि राजीव सेन हे सेलिब्रिटी कपल सध्या लॉकडाउनमुळे एकमेकांना वेळ देत आहेत. मात्र सार्वजनिक ठिकाणी अनेकदा उघडपणे प्रेम व्यक्त करण्यावरुन टीकेचे धनी ठरलेले हे कपल क्वारंटाइनदरम्यान पोस्ट केलेल्या काही खासगी फोटोंमुळे पुन्हा चर्चेत आलं आहे.

मात्र त्यांनी पोस्ट केलेले हो फोटो त्यांच्या अनेक चाहत्यांना अती प्रायवेट वाटले. अनेकांनी याबद्दलची नाराजी कमेंटमधून व्यक्त केली आहे. तुम्ही पती-पत्नी असलात तरी सोशल नेटवर्किंगवर काय पोस्ट करावं याचं भान हवं तुमच्या घरचेही हे फोटो बघत असतील हे अती प्रा-यवेट क्षण सोशल नेटवर्किंगवर शेअर करण्याची गरज नव्हती अशा अनेक कमेंट या दोघांच्या फोटोवर युजर्सनी केल्या आहेत.