एकेकाळी मिनिषा लांबा ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. खरं तर तिला अभिनयात फारशी गती नव्हती पण तिच्या ग्लॅमरस आणि मादक अदा पाहून चाहते घाया’ळ होत असतं. खरं तर तिला अभिनेत्री नव्हे एक पत्रकार व्हायचं होतं. या क्षेत्रात काम करण्यासाठी तिनं आपल्या इंग्रजी भाषेवरही भरपूर मेहनत घेतली होती. परंतु तिनं एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतलं अन् करिअरला वेगळंच वळण मिळालं.
अभिनेत्री मिनिषा लांबाने तिच्या करिअरची सुरुवात 2005 मध्ये ‘यहाँ से’ या चित्रपटातून केली होती ज्यामध्ये ती अभिनेता जिमी शेरगिलसोबत दिसली होती. यानंतर ती ‘बचना ए हसीनो’, ‘किडनॅ’प’, ‘यादीं’, ‘वेल डन अब्बा’, शौर्य यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. पण सध्या ती लाइमलाइटच्या जगापासून दूर आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मिनिषा तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. मिनिषाने तिचा बॉयफ्रेंड रायन थमसोबत गुपचूप लग्न केले होते पण हे लग्न फार काळ टिकले नाही. आणि 5 वर्षानंतर दोघांनी घ’टस्फो’ट घेण्याचा निर्णय घेतला. बॉलीवूड अभिनेत्री मिनिषा लांबा ‘बचना ए हसीनो’, किडनॅ’प आणि जोकरसह अनेक चित्रपटांमधील भूमिकांसाठी लोकप्रिय आहे.
मिनिषा लांबा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी स्वतःचे फोटो पोस्ट करत असते. मिनिषा लांबा तिच्या इंस्टाग्राम हँडलवर बिकिनी फोटो शेअर करण्यासाठी देखील ओळखली जाते. ती जेव्हा जेव्हा तिचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर करते तेव्हा ती इंटरनेटचा पारा चढवताना दिसते.
जर तुम्ही मिनिषाचे इंस्टाग्राम फॉलो केले तर तुम्हाला तिचे अनेक बिकिनी फोटो पाहायला मिळतील. याआधी मिनिषाने चष्मासह पिवळ्या रंगाची बिकिनी परिधान करून स्विमिंग पूलच्या बाजूला पोज दिली आहे. मिनिषा बऱ्याच दिवसांपासून लाइम लाईटपासून दूर आहे. तीचे ते हॉ’ट फोटो आणि मोहक कृतींनी लोकांचे लक्ष वेधून घेते.
मात्र, मिनिषाला खरी ओळख 2008 मध्ये आलेल्या ‘बचना ए हसीनो’ या चित्रपटातून मिळाली. मिनिषा व्यतिरिक्त या चित्रपटात रणबीर कपूर, दीपिका पदुकोण आणि बिपाशा बसू यांच्याही भूमिका होत्या. याशिवाय मिनिषा दीर्घकाळ चाललेल्या बिग बॉस 8 मध्येही दिसली होती.
दरम्यान, मिनिषा लांबाचा जन्म 18 जानेवारी 1985 रोजी नवी दिल्ली येथे एका पंजाबी शीख कुटुंबात झाला. 2004 मध्ये, दिल्ली विद्यापीठातून तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, ती लवकरच चित्रपटसृष्टीत आपले करिअर करण्यासाठी मुंबईत आली. तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती.
मिनिषा अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली जेव्हा तिच्या नाक आणि ओठांवर शस्त्रक्रिया झाल्याची बाब समोर आली. शस्त्रक्रियेनंतर मिनिषाचा लूक खूप बदलला होता. यामुळे तो ट्रो’लही झाला होता. ऑगस्ट 2018 ते मार्च 2019 या कालावधीत प्रसारित झालेल्या ‘इंटरनेट वाला लव्ह’ या शोमध्ये मिनिषा शेवटची दिसली होती.