शूटिंग दरम्यान लहान मुलांना पाण्यात पाहून सलमानने मारली पाण्यात उडी, पुढे काय झालं जे तुम्हीच बघा …

Bollywood

बॉलीवूड सुपरस्टार म्हणून सलमान खानला पूर्ण जगामध्ये ओळखले जाते. हि गोष्ट त्याच्या सर्व चाहत्यांना आणि त्याला हेट करणाऱ्या सर्वाना चांगलीच माहिती आहे.

सलमान खानचा असा कोणताही चित्रपट नाही कि तो चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याने बक्कळ कमाई केली नसेल. अपवाद काही चित्रपट. जेव्हा सलमानचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा पहिल्या काही आठवड्यातच १०० ते २०० करोड कमाई एकदम सहजरीत्या करतो.

त्याचबरोबर सलमान खान असा अभिनेता आहे जो एका चित्रपटासाठी सर्वात जास्त मानधन घेतो. सलमान इतर अभिनेत्यांच्या तुलनेत प्रत्येक चित्रपटासाठी जवळजवळ ६० करोड रुपये घेतो.

सध्या सलमान बिग बॉस हा रियालिटी शो होस्ट करत आहे. एका बातमीनुसार सलमान बिग बॉस रियालिटी शोच्या एका एपिसोडसाठी १ करोड रुपये मानधन घेतो. जे इतर शोच्या तुलनेत खूप जास्त आहे.

यावरूनच लक्षात येते सलमान खान किती नावाजलेला अभिनेता आहेत. निर्मातेसुद्धा सलमान खानला तो मागेल तेवढे पैसे द्यायला कधीच मागेपुढे बघत नाहीत कारण स्पष्ठ आहे. सलमानच्या नुसत्या नावानेच चित्रपटाची पब्लिसिटी झालेली असते आणि प्रदर्शनाआधीच तो चित्रपट सुपरहिट झालेला असतो.

सलमान खानने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत असे अनेक सुपरडुपर हिट चित्रपट दिलेले आहेत. जे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. २०१० साली प्रदर्शित झालेला दबंग चित्रपट हा त्या चित्रपटातील एक चित्रपट.

यातील सलमान खानचे चुलबुल पांडेचे पात्र खूप सुपरहिट झाले होते. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवरील सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढून नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. दबंग नंतर या चित्रपटाचा दुसरा सिक्वेल सुद्धा आला तो पण बॉक्सऑफिसवर आपली कमाल दाखवून गेला.

आता या चित्रपटाचा तिसरा सिक्वेलसुद्धा आलेला आहे. सलमान जेव्हा दबंग ३ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त होता तेव्हा त्यांनी बरीच मज्जा केली होती. या चित्रपटाच्या शुटींगचे काही फोटोसुद्धा तो सोशल मिडियावर शेयर केलेले आहेत.

अलीकडेच सलमानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेयर केला होता. ज्या फोटो मध्ये काही लहान मुले पाण्यामध्ये मस्ती करताना दिसत आहेत. सलमान ने त्या मुलांना पाण्यात पाहून पाण्यात उडी मारली आणि त्यांच्यासोबत खूप मज्जा केली. हा फोटो सोशल मिडीयावर खूप व्हायरल झाला आहे.

सलमानने हा फोटो शेयर करताना म्हंटले आहे कि, ” पानी में गोते लगाए आपके भाई ने कल, काफी कूल बच्चो के साथ! धरती मां का आदर सम्मान हमेशा सर आंखोपे…” सध्या या फोटो ला चार हजारच्या वर रिट्विट तर पन्नास हजारच्या वर लाईक भेटले आहे. या फोटोमध्ये सलमानसुद्धा लहान मुलांसोबत पाण्यामध्ये मस्ती करताना दिसत आहे.

तुम्हाला हे माहितीच असेल कि सलमान खानला लहान मुलाच्यावर जास्तच प्रेम आहे. तुम्ही पाहिलं असेल सलमान एकवेळ आपल्या इतर चाहत्यांना वेळ देणार नाही पण तो आपल्या लहान चाहत्यांना कधीच नाराज करत नाही.

तो नेहमीच आपल्या लहानग्या चाहत्यांची काळजी घेतो. त्याबरोत तो गरजू मुलांच्या मदतीसाठी एक संस्था हि चालवतो. या संस्थेमार्फत आजपर्यंत त्याने खूप गरजू मुलांची मदत केली आहे.

अर्थातच या संस्थेचे नाव आपणाला माहिती असेलच ती म्हणजे “बीइंग ह्युमन”. सलमानचे त्याची बहिण अर्पिताच्या मुलावरतर जीवापाड प्रेम आहे. त्याच्याबरोबर सलमानचे खूप फोटो सोशल मिडियावर व्हायरल झालेले आपण पाहिलेले आहेत. अश्या परिस्थितीत सलमान पुन्हा एकदा मामा बनण्याची शक्यता आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सलमान खानचा चित्रपट दबंग ३ ने चांगलीच कमाई करून दिलेली आहे. या चित्रपटाची खूप लोक्कांनी तारीफ सुद्धा केली. दबंग ३ चित्रपट 20 डिसेंबर २०१९ ला प्रदर्शित करण्यात आला होता.

सलमानचे सर्व चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होतात. पण दबंग ३ चित्रपट पहिल्यांदाच ईदऐवजी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. गेल्या ईदच्या मुहूर्तावर सलमानचा भारत हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानेहि त्यावेळी बक्कळ गल्ला जमवला होता.

डान्सिंग स्टार प्रभू देवा यांनी दबंग ३ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाल्यावर सुपरडुपर हिट ठरेल अशी त्यांची मनोमन इच्छा होती आणि ती पूर्ण झाली.