बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मोठा ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. शिल्पा शेट्टीने २००९ मध्ये बिजनेसमैन राज कुंद्राशी लग्न केले आणि लग्नानंतर तिने स्वत: ला चित्रपटांपासून दूर ठेवले होते. शिल्पा शेट्टी ही राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे. राज कुंद्राचे पहिले लग्न कविताशी झाले होते. पण काही वर्षांतच दोघांचेही घ टस्फोट झाले.
जेव्हा राज कुंद्राने कविताला घ टस्फोट दिला तेव्हा त्यांची मुलगी 2 महिन्यांची होती. शिल्पा शेट्टीने पैशासाठी राजसोबत लग्न केल्याचा आ रोप कविताने केला होता. शिल्पामुळेच तीचे घर तुटले असल्याचेही तिने म्हटले होते.
शिल्पा शेट्टीने मात्र या सर्व गोष्टी खोटी असल्याचे सांगितले होते. शिल्पा शेट्टी म्हणाली होती की राज यांच्या आयुष्यात जेव्हा कविताशी त्यांचे सं-बंध संपले होते तेव्हा कविता यांना याची चांगली कल्पना होती.
शिल्पाने सांगितले की तो घ टस्फोट घेतल्यावर राजला भेटली. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची लंडनमध्ये पहिली भेट झाली होती. शिल्पा शेट्टीला राज कुंद्राचा मैत्रीपूर्ण स्वभाव आवडला होता. त्याचवेळी राज कुंद्राला शिल्पा शेट्टी आवडू लागली होती.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची आहे. शिल्पा शेट्टी अभिनेत्री असल्याने नेहमी चर्चेत असते. तर राज कुंद्रा प्रसिद्धीपासून नेहमी दूर असतो. पण शिल्पा शेट्टीमुळे त्यांच्या जोडीची सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा सुरु असते. यावेळीही तसंच झालं आहे. या दोघांच्या भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शिल्पा-राजच्या व्हिडीओला युजर्सकडून भरभरून लाइक्स मिळत असतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ शिल्पाने नुकताच पोस्ट केला आहे. नजर हटी दुर्घटना घटी सच्चाई पता चलने पर पिट गए हमारे पती असं कॅप्शन देत शिल्पाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिल्याप्रमाणेच शिल्पाने व्हिडीओअखेर राजची धुलाई केली आहे.
या व्हिडीओच्या सुरुवातीला शिल्पा तिच्या वॉर्डरोबमधील कपडे नीट लावताना दिसते. तेव्हा पती राज तिला किस करण्याचा प्रयत्न करतो. त्यावर शिल्पा म्हणते काम करताना मला किस करण्याचा प्रयत्न करू नकोस.
हे ऐकून घरकाम करणारी महिलासुद्धा शिल्पाला सांगते मीसुद्धा सांगितलं पण माझं ऐकतच नाहीत. यानंतर शिल्पा पतीची चांगलीच धुलाई करते. शिल्पा शेट्टीच्या या व्हिडीओला काही तासांतच १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. बऱ्याच कलाकारांनीही या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. शिल्पाची बहीण शमिता शेट्टीने हसण्याचे इमोजी कमेंट्समध्ये पोस्ट केले आहेत. तर अभिनेता रोहित रॉयने राजच्या अभिनयाचं कौतुक केल आहे.
शिल्पा आणि राज यांच्या नात्यात दुरावा आल्याचे बोलले जात होते. गेल्या काही दिवसांपासून राज त्याच्या घरी जात नव्हता. तो मुंबईमधील त्याच्या ऑफिसमध्येच राहत असे. यामुळे शिल्पा आणि राज यांच्यात काही तरी वाद झाल्याची चर्चा चालू होती. पण सूत्रांनी माहिती काढली असता या सर्व गोष्टी खोट्या असल्याचे समोर आले. आता माहित नाही या सर्व अफवा कुठून सुरु झाल्या अशी प्रतिक्रिया स्वतः राज कुंद्राने डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.
राज म्हणाला की मी गेले काही दिवस ऑफिसच्या कामात खूप व्यस्त असल्यामुळे माझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नव्हतो. त्यामुळे शिल्पा तिच्या मैत्रीणींकडे माझ्याविषयी तक्रार करायची बहुदा त्याचवेळी या अफवांना सुरुवात झाली असावी. चला निदान राजच्या प्रतिक्रियेमुळे शिल्पाच्या चाहत्यांना तरी दिलासा मिळाला असेल.