Breaking News

शरीर सुखाच्या मागणीच्या अटीवर मिळणार होते चित्रपटामध्ये काम,ह्या 5 अभिनेत्री झाल्या का-स्टिंग काउचच्या शि-कार…

बॉलिवूडमध्ये बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आज एक विशेष दर्जा या क्षेत्रात मिळविला आहे परंतु कधीकधी त्यांच्या कारकीर्दीत त्यांना कास्टिंग काउच देखील सामना करावा लागला आहे. आपण याकडे या फिल्म इंडस्ट्रीचे घृ णास्पद सत्य म्हणून बघू शकता. बॉलिवूडमधील बर्‍याच अभिनेत्रींनी नायिका होण्याच्या स्वप्नासह चित्रपटसृष्टीकडे आल्या पण त्यांना कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे.

कास्टिंग काउचच्या घटनेची पुष्कळ अभिनेत्रींनी जाहीरपणे कबुली दिली असून त्यांनी आपले अनुभवही सांगितले आहेत. येथे आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील अशाच अभिनेत्रींविषयी सांगत आहोत जे कास्टिंग काउचच्या बळी ठरल्या आहेत.

राधिका आपटे:- आज राधिका आपटेला आता बॉलिवूडमध्ये ओळख करून देण्याची गरज नाहीये. तिने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवला आहे. हिंदी चित्रपटांशिवाय तिने तमिळ बंगाली तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे.

२०१८ मध्ये ती अक्षय कुमारच्या लोकप्रिय चित्रपट पॅडमॅनमध्येही दिसली होती. राधिका आपटेने कबूल केले आहे की दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत तिला कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते. बॉलिवूड चित्रपटाची ऑफर तिला एका अभिनेत्याने दिली होती पण त्यासाठी तडजोड करण्यास त्याने सांगितले होते.

सुरवीन चावला:- सुरवीन चावला एक अतिशय सुंदर अभिनेत्री आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केल्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत काम करयला सुरवात केली. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत तिलाही कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे. परंतु तिच्या म्हणण्यानुसार तिने तडजोड करण्यास साफ नकार दिला. मात्र बॉलिवूडमध्ये यापूर्वी कधीही अशा समस्यांचा सामना केला नसल्याचेही सुरवीन हिने कबूल केले.

कल्कि कोचलिन:- बॉलिवूड अभिनेत्री कल्कि कोचलीन जी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपची माजी पत्नी देखील आहे तिला आपल्या कारकीर्दीत कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे हे तिने जाहीरपणे कबूल केले आहे. कल्कीने सांगितले की लोकांना वाटते की मी जर भारताची नाहीये तर माझा गैरफायदा घेऊन ते सहजपणे माझे शो षण करतील परंतु कल्कीच्या मते तिने कधीही तडजोड केली नाही. आपल्या कौशल्याच्या जोरावरच तिने इंडस्ट्रीमध्ये स्वत: साठी एक स्थान निर्माण केले आहे.

टिस्का चोप्रा:- टिस्का चोप्रा जी आज एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे तिने बर्‍याच प्रसिद्ध मालिकांमध्ये आणि वेब सिरीज मध्ये देखील काम केले आहे. तिने तारे जमीन पर मध्ये ईशानच्या आईची भूमिका केली होती. करिअरच्या सुरुवातीला एका चित्रपटात काम करण्यासाठी तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे हे तिने उघडपणे कबूल केले आहे.

एली अवराम:- बॉलिवूड अभिनेत्री एली अवरामने सांगितले होते की करियरच्या सुरुवातीच्या काळात दोन दिग्दर्शकांनी तिला तिच्याबरोबर झोपायला सांगितले होते. अवरामच्या म्हणण्यानुसार तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. ती अभिनेत्री होऊ शकत नाही करत ती खूप लहान दिसते असे म्हटले जात होते. त्यावेळी तीचे वजन कमी असल्याचे सांगितले जात होते.

एखाद्या अभिनेत्रीने स्वखुशीने का असेना शरीरसं-बंधांना संमती दिली असली तरी कास्टिंग काउच हे कोणत्याही परिस्थितीत वाईटच. पण समोरच्या व्यक्तीने दिलेले आश्वासन पाळले नाही तर अशा प्रसंगांची वाच्यता केली जाते तेव्हा त्याला दुटप्पीपणा म्हणायचे का हा प्रश्न निर्माण होतो.

म्हणजेच त्या अभिनेत्रीला काम मिळाले असते तर हा विषय कोणाला कळलाच नसता असा त्याचा अर्थ होतो. पण एखादी अभिनेत्री अशा ऑफर धुडकावते तेव्हा देखील ती लगेच त्यावर बोलत नाही. कारण ती नवखी असते. तिला काम मिळण्याची अपेक्षा असते अशा वेळी आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे पुढे काम मिळायला अडचणी येतील की काय अशी तिला भीती वाटते.

About admin

Check Also

ढलती उम्र में रवीना टंडन पर छाया बोल्डनेस का सुरूर, 48 पार सामने खुली ड्रेस में दिखा दी ऊपर से नीचे तक की बॉडी

बॉलीवुड इंडस्ट्री की खूबसूरत और जानी-मानी अदाकारा रवीना टंडन आज भी उतनी ही पॉपुलर एक्ट्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *