नेहमी प्रमाणे आज आम्ही तुम्हाला एक खास अभिनेत्या बद्दल आणि त्याच्या मराठमोळ्या पत्नी बद्दल माहिती देणार आहोत चला तर मग वाचा सविस्तर..
सध्या शरद केळकर हा तानाजी – द अनसिन वारीअर या चित्रपटामुळे फारच चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या लॉन्च होतेवेळी, शरद केळकर यांनी ज्या प्रकारे हजरजबाबी पणा दाखवला त्यावर सर्वांनी त्यांचे मोठे कौतुक केले आहेत.
अजय देवगण, सैफ अली खान, काजोल असे मोठे दिग्गज असलेला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा सध्या जाम चर्चेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर चांगलाच जम बसवला आहे.
अजय देवगणने या चित्रपटात तानाजी मालुसरेंची भूमिका साकारलेली आहेत. तर एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता शरद केळकर दिसत आहेत.
2005 मध्ये शरदने मराठमोळ्या किर्ती गायकवाडशी लग्न केले. किर्ती ही लोकप्रिय टीव्ही कलाकार आहेत. किर्ती व शरद या दोघांनी ‘सात फेरे’ या नावाजलेल्या मालिकेत एकत्र काम केले होते.
याच मालिकेच्या सेटवर दोघांचे प्रेमप्रकरण जुळले. आणि यानंतर दोघांनी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला. आणि आज दोघांना किशा नावाची एक सुंदर मुलगी आहे.
तुम्हाला सांगू इच्छितो कि, किर्तीने सात फेरे, छोटी बहू, ससूराल सिमर का या मालिकांमध्ये काम केलेले आहेत.
आणि या सर्व भूमिका तिच्या लोकप्रिय भूमिकांपैकी एक आहे. नच बलिए या रिअॅलिटी डान्स शोमध्येही तिल. आपण सर्वांनी पाहिलेलं असेलच.
शरद बद्दल बोलायचं झालं तर 2004 मध्ये शरदला छोट्या पडद्यावर संधी मिळाली. दूरदर्शनवर प्रकाशित होणा-या ‘आक्रोश’ या मालिकेद्वारे शरद ने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. तसेच शरद ने अनेक हिंदी शो होस्ट म्हणूनही काम केलेलं आहेत.
नंतर शरद ला हळूहळू काम मिळायला लागले, हलचल, गोलियों की रासलीला रामलीला, हीरो, मोहनजोदारो, रॉकी हँडसम, इरादा यांसारख्या बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये त्याने महत्वाची भूमिका बजावली आहे.