सारा ने सैफ आणि अमृता मध्ये असलेल्या नात्याचा केला पडदा फाश, बोलली त्यांच्यामध्ये अजूनही..

Bollywood

सारा आली खानने काही महिन्यापूर्वीच बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण केले आहे. केदारनाथ या हिंदी चित्रपटाद्वारे तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरवात केली होती. स्पष्ठवक्तेपणा आणि कुशाग्र बुद्धी आणि आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने तिने अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

आपल्या मुलाखतीच्या दरम्यान साराने असे काही खुलासे केले आहेत कि ते ऐकून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. काही दिवसापूर्वी साराने अमृता आणि सैफ च्या नात्याबद्दल एक अशी खास गोष्ट सांगितली होती ज्यामुळे ती सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

साराने खुलासा केलेली हि गोष्ट जर तुम्हालासुद्धा समजली तर तुम्हीसुद्धा तिचे पहिल्यापेक्षा अधिक दृढ चाहते बनाल.

काही दिवसापूर्वी सारा अली खानने आपल्या कुटूंबियांविषयी मिडियासमोर मनमोकळेपणाने बातचीत केली. यावेळी साराला असा प्रश्न विचारण्यात आला कि तुमचे संगोपन आईनेच केले तर तुम्हाला तुमचे वडील आसपास नसल्याची कमी कधी जाणवली का?

या प्रश्नावर बोलताना सारा म्हणाली कि, मला असे वाटते कि एकाच घरात नाखूष माता-पिता एकत्र राहण्यापेक्षा वेगळ्यावेगळ्या घरामध्ये ख़ुशीने राहणे कधीही चांगले. त्याचबरोबर साराने असे सुद्धा सांगितले कि तिच्या आईने तिला कोणतीच कमी भासू दिली नाही. माझ्या आणि माझ्या भावाच्या जन्मानंतर माझ्या आईने फक्त आमचे पालनपोषण काळजीकडे पूर्ण लक्ष दिले.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या केदारनाथ चित्रपटाने साराला एक चांगली ओळख निर्माण करून दिली. या चित्रपटाने चांगली कमाई देखील केली त्यानंतर आलेला सिम्बा हिटही झाला. या गोष्टीवर सारा म्हणाली कि माझ्याकडे एखाद्या स्टारसारखे वागायला जरासुद्धा वेळ नाही आणि भविष्यातहि मी स्वतःला असे जाणवू देणार नाही.

या विषयावर सारा म्हणाली कि, मी फक्त धावपळ करून कामाचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मी या गोष्टीला कधीच मानत नाही कि मी एक मोठी स्टार आहे. हो पण मी ती बनण्याचा नेहमी प्रयत्न करीन. परंतु मी स्वतःला एखाद्या स्टारसारखे कधीही वाटू देणार नाही. कारण तुम्हाला ज्यावेळी तसे वाटेल त्यावेळी चाहते तुम्हाला त्या रूपातच बघणे जास्त पसंत करतील.

साराला जेव्हा विचारण्यात आले कि, तुमची आजी शर्मिला टैगौरचे असे म्हणणे आहे कि एवढ्या लहान वयात तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण आहात, एवढा आत्मविश्वास येतो कुठून? त्यावर सारा म्हणाली कि ह्या सर्व गोष्टी इमानदार व्यक्तीमध्ये अपोआपच येतात.

बरेच लोक सहजपणे खोटे बोलू शकतात, त्यांना असे करू द्यायला पाहिजे, जर मि खोटे बोलले तर माझी जीभ अडखळू लागेल, माझ्यासाठी मि खरी असणेच मला जास्त सूट करते.

साराला जेव्हा तिच्या कुटुंबियांना मीडियाकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली कि, मी जे काही करेन ते माझ्या कुटुंबियांना नक्कीच आवडेल कारण मी त्यांची मुलगी आहे. परंतु मला प्रेक्षकांच्याकडून मिळालेले प्रेम जास्त महत्वाचे आहे. आणि मी हे आयुष्यभर लक्षात ठेवेन.

जे प्रेम आपल्याला मिळते आणि त्याच्या तुम्ही हकदार आहात का असे विचारल्यावर सारा म्हणाली कि, मी फक्त ८० टक्के पात्र आहे. उर्वरित २० टक्के कुठून येतात हे मला माहित नाही मी असेही म्हणेन कि या गोष्टी मला जास्त भावूक बनवतात. तीने पुन्हा सांगितले कि फिल्मी जगतामध्ये मला कोणताही अनुभव नाही, मी प्रामाणिकपणे काम केले आणि हाच माझा पुढे जाण्याचा मार्ग आहे.

त्याचबरोबर ती असेहि म्हणाली कि, मी खूप वेळा आई-वडिलांच्या सेटवर गेले होते, परंतु मला “केदारनाथ” या चित्रपटामधून सर्वप्रथम चित्रपटसृष्टीतील बारकावे जाणून घेण्याची संधी मिळाली. साराला जेव्हा विचारण्यात आले कि, वडिलांचे तैमुरवर खूप प्रेम आहे आणि ते त्याची खूप काळजी घेतात, जे तुम्हाला नाही मिळाले यावर तुम्हाला हेवा वाटतो का?

यावर ती म्हणाली कि, असे मुळीच नाही, तैमुर माझा छोटा भाऊ आहे. जेव्हा माझे वडील आमच्यासोबत राहत होते त्यावेळी ते माझी खूप काळजी घेत असत, आणि आता दूर असूनपण ते माझी काळजी करतात.