सलमान खान ने उघड केले गुपित,या कारणामुळे मी शाहरुख आणि अमीर खान सोबत चित्रपट करत नाही…

Bollywood

कोणी एकजण नाही तर जवळपास सर्वजण हे पाहण्याच्या उत्सुकतेत आहेत कि कधी बॉलीवूड चे हे 3 खान एकत्र चित्रपट करतात.

वेळोवेळी हा प्रश्न सतत उद्भवत असतो की बॉलिवूडचे तीन लोकप्रिय खान, आमिर, सलमान आणि शाहरुख एकत्र चित्रपट का करत नाहीत?

सलमान-शाहरुख, सलमान-आमिर यांनी एकत्र चित्रपट केलेले आहेत, पण त्यानंतर हे तीनहि खान कधीही एकत्र दिसले नाहीत.

काय असेल त्यामागील कारण, त्यांच्या चाहत्यांनासुद्धा अशी इच्छा आहे की त्यांनी कोणत्या न कोणत्या चित्रपटात एकत्र दिसावं.

त्यांनी वेगवेगळे चित्रपट केले तरी एखाद्या चित्रपटात का होईना त्यांनी एकत्र काम केलेच पाहिजे, परंतु अजून पर्यंत हे शक्य झालेले नाही ते कधी होईल याची सर्व जण उत्सुकतेने वाट बघत आहेत.

अलीकडे जेव्हा सलमानला हा प्रश्न विचारण्यात आला कि, तुम्ही शाहरुख खान आणि अमीर खान यांच्या समवेत चित्रपटात का दिसत नाहीत. तेव्हा ते म्हणाले की जर तिघांनी एकत्र काम केले तर चित्रपटाचे बजेट खूप जास्त असेल.

हे बजेट परत मिळवण्यासाठी आम्हाला देशात वीस हजार पडदे लागतील असहि सलमान खान यांनी स्पष्ट केले.

सध्या देशात 5 ते 6 हजार पडदे आहेत. अशा छोट्या पडद्यावर चित्रपटाची किंमत वसूल करणे इतके सोपे नाही, म्हणून अद्याप तिघांनी एकत्र चित्रपट काढला नाही.

अशी भूमिका मांडून सलमान खान यांनी या प्रश्नाच उत्तर अतिशय सुंदर रित्या आपल्या चाहत्यांना दिलेल आहे.

सलमानची ही बाब असून यावर चर्चा होऊ शकते. तसे, लोक म्हणतात की बर्‍याच चित्रपट निर्मात्यांनी तिघांसमवेत चित्रपट बनवण्याची योजना आखली होती, परंतु तिन्ही खानांना आपापसात काम करायचं नाही. त्यामुळे यामागे नेमकं काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.