सैफची इटलीवाली गर्लफ्रेंड जी बनली अमृता सोबत घटस्फो-टाचे कारण, करीना पेक्षाही होती सुंदर,बघा फोटो

Bollywood

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने काही दिवसामागेच आपला 50 वा वाढदिवस साजरा केला आहे. 1991 मध्ये सैफ अली खानने प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न केले होते. अमृता ही सैफपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. पण सैफ अली खान आणि अमृताचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि नंतर हे दोघे वेगळे झाले होते हे आपणास माहितीच आहे.

त्याला व अमृताला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत. यानंतर सैफ अली खानने करीना कपूरशी लग्न केले. सैफ आणि करीनाला एक मुलगा तैमूर देखील आहे. अलीकडेच काही दिवसामागे सैफने मिडियाला सांगितले की तो पुन्हा एकदा बाप होणार आहे.

टशन चित्रपटाच्यावेळी सैफ करीना कपूरच्या खूप जवळ आला:- असे म्हटले जाते की शाहिद आणि करीनाचा जब वी मेट या चित्रपटाच्या सेटवर ब्रेकअप झाला होता. यादरम्यान, करीना सैफसोबत टशन या चित्रपटाचे शू-टिंग देखील करत होती.

टशनच्या सेटवर करीना पहिल्यांदा सैफ अली खानला भेटली. सेटवर करीना रोज सैफसोबत गप्पा मारत बसायची आणि हळू हळू हे दोघे एकमेकांच्या जवळ येत गेले. दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. मग एके दिवशी सैफने करिनाला लग्नासाठी प्रपोज केले मग करिनासुद्धा त्याला हो म्हणण्यापासून स्वत: ला रोखू शकली नाही.

मात्र हो म्हणायला तिने थोडा वेळ घेतल्याचे करिनाने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. अनेक दिवस करीनाबरोबर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांचे लग्न झाले. पहिल्या भेटीतच अमृताने सैफला की-स केले होते:- चीनमधील बॉलिवूड सेलिब्रिटींसमवेत सैफ अली खान आणि अमृता सिंगही एका पार्टीत उपस्थित होते.

जेव्हा सैफने अमृताला पार्टीत पाहिले तेव्हा तो तिचे सौंदर्य बघून वेडा झाला होता. पुढे दिल्लगी या चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली. यानंतर दोघांचे सतत भेटणे सुरू होते. आता अमृताही सैफच्या प्रेमात पडत होती. दोघांमधील प्रेम हळूहळू वाढू लागले.

एका मुलाखतीदरम्यान सैफने असेही म्हटले होते की आमच्या पहिल्याच भेटीत अमृताने मला की-स केले होते. काही काळानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु त्यांना आपल्या कुटूंबाची भीती वाटत होती. याचे एक मोठे कारण असे होते की अमृता सिंग सैफ आली खान पेक्षा 12 वर्षांने मोठी होती. असे असूनही 3 महिन्यांच्या डेट नंतर सैफने 1991 मध्ये अमृताशी गुपचूप लग्न केले.

सैफ आणि अमृताचा घटस्फो-ट का झाला होता:- रोजा कॅटलनो या नावाच्या मुलीशी सैफ अली खानचे प्रेमसं-बंध होते. या त्याच्या अफेअरमुळे आणि काही वैयक्तिक कारणांमुळे सैफ आणि अमृता यांच्यात वाद वाढू लागला आणि 2004 मध्ये दोघांनी घटस्फो-ट घेतला.

घटस्फो-टानंतर लवकरच सैफची एक मुलाखत समोर आली होती. या मुलाखतीत त्याने आपल्या आणि अमृताच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सर्व काही बोलले होते. म्हणूनच इटलीच्या गर्लफ्रेंडने सैफला नकार दिला:- एकेकाळी मीडियामध्ये सैफ आणि रोजा च्या लग्नाची बातमी येऊ लागली होती.

अशी बातमीही आली की सैफ आणि रोजा सध्या एकत्र एका घरात राहत आहेत. दोघांनी एकमेकांना दोन वर्ष डेट केले. पण 2007 साली त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येवू लागल्या. सैफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर रोजाने एक मुलाखत दिली होती. रोजाच्या म्हणण्यानुसार तिला हे सुद्धा माहिती नव्हते की सैफचे आधीच एक लग्न झाले होते.

आणि त्याचा घटस्फो-ट देखील झाला होता तसेच त्याला दोन मुले देखील होती याबद्दल सैफने रोजाला काहीच सांगितले नव्हते. जेव्हा ती भारतात आली तेव्हा तिला हे सर्व कळाले. यानंतर रोझाने सैफबरोबर ब्रेकअप करण्याचे ठरविले.