रवी शास्त्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असतानाही, विनोद खन्नाच्या प्रेमात पडली होती अमृता सिंग करायचं होत लग्न पण …..

Daily News

आज आम्ही तुम्हाला ८० आणि ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंहबद्दल सांगणार आहोत. काही दिवसांपूर्वीच अमृता सिंहने आपला ६२ वा वाढदिवस साजरा केला आहे. 

अमृता सिंह आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या अफेयर्ससाठी सुद्धा खूप प्रसिद्ध राहिली आहे. ज्या वेळी ती बॉलीवूडमध्ये काम करत होती त्यावेळी तिचे नाव विनोद खन्ना सोबत सुद्धा जोडले गेले होते. विनोद खन्नासुद्धा ७० आणि ८० च्या दशकातील खूपच हँडसम अभिनेता होता.

सामान्य मुलीच नाही तर बॉलीवूडच्या अभिनेत्रीसुद्धा विनोद खन्नाच्या फॅन होत्या. असे म्हंटले जाते कि अमृता सिंह विनोद खन्नाच्या जवळ राहण्यासाठी डायरेक्टर्सला सिचुएशन क्रिएट करण्याचा हट्ट करत होती. खरे तर आपल्या करियरच्या सुरवातीला विनोद खन्नाला कोणत्याही फिमेल स्टारशी भेटायला आवडत नव्हते.

अमृता सिंह विनोद खन्नाच्या याच अदेवर फिदा झाली होती पण विनोद खन्ना कधी अमृता सिंहकडे बघत सुद्धा नव्हते. अमृता सिंहने हे आव्हान स्वीकारले आणि विनोद खन्ना सोबत दोस्ती करण्यात यशस्वी झाली.

अमृता सिंहच्या आईला तिच्या मुलीची आणि विनोद खन्नाची दोस्ती अजिबात आवडली नव्हती. अमृता सिंहने विनोद खन्नासोबत बटवारा, धर्म संकट, आणि सीआईडी सारख्या चित्रपटामध्ये काम केले आहे.

ज्यावेळी जेपी दत्ताचा चित्रपट बटवाराची शुटींग चालू होती त्यावेळी अमृता सिंह आणि विनोद खन्नाच्या अफेयरच्या चर्चा समोर येऊ लागल्या. विनोद खन्नाच्या अफेयर पूर्वी अमृता सिंह रवी शास्त्रीला डेट करत होती.

जेव्हा अमृताने विनोद खन्नासोबत बटवारा हा पहिला चित्रपट साईन केला तेव्हा तिने याबाबत रवी शास्त्रीला सांगितले. रवी शास्त्रीला अमृताच्या या वक्तव्यावर हसू आले आणि तो अमृता सिंहला चीडवताना म्हणाला कि तू कितीही प्रयत्न केलेस तरी विनोद खन्नाला मिळवू शकत नाहीस,

भलेहि तू कितीही प्रयत्न कर. अमृता सिंहला रवी शास्त्रीचे हे वागणे आवडले नाही आणि तिने या गोष्टीला एक आव्हान म्हणून स्वीकारले आणि बटवारा चित्रपटाच्या आउटडोर शूटिंग दरम्यान विनोद खन्नाला इंप्रेस करू लागली.

तिचे हे प्रयत्न यशस्वी झाले आणि तिची विनोद खन्नासोबत दोस्ती झाली. आव्हान जिंकल्यानंतर अमृता सिंह रवी शास्त्रीजवळ आली, पण काही कारणामुळे त्यांचे हे रिलेशन तुटले.

काही महिने तिचा विनोद खन्नासोबत कोणताही संपर्क नाही राहिला. यानंतर दोघेही राजस्थानमध्ये एका चित्रपटाच्या शुटींगदरम्यान भेटले. इथे पुन्हा एकदा विनोद खन्ना अमृता सिंहकडे अट्रेक्ट होऊ लागले आणि असे म्हंटले जाते कि इथेच त्यांच्या प्रेमाची सुरवात झाली.

दोघेही एकत्र खूप खुश होते पण अमृताची आई रुखसाना बेगमला हे नाते मान्य नव्हते. या दोघांच्या वयामध्ये खूप अंतर होते आणि विनोद खन्ना घटस्फोटीतसुद्धा होते. अमृता सिंह विनोद खन्नापेक्षा ११ वर्षाने लहान होती.

काही कारणामुळे यांच्यामध्ये हळू हळू अंतर वाढू लागले आणि नंतर दोघेही वेगळे झाले. १९९० मध्ये विनोद खन्नाने कविता खन्ना सोबत दुसरे लग्न केले. तर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजेच १९९१ मध्ये अमृता सिंहने आपल्यापेक्षा १२ वर्षाने लहान सैफ अली खानसोबत लग्न केले.