Breaking News

‘रणवीर सिंह’ आणि ‘दीपिका पादुकोण’ने जन्माष्टमीला दिली खुशखबर, हे आहे खरे कारण

बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या अभिनय कौशल्यामुळे तसेच वैद्यकीय आयुष्यामुळे देखील चर्चेत येत असते. दीपिका पदुकोणने प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग सोबत विवाह केला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वात अनेक जोडप्यांनी चाहत्यांसाठी खूशखबर दिली आहे. आता या यादीत अभिनेत्री दीपिका आणि रणवीरच्या नावाचा समावेश झाला आहे.

भारतीय संस्कृतीची सर्वात खास गोष्ट अशी आहे की, जेव्हाही आपण काहीतरी नवीन सुरू करतो, त्याआधी आपण पारंपरिक पद्धतीने पूजा करतो. कोणतीही नवीन सुरुवात करण्यापूर्वी आपण देव आणि पूर्वजांचे आशीर्वाद घेतो आणि पुढे जातो. बॉलिवूड स्टार्सही भारतीय रितीरिवाज पाळतात. काल जेव्हा रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने त्यांच्या अलिबागच्या घरी प्रवेश केला तेव्हा त्यांनी भव्य पूजा केली, ज्याची झलक रणवीरने सोशल मीडियावर शेअर केली.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. ते आपल्या प्रेमळ क्षणांनी सर्वांची मने जिंकतात. लग्न झाल्यापासून दोघेही मुंबईत एका उंच इमारतीत राहतात. पण दोघांनी नुकतीच अलिबागमधील त्यांच्या नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. रणवीर आणि दीपिकाच्या कुटुंबीयांनीच पुजेला हजेरी लावली होती. रणवीरने त्याच्या इंस्टा स्टोरीज गृह प्रवेशची झलक दिली.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी अलीबाग येथील त्यांच्या नवीन घराची गृहप्रवेश पूजा केली. दोघेही या पूजेला एकत्र बसले होते. रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर या पूजाचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये रणवीर दीपिकासोबत दिसत आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आता अलिबागमध्येही एका आलिशान व्हेकेशन होमचे मालक बनले आहेत.

यावेळी दोघांनी विधिवत पूजा केली. या पॉवर कपलने त्यांच्या लाखो चाहत्यांसाठी या पूजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दीपिका आणि रणवीरने त्यांच्या घराची पहिली झलक चाहत्यांसाठी शेअर केली आहे. पहिल्याच फोटो दोघेही एकत्र बसून पुजा करताना दिसत आहेत.

दोघांनीही एका फोटोत घराच्या दाराची झलक दाखवली आहे. यासोबतच रणवीरने इथल्या सर्व पूजेचे फोटोही शेअर केले आहेत. रणवीर सिंगने नुकतेच मुंबईतील वांद्रे येथे 119 कोटी रुपयांना आकर्षक सी-फेसिंग क्वाड्रप्लेक्स खरेदी केले. असे म्हटले जाते की हे सलमान खानचे अपार्टमेंट गॅलेक्सी आणि शाहरुख खानच्या मन्नतमध्ये आहे. त्यावेळी ही बातमीही चर्चेत होती.

दीपिका पदुकोणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच शाहरुख खानसोबत ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत जॉन अब्राहमही दिसणार आहे. याशिवाय दीपिका अमिताभ बच्चन आणि प्रभाससोबत नाग अश्विनच्या पुढील चित्रपटाचे शूटिंग करत आहे. याशिवाय ती पुन्हा एकदा ‘द इंटर्न’च्या हिंदी रिमेकमध्ये अमिताभ बच्चनसोबत काम करणार आहे.

About gayatri dheringe

Check Also

242 करोड़च्या प्लेनमध्ये फिरते ‘नीता अंबानी’, ते प्लेन आहे की 5 स्टार होटल बघा फोटो

प्रचंड पैसा आणि संपत्ती असावी, असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. त्यासाठी प्रत्येकजण दिवस रात्र कष्ट …

Leave a Reply

Your email address will not be published.