राजमाता जिजाऊ या प्रसिद्ध सिरीयलच्या निर्मात्याची मुलगीसुद्धा आहे एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

Marathi Cinema

झी मराठी वरील सिरीयल स्वराज्य रक्षक संभाजी या सिरीयलने खरा इतिहास दर्शकांच्या समोर ठेऊन या सिरीयलने दर्शकांची मने जिंकली आहेत.

सिरीयल मधील दिग्गज कलाकार आणि कार्तिक केंढे, विवेक देशपांडे या दिग्दर्शकांनी पार पाडलेली आपली चोख कामगिरी हिच या सिरीयलची विशेष बाब आहे.

सिरीयलचे निर्माते विलास सावंत यांनीहि या मालिकेमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.

याशिवाय राजमाता जिजाऊ या सिरीयलचे देखील ते निर्माते आहेत हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही सुद्धा चकित व्हाल.

निर्माते असूनदेखील ते सिरीयलच्या सेटवर हवी ती मदत करायला नेहमीच तयार असताना ते पाहायला मिळतात हीच त्यांची विशेष बाब आहे.

याआधी विलास सावंत यांनीदेखील सिरीयलमध्ये भूमिका साकारली आहे. विलास सावंत यांच्या पत्नीचे नाव अमृता सावंत असून त्यांना तीन मुले आहेत.

विलास सावंत यांची मोठी मुलगी हि मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नामवंत अभिनेत्री असून दर्शकांमध्ये तिला खूप पसंत केले जाते. तिचे नाव पूजा सावंत असे आहे.

पूजा सावंत हि मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री मानली जाते. तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

इतकेच नव्हे तर जंगली या बॉलीवूड चित्रपटामध्ये तिने विद्युत जमवालसोबत मुख्य भूमिका साकारली आहे. क्षणभर विश्रांती या मराठी चित्रपटामधून तिने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.

लपाछपी, भेटली तू पुन्हा, दगडी चाळ, नीलकंठ मास्तर, पोस्टर बॉईज, सतरंगी रे, वृंदावन यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये ती आपल्या अभिनय करताना पाहायला मिळाली आहे.

पूजाला एक छोटी बहिण असून तिचे नाव रुचिरा आहे. रुचिरा हि हुबेहूब तिची मोठी बहिण पूजा सारखीच दिसते.

वडिलांप्रमाणेच पूजालाही निर्मिती क्षेत्रामध्ये हात अजमावण्याची इच्छा आहे. येत्या काळामध्ये ती आपल्या निर्मिती क्षेत्रामध्ये काम करताना पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.