सोशल मीडिया आणि बाॅलिवूड यांचं एक वेगळच नातं निर्माण झालं आहे. कलाकार छोटे असो किंवा मोठे असो ते नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपण आजपर्यंत पाहिले आहे. काही कलाकार अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ यक्ष मिळवतात. तसेच काही कलाकार आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यातलीच एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोप्रा.
प्रियांका चोप्राचे नाव जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये घेतले जाते. तिचे चाहते या अभिनेत्रीला ब्युटी विथ ब्रेन ही पदवी देऊन सन्मानित करतात. पण यावेळी प्रियांका चोप्राच्या समोर आलेल्या फोटोंमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. प्रियांका स्वतःचे आणि पती निक जॉन्ससोबतचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करताना मागचा पुढचा विचार करत नाही.
प्रियांका अगदी बिंधास्त पण चाहत्यांशी सगळे फोटो शेअर करत असते. प्रियांकाने केलेल्या प्रत्येक पोस्टला लाखो लाईक आणि कमेंट्स येतात. अभिनेत्री प्रियंका चोप्राचे फॅन फॉलोईंगमध्ये दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. प्रियांका चोप्राच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रियांका चोप्रा निक जॉन्सला खूप दिवस डेट करत होती. त्यानंतर तिने निक जॉन्सशी लग्न केले. प्रियांका चोप्रा आणि निक जाॅन्स 1 डिसेंबर 2018 रोजी विवाह बं’धनात अडकले.
दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत आणि दररोज सोशल मीडियावर आपला आनंद शेअर करत असतात. लग्नानंतर प्रियंकाने एका मुलीला जन्म दिला असून, मुलीचे नाव मालती आहे. प्रियांका चोप्रा देखील तिच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. जेव्हा जेव्हा प्रियांका चोप्रा तिचा पती निक जॉन्स किंवा तिची मुलगी मालतीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करते तेव्हा चाहते तिच्यावर प्रेम करतात आणि प्रियांका चोप्रावर प्रेमाचा वर्षाव करतात.
मात्र नुकत्याच आलेल्या फोटोमध्ये प्रियांका चोप्राने चाहत्यांची निराशा केली. प्रियांकाला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. याचे एक कारण म्हणजे प्रियांका चोप्राने तिचे वाढलेले वय पाहता तिच्या चेहऱ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया केली आहे. पण या शस्त्रक्रियेमुळे प्रियांका चोप्रा पूर्णपणे वेगळी आणि थोडी विचित्र दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले. प्रियांका चोप्रावर वाढत्या वयाचा प्रभाव फोटोत स्पष्ट दिसत आहे.
प्रियंका चोप्रा तिच्या दमदार अभिनयामुळे सातासमुद्रापलिकडे पोहोचली आहे. पण तिच्या खाजगी आयुष्यामुळे देखील ती चर्चेचा विषय ठरत असते.२००० साली प्रियांकाने ‘मिस वर्ल्ड’ हा किताब पटकावला आहे. त्यानंतर तिला बॉलिवूडमधे अनेक चित्रपटांची ऑफर्स मिळाल्या. २००३ साली ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ या स्पाय’ या हिंदी चित्रपटातून प्रियंकाने बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं. ‘अंदाज’ चित्रपटातील तिच्या भूमिकेने तिला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
प्रियांका चोप्रा विषयी बोलायचं झालं, तर प्रियांका लवकरच सिटाडेल या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. त्याची निर्मिती रुसो ब्रदर्सने केली आहे. त्याचबरोबर बऱ्याच काळानंतर ही अभिनेत्री देखील बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’मधून ती कमबॅक करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्टसह आणखी दोन अभिनेत्रीही असतील.