आजकाल सोशल मीडियावरुन छोट्या मोठ्या बातम्या सतत समोर येत असतात कारण हे युगच सोशल मीडियाचे आहे. आज अशीच एक आदर्श वाटेल अशी बातमी समोर आली आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे, की आजकाल भारतात लग्नाचा मौसम चालू आहे आणि लग्न म्हटले की विवाह सोहळ्यात काहीतरी नवीन करण्याचे प्रत्येकाचे प्रयत्न असतात व ते वेगळेपण हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
तसे पहिले तर लग्नाच्या पत्रिकेत वैयक्तिक माहिती व परिवाराची माहिती असते. परंतु उत्तर प्रदेश मध्ये अलीकडे एका लग्न पत्रिकेवर असे काही छापले गेले आहे की तो आता लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
या पत्रिकेचे वेगळेपण हे आहे, की यामध्ये लग्नाच्या संबंधीत मजकूर आहेच पण त्याशिवाय एक सामाजिक संदेशही छापला गेला आहे. त्यामुळे या पत्रिकेचा आता जोरदार चर्चा चालू आहे. या पत्रिकेत असे काय लिहिले आहे ते आपण जाणून घेऊया.
तसे तर आजकालच्या विवाहाच्या तयारीत काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याची पद्धत किंवा फॅशन आली आहे. यामध्ये लोक “डेस्टिनेशन वेडिंग” “वेडिंग ड्रेस” यासारखे कितीतरी नवीन प्रयोग करत आहेत. पण उत्तर प्रदेशामध्ये एक अनोखा प्रयोग केला गेला आहे, जो समाजासाठी एक आदर्श उदाहरण ठरणार आहे.
ही गोष्ट आहे, यूपीच्या कन्नौज जिल्ह्यातील. तिथे एका वडिलांनी मुलीच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेवर महत्वाची माहिती दिलीच पण त्याबरोबर एक सामाजिक संदेशही लिहिला आहे. कन्नौज जिल्हा, तलाग्राम येथील या शेतकरी असलेल्या वडिलांनी मुलीच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेवर एक सामाजिक संदेश छापला आहे. तो आहे “मद्यपान करण्यास मनाई आहे” असा विचार करायला लावणारा संदेश त्यांनी लिहिला आहे.
या त्यांच्या हुशारीमुळे त्यांच्या या गोष्टीचे कौतुक होत आहे. कर्तव्याबरोबरच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपून जो सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी प्रत्येकजण त्याचे कौतुक करीत आहेत. त्यामुळे हा विषय संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे.
कन्नौज मधल्या तलाग्रामचे अवधेश चंद्र म्हणतात की “त्यांनी हे पत्रिकेवर लिहिले आहे, कारण अनेक वेळा लोक मद्य पिऊन सन्मान विसरुन लग्नाच्या कार्यक्रमात गोंधळ घालतात. अशावेळी परिस्थिती बिकट होते व विवाह सोहळ्याच्या रंगाचा बेरंग होतो. म्हणून दारू न पिण्याचे आव्हान त्यांनी या पत्रिकेतून केले.
म्हणून या गावातील सगळे लोक अवधेश चंद्र यांचे खूप कौतुक करीत आहेत आणि लोकांचे मत आहे, की इतर लोकांनीही असे केले, तर दारू पिण्यार्यांदवर थोडा परिणाम होईल व या कृत्याला आळा घालता येईल. लग्नाला येताना लोक दारू किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन घरून करूनच येतात.
आजच्या काळात बर्या च विवाह सोहळ्यांमध्ये कॉकटेल पार्टी आणि नशिल्या पदार्थांची स्वतंत्र व्यवस्था केलेली असते, त्यामुळे लोकांना तेथे मादक पदार्थ वापरण्याची संधि उपलब्ध होते व त्यांना प्रोत्साहन मिळते. अशा परिस्थितीत विवाह पत्रिकेवर अशा प्रकारची चेतावणी देणारे वाक्य लिहून अवधेश चंद्र यांनी लोकांसमोर एक आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
लोक लग्नात पैशाची उधळपट्टी म्हणजेच लाखो रुपये खर्च करतात परंतु या वडिलांनी एक नवीन आदर्श जगासमोर ठेवला आहे, त्यामुळे प्रत्येकजण त्यांचे कौतुक करीत आहेत. त्यांना हे माहित आहे की जर समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखून असा दृढनिश्चय केला तर समाजातील वाईट प्रवृतींना आळा बसण्यास मदत होईल.