बॉलिवूडचा बादशहा असणाऱ्या शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिला आज कोण ओळखत नाही. शाहरुख खानसोबतच मनोरंजन विश्वात गौरी खान हिचं देखील खूप मोठं नाव आहे. गौरी खानने मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गौरी खानने कित्येक बडे चित्रपट प्रोड्युस तर केलेच आहेत परंतु तिने अनेक सेलेब्रिटीजची घरं देखील डिझाईन केली आहेत.
गौरीने इंटेरीयर डिझायनरचे शिक्षण घेतले आहे. सध्या गौरी फैब्युलस लाईव्स ऑफ बॉलिवूड वाईव्स मध्ये काम करत आहे. शाहरुख खान आणि गौरीची लवस्टोरी शालेय दिवसांपासून सुरू झाले होती, मात्र दोघांच्या कुटुंबीयांना याची माहिती कॉलेजच्या दिवसांमध्ये झाली. गौरी हिंदू कुटुंबातील होती तर शाहरुख मुस्लिम कुटुंबातील होता. जेव्हा शाहरुख आणि गौरी एकमेकांशी लग्न करणार होते.
तेव्हा शाहरुख टीव्ही शो फौजीमध्ये काम करणार होते. असे असूनही गौरीचे कुटुंबीय या लग्नासाठी तयार नव्हते. बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानने गौरीसोबत प्रेमविवाह केला होता. त्यांच्या नात्यात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. 25 ऑक्टोबर 1991 रोजी दोघांनी लग्न केले आणि सध्या ते आर्यन, सुहाना आणि अबरामचे पालक म्हणून आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत.
नेटफ्लिक्स वरील गौरीची ही सिरीज सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनत आहे. या सिझनचा पहिला भाग चांगलाच गाजला होता. पहिल्या सिझनप्रमाणे सध्या चालू असलेल्या दुसऱ्या सिझनला देखील लोकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं आहे. गौरी खानचे खरे नाव गौरी छिब्बर आहे. गौरीचा जन्म दिल्लीजवळील होशियारपूर येथील पंजाबी ब्राह्मण कुटुंबात झाला.
बालपण दिल्लीच्या पंचशील पार्कमध्ये गेले आणि सुरुवातीचे शिक्षण लॉरेटो कॉन्व्हेंट स्कूलमधून झाले. पुढे मॉडर्न स्कूलमध्ये प्रवेश घेतला. या शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये करण जोहर देखील गौरी खानसोबत दिसत आहे.या शोदरम्यान करणने शाहरुख खान आणि गौरी खानबाबत एक मोठा खुलासा केला आहे. करणने या खुलाश्यानंतर गौरीची माफी देखील मागितली.
शोमध्ये बोलताना करणने सांगितलं की, पँडेमिकच्या काळात शाहरुख घरामध्ये बसून होता. परंतु यावेळी घरात गौरी खान घरात एकमेव सदस्य होती जी पैसे कमवत होती. यावेळी करणने आणखी देखील काही खुलासे केले आहेत. दरम्यान, शाहरुख मागील चार वर्षांपासून चित्रपटांपासून लांब आहे. शाहरुखची मुले सध्या शिक्षण घेत आहेत. अशा परिस्थितीत सध्या केवळ गौरी घरामध्ये एकमेव कमावणारी व्यक्ती आहे.
गौरी तिचं काम अगदी जोमाने करत आहे. 2018 मध्ये शाहरुख ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. यानंतर पूढे शाहरुख कोणत्याच चित्रपटात दिसला नाही. यानंतर मधल्या काळात शाहरुखने बॉलीवूड मधून ब्रेक घेतल्याचं बोललं जातं आहे. लवकरच शाहरुख तीन मोठ्या चित्रपटांत दिसणार आहे.