दीपिका पल्लीकल ही पहिली भारतीय महिला आहे जिने स्क्वॅश वर्ल्ड रैंकिंग मध्ये पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. तिचा जन्म २१ सप्टेंबर १९९१ रोजी चेन्नई येथील मल्याळी कुटुंबात झाला होता तिची आई सुझान पल्लीकल ही भारतीय क्रिकेट संघाकडून खेळली होती.
तिची आई आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असूनही दीपिकाला क्रिकेटवर फार राग आहे. असे असूनही ती एका क्रिकेटरच्या प्रेमात पडून तिने त्याच्यासोबत लग्न देखील केले.आम्ही येथे दीपिका पल्लीकल आणि आयपीएलमधील केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगणार आहोत या दोघांचीही लव्हस्टोरी काही चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही या दोघांचे प्रेम खूप खास आहे.
दोघांचा ध*र्म हा वेगळा होत आणि एकाला क्रिकेटचा तिरस्कार होता तर दुसऱ्याला एका प्रेमामध्ये फसवले गेले होते अजून दीपिकाची आई दोघांच्या नात्याविरूद्ध होती असे असूनसुद्धा ते दोघे एकत्र आले.
दिनेश कार्तिकने दीपिकाला समजावण्यासाठी दररोज जिममध्ये जायचा दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की जेव्हा कार्तिकने तिला पहिल्यांदा मेसेज केला तेव्हा त्याने हाय हॅलो नंतर सरळ डिनर डेट जाण्यासाठी विचारले त्यावेळी दीपिकाला कार्तिकचा स्वभाव माहित नव्हता म्हणूनच तिने कार्तिकची ऑफर नाकारली तरीपण दिनेशने प्रयत्न सोडले नाहीत.
तो सतत दीपिकाला मेसेज करत राहिला ती वारंवार त्याकडे दुर्लक्ष करत राहिली तरीपण दीपिका तिच्या व्यस्त वेळापत्रकाचे कारण सांगून दिनेशला टाळत राहिली मोकळ्या वेळेतही दिनेशशी बोलणे तिला आवडत नव्हते. एकदा कार्तिकने तिला डेडसाठी विचारले त्यावर तिने सांगितले की सकाळी तिची फ्लाइट आहे पण दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिक परत तिला जिममध्ये भेटला.
दीपिका चकीत झाली तिला काय उत्तर द्यायचे हे समजत नव्हते मग दीपिकाने खोटे सांगितले की आज माझी फ्लाइट नाही तर उद्या आहे माझ्याकडे फक्त सकाळ ७ वाजेपर्यंत वेळ आहे दिनेश फक्त संधी शोधत होता त्याने दीपिकाकडे काही तास मागितले त्यावेळी मात्र दीपिकाला कार्तिकबरोबर डेटवर जाण्यास भाग पडले.
मात्र जेव्हा दीपिकाच्या आईला हे सर्व कळले तेव्हा त्यांना फार राग आला कारण कार्तिक हिंदू होता आणि त्याचा याआधी घटस्फो*ट देखील झाला होता म्हणजे दिनेशचे पूर्वी लग्नही झाले होते. ज्यावेळी दिनेशला दीपिकाच्या आईची नाराजगी कळाली तेव्हा त्याने स्वत: सुसान पल्लीकल यांना भेटण्याचे ठरविले.
दिनेश कार्तिक हा दीपिकाच्या आईला भेटला खूप समजवल्यानंतर दीपिकाची आई तयार झाली. त्यानंतर ते दोघेही जवळजवळ दोन वर्ष लिव्हइनमध्ये राहिल्यानंतर मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
तुम्हाला माहित आहे का दिनेश कार्तिकने २००७ मध्ये बालपणीची मैत्रीण निकिताशी लग्न केले होते निकिता काही वर्षांनंतर ग र्भवती झाली वडील झाल्याबद्दल कार्तिकला खूप आनंद झाला होता.
परंतु नंतर एका बातमीने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला हे कळाले की निकिताने टीम इंडियातील त्याचा मित्र मुरली विजयच्या प्रेमात पडली होती.
एका बातमीनुसार २०१२ च्या आयपीएल दरम्यान निकिता आणि विजयची जवळीक वाढली हे सर्व कळल्यावर कार्तिकचे हृदयच तुटले. सत्य कळल्यावर त्याने उशीर न करता निकिताला घटस्फो*ट दिला त्यानंतर निकिताने मुरली विजयशी लग्न केले.