पाकिस्तान सोबत संबंध ठेवतो ?.. “घर-घर में मशहूर कसौटी” मधील अनुराग?

Bollywood

अनुराग बासू म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेता सिजेन खान आज ग्लॅमर आणि फिल्मी जगातून गायब झाला आहे. मूळचा पाकिस्तानचा सिजेन खान भारत सोडून परत पाकिस्तानात मध्ये स्थायिक झाला आहे. त्याने येथे आपल्या अभिनय कारकिर्दीला निरोप दिला आहे.

आज त्याचा चेहरा रुपेरी पडद्यावर दिसत नसला तरी कसौटी मधल्या अनुराग चे नाव घेताच पहिला डोक्यात त्याच्या चेहरा येतो.  28 डिसेंबर रोजी त्याचा वाढदिवस असतो. सिजेन खानच्या काही मनोरंजक गोष्टी जाणून घ्या.

सिजेनचे वडील रईस खान हे पाकिस्तानचे प्रसिद्ध सितार वादक आहेत. त्याची आई तसनीम खान एक इंटिरियर डिझायनर आहे. मजेची गोष्ट अशी की पाकिस्तानचा रहिवासी असूनही सीजेनचा जन्म भारतात झाला. सीजेनचा जन्म मुंबईत झाला होता.

सिजेंनचे नाव प्रसिद्ध फ्रेंच चित्रकार पॉल सीजेन यांच्या नावावर आहे. त्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नाशिकच्या देवळाली येथील बार्नस स्कूलमध्ये केले आणि त्यानंतर त्याने वांद्रे येथील एमएमके कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली.

एक्ट‍िंग करियरबद्दल बोलताना सिजेनने 1997 मध्ये हसरतें या मालिकेतून टीव्हीमध्ये पदार्पण केले होते. यानंतर पलछिन कलीरें दुश्मन आप-बीती या मालिकेत तो दिसला होता. त्यानंतर 2001 मध्ये एकता कपूरने त्याला कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकेमधून ब्रेक दिला. ही मालिका त्याच्या करियर मधील महत्त्वाचा टप्पा ठरली.

2007 पर्यंत कसौटी मध्ये काम केल्यानंतर त्याने आणखी दोन मालिका केल्या. 2001 ते 2007 दरम्यान ते आणखी काही मालिकांमध्ये दिसले. क्या हादसा क्या हकीकत हम 2 हैं ना पिया के घर जाना है एक लड़की अनजानी सी और सीता और गीता यामध्ये त्याने अभिनय कौशल्य दाखविले आहे. सीजेनने बर्‍याच पाकिस्तानी मालिकांमध्येही उत्तम अभिनय केला होता.

सिजेन टीव्हीमध्ये न दिसल्यामुळे चाहते अनेक वेळा अस्वस्थ झाले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाला बर्‍याच दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत सिजेंन म्हणाले होते की कसौटी मधील त्याची भूमिका केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्येही प्रेक्षकांना आवडली होती. त्याला रियलिटी शोसाठी ऑफर देखील मिळाल्या पण करण्यास तो डेली सोप्स करण्यामधेच अधिक कंफर्टेबल आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार त्याने एका मुलाखतीत कसौटी च्या रीबूट बद्दल प्रतिक्रिया दिली. सिजेन म्हणाला मला लोकप्रियता आणि यश मिळवून देणारी ती मालिका मी कशी विसरू शकतो. हा त्या मालिकेला रीबूट करण्याची कल्पना ताजी आणि शानदार आहे.

तसेच तो आपल्या सहकलाकार श्वेता तिवारी आणि उर्वशी ढोलकिया यांच्याशी संपर्कात नसून तर दीपक काझीर आणि अंकुर नय्यर यांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.