Breaking News

पहिल्यांदाच कॅटरीना कैफसोबतच्या आपल्या रिलेशनशिपबद्दल बोलला विक्की कौशल, उघड केली इतकी मोठी गोष्ट

विक्की कौशल बॉलीवूडमधील एक मोठे नाव बनले आहे. उरी, मनमर्ज़ियां, मसान सारख्या चित्रपटामधून विक्कीने खूपच प्रसिद्धी मिळवली आहे. नुकतेच उरी या चित्रपटासाठी त्याला बेस्ट अॅ क्टरचा राष्ट्रीय अॅकवॉर्ड देखील मिळाला आहे.

सध्या विक्की आपल्या आगामी भूत पार्ट वन: द हौंटेड शिप या चित्रपटामुळे खूप चर्चेमध्ये आहे. हि पहिलीच वेळ आहे जेव्हा विक्की हॉरर चित्रपटामध्ये आपले नशीब अजमावत आहे.

काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता ज्याला दर्शकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. अशामध्ये दर्शक विक्कीच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

कॅटरीनासोबत रिलेशन

चित्रपटाशिवाय सध्या विक्की कौशल बॉलीवूड अभिनेत्री कॅटरीनासोबतच्या रिलेशनमुळे देखील खूप चर्चेमध्ये आला आहे. विक्की आणि कॅटरीना नेहमी एकत्र इवेंट किंवा पार्टीमध्ये पाहायला मिळत आहेत,

परंतु दोघांच्या मधील जवळीक पाहून स्पष्टपणे म्हणून शकतो कि या दोघांमध्ये काहीना काही सुरु आहे. अशामध्ये पहिल्यांदाच विक्कीने कॅटरीनासोबतच्या आपल्या रिलेशनशिप बद्दल मौन सोडले आहे.

अफेयरबद्दल उघड केली हि गोष्ट

नुकतेच विक्की कौशलने बॉलीवूड हंगामासोबत बातचीत केली. यादरम्यान तो म्हणाला कि, मला खरेच माझ्या पर्सनल लाईफला गार्ड करायचे आहे कारण जर तुम्ही याबद्दल बोलत असाल तर यामुळे या गोष्टी खूप वाढतात.

आणि यानंतर गैरसमज पसरतात आणि मला माझ्या लाईफमध्ये असे काही नको आहे. विक्की आपले म्हणणे पुढे मांडताना म्हणाला कि, माझे असे मानणे आहे कि, मी माझ्या पर्सनल लाईफसाठी खूप सावध राहावे आणि मला सध्या कोणत्याही गोष्टीवर उघडपणे बोलायचे नाही.

हॉरर चित्रपटामध्ये पाहायला मिळणार

गेल्या बऱ्याच काळापासून विक्की कॅटरीनासोबतच्या रिलेशनशिपबद्दल खूप चर्चेमध्ये आहे. नव्या वर्षामध्ये हि बातमीदेखील आली होती कि दोघांनी आपले नवीन वर्ष एकत्र सेलिब्रेट केले होते.

वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर धर्मा प्रोडक्शनचा भूत पार्ट वन: द हौंटेड शिप चित्रपट २१ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भानु प्रताप सिंहच्या दिग्दर्शनाखाली बनवण्यात आला असून प्रोड्यूसर करण जौहर आणि शशांक खेतान आहेत.

रियल स्टोरीवर आधारित आहे चित्रपट

हा चित्रपट एका रियल स्टोरीवर आधारित आहे ज्याची स्टोरी एक हंटेड शिपच्या अवतीभोवती फिरत आहे. चित्रपटामध्ये विक्कीशिवाय आशुतोष राणा आणि भूमि पेडनेकरसुद्धा आहेत.

सध्या विक्की कौशल या चित्रपटाच्या जोरदार प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच तो बिग बॉसच्या घरामध्ये आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचला होता. तर काही दिवसांपूर्वी विक्की कौशल आणि नोरा फतेहिचे बड़ा पछताओगे गाणे सुपरहिट झाले होते जे अरिजीत सिंहने गायले होते.

आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे कि सुपरहिट चित्रपटांची लाईन लावणारा विक्की कौशल आपल्या आगामी चित्रपटाने दर्शकांचे मन जिंकण्यात यशस्वी होतो का नाही.

About admin

Check Also

ए’म’ए’मए’स कांडवर रडणारी अंजलीने एका रशियन पुरुषासोबत वेळ घालवण्यासाठी मागितले होते पाच हजार रुपये, जाणून व्हाल थक्क!

सोशल मीडिया हे असे एक प्लॅटफॉर्म आहे,जिथे क्षणाक्षणाला नवीन गोष्टी अपलोड होत असतात. अनेक फोटो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *