बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असते. कधी हॉट आणि ग्लॅमरस फोटो, तर कधी जबरदस्त डान्समुळे नोरा फकेही सोशल मीडियावर चर्चेत असते. पण आता ज्या कारणांमुळे नोरा फतेही चर्चेत आली आहे, ते चाहत्यांना चकीत करणारं आहे.
दिलबर दिलबर या गाण्याने लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे नोरा फत्ते होय. नोराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. नोराचे नाव इंडस्ट्रीतील टॉप डान्सर्सपैकी एक आहे. तसेच, एक काळ असा होता जेव्हा नोरा वेटर म्हणून काम करायची. होय, ही गोष्ट तेव्हा घडली जेव्हा नोरा फक्त १६ वर्षांची होती आणि ती कॅनडामध्ये राहायची.
नोराने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने १६ ते १८ वयोगटात वेट्रेस म्हणून काम करून काही अतिरिक्त पैसे मिळवले. नोराने असेही सांगितले होते की, वेट्रेसचे काम सोपे नाही, परंतु त्यासाठी मजबूत स्मरणशक्ती तसेच चपळता आणि अतिशय चांगले संवाद कौशल्य आवश्यक आहे. नोरा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
नोरा कधी जिममधून बाहेर फिरताना तर कधी सेटवर पोहोचताना नोरा अनेकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या अभिनेत्री नोरा डान्स दिवाने ज्युनियर्स या रियालिटी शोमध्ये जजच्या भूमिका बजावताना दिसते. या शोमध्ये ती अनेकदा नीतू कपूर, मारझी पेस्टनजी आणि टेरेन्स लुईससोबत खूप मस्ती करताना दिसत आहे.
अलीकडेच नोराचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यात अभिनेत्री नोरा तयार होताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री नोरा साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तर नोरा क्रिकेट खेळताना दिसत आहे. या सगळ्यामध्ये अभिनेत्री नोरा फतेही प्रेग्नंट असून त्याबाबत स्पष्टीकरण देत असल्याच्या बातम्याही चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर नोरा विषयी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये सर्व न्या’याधीश बोलत होते. या व्हिडीओमध्ये मार्झी बोलताना सांगितले – त्यामुळे आम्ही गरोदरपणाच्या गोष्टींबद्दल बोलण्यात व्यस्त आहे. नोरा स्वतःला पाहण्यात आणि व्यवस्थीत करण्यात व्यस्त आहे. यावर अभिनेत्री नोराने मजेशीरपणे उत्तर दिले – कारण मी प्रेग्नंट नाही. यावर ती म्हणते- अरे, हे जगाला सांगितल्याबद्दल धन्यवाद. हे ऐकून नोरा हसायला लागते.
नोराच्या आता या हसणार्या विनोदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर लोकांना वाटू लागले की अभिनेत्री नोरा प्रेग्नंट आहे. दरम्यान, नंतर हे सत्य समोर आले की सर्व न्या’याधीश प्रत्यक्षात नीतू कपूरची सून आणि अभिनेत्री आलियाच्या गर्भधारणेबद्दल बोलत होते. खरं तर, अलीकडेच आलियाने इंस्टाग्रामवर सर्वांना सांगितले की, ती आई होणार आहे .
View this post on Instagram