मलाइका अरोड़ाच्या अगोदर ह्या अभिनेत्रींना हि अर्जुन कपूर करून बसला आहे डेट, एक होती मलाइकाची …

Bollywood

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर अनेकदा मलायकाशी असलेल्या त्याच्या ना-त्याबद्दल चर्चेत राहत असतो. अरबाज खानबरोबर घटस्फो-ट झाल्यापासून म-लायका अरोरा अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे जोडपे नेहमीच एकमेकांसोबत हात हात घालून फिरताना दिसून येतात.

आमच्या सूत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार हे दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. पण तुम्हाला माहिती आहे काय की मलायका अरोरापूर्वीही अर्जुन कपूरचे बर्‍याच अभिनेत्री सोबत सं-बंध होते. त्याची एक जुनी गर्लफ्रेंड ही मलायका अरोराची नातेवाईकच आहे. चला तर मग अर्जुन कपूरच्या जुन्या गर्लफ्रेंड्स बद्दल तसेच मलायकाची नातेवाईक असलेल्या त्याच्या त्या गर्लफ्रेंडबद्दल जाणून घेऊया.

१. आलिया भट्ट:- आपण अनेकदा अर्जुन कपूर आणि आलिया भट्ट यांना एकत्र चित्रपटात काम करताना पाहिले आहे. काही वर्षांपूर्वी दोघे एकमेकांना डेट करत असल्याची बातमी मिळाली होती. मात्र, काही काळानंतर ते दोघे वेगळे झाल्याची बातमी समोर आली. त्याचवेळी या दोघांनीही याला केवळ अ-फवा असल्याचे म्हटले आहे.

२. परिणीती चोप्रा:- परिणीती चोप्रा अर्जुन कपूरची पहिली अभिनेत्री होती हे आपल्याला माहित आहे. दोघांनीही आपल्या करीयरची सुरूवात इ-श्कजादे या चित्रपटापासून केली. हा चित्रपट सुपरहि-ट ठरला होता. असे चित्र होते की चित्रपटाच्या सेट दरम्यान ते दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांनी एकेमेकांना डे ट करण्यास सुरुवात केली होती. मात्र हे प्र-करण फार काळ टिकले नाही आणि ते दोघे वेगळे झाले.

३. सोनाक्षी सिन्हा:- सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूर देखील एकत्र नाव जोडले जाते. जरी ते खरोखरच ना-त्यात होते किंवा फक्त अफवा समोर आल्या होत्या हे माहिती नाही. याबद्दल खरे फक्त त्या दोघांनाच चांगल्याप्रकारे ठाऊक असेल.

४. अनुष्का शर्मा:- विराट कोहलीशी लग्न करुन अनुष्का शर्मा आता खूप आनंदी आहे आणि लवकरच ती आई बनणार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. पण आता अर्जुन कपूरही मलायका अरोरासोबत खूष आहे. पण एका वेळी अनुष्का आणि अर्जुन यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते.

इतकेच नाही तर करण जोहरच्या टॉ क शो कॉफी विथ करणमध्ये अर्जुन कपूरने अगदी अनुष्का शर्माशी लग्न करण्याची इच्छा असल्याचे म्हटले होते. पण नंतर या गोष्टी थांबल्या.

५. अर्पिता खान:- फार कमी लोकांना माहित आहे की अर्जुन कपूर चित्रपटात येण्यापूर्वी सलमान खानची बहीण अर्पिता खानला देखील डे ट करत होता. खरे तर दोघांनीही एकत्र मिळून शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्याला माहित आहे की अर्पिता खान ही मलायका अरोराची नंनद राहिली आहे.

पुढे नंतर अर्जुन कपूर चित्रपटांकडे वळला आणि त्याच वेळी अर्पिता खानचेही लग्न झाले होते. अशा प्रकारे ते दोघे वेगळे झाले. तसेच वर्ष २०१४ मध्ये अर्जुनने एका मुलाखतीदरम्यान याचा खु-लासा केला होता. सलमानची बहीण अर्पितासोबत त्याच्या आयुष्याचा पहिला सं-बंध असल्याचे अर्जुनने कबूल केले होते.

त्याने म्हटले होते- माझा पहिला आणि आत्तापर्यंतचा चांगला सं*ba-ध अर्पिताबरोबर होता. जेव्हा मी 18 वर्षांचा होतो तेव्हा आम्ही एकत्र फिरत होतो. हे दोन वर्षे चालले.अर्पिताने तिच्या वतीने हे ना-ते संपवले होते.