आपल्या आजूबाजूला असे अनेक कपल असतात, ज्यांची लव्ह स्टोरी ऐकून अनेकदा आपण थक्क होऊन जातो. अनेकदा आपल्याला यांच्या बद्दल आश्चर्य देखील वाटते. या कपल जोडीचे प्रेम कसे आगळे वेगळे होते.
हे देखील ते लोक आपल्या लव्हस्टोरी मधून जगाला दाखवून देत असतात, अशीच एक लव स्टोरी बॉलीवूड क्षेत्रामध्ये देखील घडली होती. ही लव स्टोरी तुम्ही जर ऐकाल, वाचाल तर तुम्हाला देखील आश्चर्य धक्का बसेल.
मुन्नाभाईचा सर्किट आपल्या सर्वांना माहिती असेल. सर्किट या नावावरूनच तुम्हाला कळालं असेल की आपण कोणाबद्दल बोलत आहोत. या अभिनेत्याचे नाव आहे अरशद वारसी. अरशद वारसी ने आतापर्यंत बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिका देखील अरशद वारसी ने केलेल्या आहेत. २००३ मध्ये संजय दत्त यांचा चित्रपट “मुन्नाभाई एमबीबीएस” मध्ये सर्किट ची भूमिका केल्याने संपूर्ण विश्वामध्ये अरशद वारसी ने चहात्या वर्गाचे हृदय जिंकले होते.
आजही सर्किट म्हटले की आपल्या डोळ्यासमोर मुन्नाभाई यांची जोडी दिसून येते. या जोडीने एकेकाळी बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ देखील घातला होता. आज आम्ही तुम्हाला अरशद वारसी च्या बॉलीवूड करिअर बद्दल न सांगता त्याच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.
ज्या पद्धतीने हा कलाकार बॉलीवूडच्या स्क्रीनवर मोठ्या जोमाने जोशाने सक्रिय असतो त्याच दुप्पट वेगाने व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला सक्रिय पाहायला मिळतो, याची लव स्टोरी देखील अगदीच विचित्र आहे.
अरशद वारसी ने वर्ष 1999 मध्ये मारिया गोरेटी सोबत लग्न केले. या लग्न करिता अरशद वारसी ने स्वतः मारियाला प्रपोज केले होते, परंतु ही गोष्ट सांगताना मारिया गोंधलेली देखील होती. प्रपोज केल्यानंतर काही वेळ मारिया शांत होती.
मारियाला काय करावे याचा थांगपत्ता देखील लागत नव्हता. परंतु अशावेळी अरशद वारसी ने असे काही केले ज्यामुळे ती फटाफट बोलू लागली. या दोघांची भेट एका टॅलेंट शोवर झाली होती. येथे अरशद वारसी जज म्हणून आले होते. मारिया एक स्पर्धक म्हणून आली होती..
मारिया जेव्हा या कार्यक्रमांमध्ये स्पर्धक आली होती. तेव्हा मारियाला पाहून अरशद वारसी खूपच आनंदी झाला होता, म्हणून मग तो तिला लाईक देखील करत होता. कालांतराने ही दोघे चांगले मित्र बनले. मित्र बनल्यानंतर यांच्या भेटीघाटी होऊ लागल्या.
भेटीगाठीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले आणि त्यानंतर हर्षदने लग्नासाठी मारियाकडे प्रस्ताव देखील मांडला. लग्नाचा प्रपोज करण्याआधी त्यांची मैत्री अगदी वेगळ्या प्रकारे झाली होती. कार्यक्रमाच्या निमित्ताने एका डान्स ग्रुपमध्ये मारियाला त्यांनी डान्स करण्यासाठी बोलवले होते.
त्यानंतर कॉमन फ्रेंड च्या मदतीने यांच्या भेटी वाढू लागल्या आणि त्यानंतर दोघे एकमेकांना स्पेशल फील करू लागले. या मैत्रीचा प्रवास पुढे वाढू च लागला आणि दोघांना एकमेकाना आवडू लागले. अरशदने योग्य वेळ पाहून लग्नाचा प्रस्ताव मारिया समोर मांडला.
तिला प्रपोज देखील केले परंतु पहिल्या प्रयत्नात मारिया ने अरशद ला नकार दिला. तिला अजून लग्न करायचं नव्हते परंतु अरशद ला माहिती होते की मारियाला आपण आवडतो असे एका मीडिया ब्रीफिंग द्वारे तिला कळाले होते.
खरंतर अरशदने मारीयाच्या ड्रिंक मध्ये बियर मिक्स केली होती. ही बियर प्यायल्यानंतर नशेमध्ये मारियाने अरशदला तिच्या मनातले सांगितले आणि मारियाला अरशद बद्दल काय काय भावना आहेत याचा खुलासा देखील तिने केला…
मग काय त्यानंतर 1999 मध्ये या दोघांनी लग्न केले. हे लग्न मुस्लिम आणि ख्रिश्चन दोन्ही पद्धतीने झाले. सुरुवातीच्या काळात मारियाला या लग्नासाठी वि’रोध देखील झाला. आपल्या मुलीचे लग्न चित्रपट अभिनेत्या सोबत होत आहे, ही बाब घरच्यांना मान्य नव्हती.
परंतु अरशद ला भेटल्यानंतर मारियाच्या घरच्यांचे विचार बदलले आणि त्यांनी या लग्नाला होकार दिला, त्यानंतर संसार आनंदाने पार पडत आहे. दोघे ही आपल्या संसार मध्ये आनंदी आहेत. आजही अभिनेता अरशद आपल्या अभिनयाच्या जोरावर आपल्या चाहतांच्या हृदयावर राज्य करत आहे.