शिल्पा शेट्टी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की तिने २००० पासून अनेक विलक्षण चित्रपटांमध्ये काम केले आहे पण जेव्हा तिचे उद्योगपती राज कुंद्राशी लग्न झाले तेव्हापासून ती बॉलिवूडपासून दूर होत गेली आज शिल्पा चित्रपटांमध्ये काम करत नाही परंतु ती बर्याच टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम करत आहे शिल्पा तिच्या डान्स आणि फिटनेसमुळे बर्याच लोकांच्या मनावर राज्य करत आहे.
शिल्पा दररोज न चुकता योगा आणि व्यायाम करते. तिचे योगा आणि व्यायाम करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती अनेकवेळा सोशल मीडियावर शेअर करते.शिल्पा शेट्टीने बाजीगर या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिने त्यानंतर एकाहून एक हि ट चित्रपट दिले.
तिने धडकन, रिश्ते, गर्व, मैं खिलाडी तू अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटामध्ये तिने काम केले आहे. पण आता तिने आपल्या धडकन या हिट चित्रपटाविषयी बरेच काही खुलासे केले आहेत. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांत तिला बरेच रिजेक्शन मिळाले होते असं शिल्पाने सांगितलं आहे परंतु त्यानंतरही तिने कधीही हार मानली नाही.
नि-राश होण्यापेक्षा तिने स्वत: ला परिपूर्ण करण्याचा विचार केला त्यानंतर तिने बाजीगर या चित्रपटाद्वारे तिच्या करियरची सुरुवात केली ज्यामध्ये तीची एक महत्वाची भूमिका होती आणि ती सुपरहिट झाली. परंतु यानंतरही एक प्रकरण आहे ज्यामुळे आजही तिला अस्वस्थ वाटते याबद्दल तिने अलीकडेच बोलले आहे.
शिल्पाने सांगितले की तिला धडकन आणि फिर मिलेंगे या सुपरहिट चित्रपटासाठी तिला कधीच पुरस्कार मिळाला नाही आणि या चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळाली हीच खूप मोठी गोष्ट आहे असे ती म्हणाली माझे केस दाट होते.
आणि मी निळ्या रंगाचे लेन्स आणि रेड लिपस्टिक लावायचे जे माझ्यावर खूप चांगले दिसत असे पण मला कधीच पुरस्कार मिळाला नाही. विशेषत: धडकन आणि फिर मिलेंगे या चित्रपटासाठी मला पुरस्कार मिळायला हवं होता असे मी प्रामाणिकपणे सांगते.
हा पुरस्कार न मिळाल्याबद्दल ती म्हणाली की कदाचित लोकांनी तिला अभिनेत्री म्हणून कधी पाहिले नाही आणि हिट चित्रपटानंतरही तिची कारकीर्द इतकी वाढली नाही की ती म्हणते मला वाटतं मी योग्य दिशेने आहे. शिल्पा म्हणाली की कधीही नकार घेण्यास घाबरू नका कारण यामुळे आपण आणखी चांगले होत असतो.
जवळपास १९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला धडकन हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलाच सुपरहिट झाला होता. सुनील शेट्टी अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. धडकनची सुपरहिट जोडी शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टी सुपर डान्सर या रियालिटी शोच्या मंचावर एकत्र आले. यावेळी त्यांनी चित्रपटातील बऱ्याच आठवणी शेअर केल्या.
धडकन चित्रपटाच्या शू-टिंगसाठी तब्बल पाच वर्ष लागली होती. यामागचं कारण शिल्पाने सांगितलं की दिग्दर्शक ध र्मेश यांना तीन महिन्यांत चित्रपटाचं शू-टिंग पूर्ण करायचं होते. मात्र सुनील त्यावेळी दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बीजी होता. म्हणून सुनीलच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याला घेण्यात आले.
पण तो अभिनेता या भूमिकेसाठी सुनीलइतका योग्य वाटत नाही हे समजल्यावर ध-र्मेश यांनी शू-टिंग थांबवलं. पुन्हा सुनीलला घेऊन चित्रपटाची शू-टिंग पूर्ण करण्यात आली. असं करता करता शू-टिंग पूर्ण व्हायला तब्बल पाच वर्ष गेली.
देव ही भूमिका फक्त सुनीलसाठीच बनली होती असेही शिल्पानं सांगितले. यावेळी चित्रपटाच्या क्लायमॅक्सविषयी शिल्पाने खुलासा केला की धडकनचा क्लायमॅक्स वेगळाच होता पण चित्रपटाचा शेवट गोड व्हावा म्हणून तो बदलण्यात आला.
अंजली देवला सांगते की ती रामच्या बाळाची आई होणार आहे आणि त्यानंतर देवचा मृत्यू होतो. पण शेवट गोड करण्यासाठी अंजली रामच्या बाळाची आई होणार हे ऐकल्यावर देव महिमासोबत निघून जातो असं दाखवण्यात आले.