माझी स्टोरी : आमच लव्ह मॅरेज होत, पण खरं हे आहे की माझं पतीवर प्रेमच नाही…

Daily News

आपल्याला दैनंदिन जीवनात फार विचित्र प्रकारचे अनुभव कधीकधी ऐकायला, पहायला मिळतं असतात. परंतु काही घटना या इतक्या प्रमाणात विचित्र वाटतात की जणू आश्चर्य व्यक्त करावं तितकं कमीच. प्रेम म्हणजे काय? किंवा प्रेमाची प्रचिती देण्याचं परिणाम कोणतं? याची नेमकी ठाम उत्तरं शोधण्याऐवजी माणूस त्याच्या सोयीस्कर पद्धतीचं उत्तर शोधत राहतो.

आणि हव्या त्या स्वार्थी विचारांनी त्याच प्रेम व्यक्त होतं राहतं. प्रेम विवाह ही तर एक अशी गोष्ट जी की दोन व्यक्तींच्या एकमेकांवरील प्रेमाच्या भावनांखेरीज होऊ शकत नाही. प्रेम असते म्हणूनच तर हा प्रेमविवाह होतो. परंतु सध्या एक फारच खळबळ उडवून टाकणारी घटना घडलेली पहायला मिळते आहे. आणि तीदेखील चक्क एका नवविवाहित तरूणीच्या तोंडातून असे काही शब्द बाहेर पडले आहेत की त्यांनी इतरांना कोड्यात पाडलं आहे.

ती तरूणी चक्क असं म्हणते की, केवळ घरच्यांच्या म्हणण्यानुसार नवरा हा माझा लहानपणापासून जवळचा मित्र होता. आणि त्यामुळेच त्याच्याशी प्रेमविवाह झाला परंतु माझं त्याच्यावर प्रेम कधीही नव्हतं. तिच्या या अशा बोलण्याने अनेकांना ही बाब प्रचंड हैराणीची वाटत आहे. ती तरूणी आता म्हणते आहे की, आयुष्यात असे काही क्षण जगायला येत आहेत की मला माझं खोट आयुष्य जगायचं नको वाटतं आहे.

स्वत:चा तिरस्कार आणि हे सारंकाही खोट वाटू लागलं आहे. या तरूणीला आता एक प्रश्न सतावू लागल्याने ती आता आपल्या या प्रेमविवाहाबाबत कबुली देते आहे. तिचं म्हणणं आहे की, मी आर्थिकरित्या स्वतंत्रपणे जगू शकत असताना जिथे प्रेम नाही ते जिणं मी का जगावं? जेव्हा केव्हा एखादे नाते जोडले जात असते तेव्हा त्यात विश्वास ही गोष्ट फारच महत्वाची भुमिका बजावते. परंतु लग्नाच्या बाबतीत त्यापुढेही जाऊन काही गोष्टी येतात.

सध्या एका प्रसिद्ध डॉक्टर असलेल्या डॉ. इशिता यांना एका महिलेने आपल्या आयुष्यातील त्या प्रेमविवाहावर उत्तर विचारलं आहे की तुम्ही मला काय सल्ला द्याल? यावर डॉक्टर इशिताजी यांनी एक समर्पक गोष्ट सांगितली आहे. ती म्हणजे, लग्न तेव्हाच करावं जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना खंबीरपणे पाठींबा देण्याची तयारी ठेवत असतील. त्यासोबत आपल्या जोडीदाराचा त्याच्या स्वभावासोबत स्वीकार करता यायला हवा.

आपल्या जोडीदाराच्या वैयक्तिक बाबी, त्याच सामर्थ्य, त्याचे गुणदोष हे सारकाही आपल्याला पचवता येणं गरजेच आहे. या सर्व गोष्टींच प्रमाण सांभाळून पुढेच मग लग्नाच्या पुढील कुटूंबाच्या प्लॅनिंगवर विचार करण्यात यावा. आणि याच प्रकारे एक आवश्यक असं लग्नाचं नातं आपण तडीस नेऊ शकतो.

या अशा पद्धतीने जर आपली व आपल्या जोडीदाराची गोष्ट नीट जमत नसेल काही केल्या वादंग निर्माण होत असतील किंवा फार प्रमाणात विविध गोष्टींमुळे सं-शय निर्माण होत असतील तर शक्यतो आधी कन्सल्टंटकडे सल्ला घेऊन काही गोष्टी बदलून पहाव्यात. सोबतच कोणतीही दोन नाती ही केवळ प्रेमाच्याच आधारावर टिकतात असं नाही. नाती ही व्यभिचार, संयम, समजुतदारपणा, स्थिरपणा या सर्व बाबींवर अधिक दर्जेदार पद्धतीने टिकतात. बऱ्याचदा आधी प्रेम नसणाऱ्या नवरा बायकोंच्या जिवणात, सोबत जगत असताना जिव्हाळा नी प्रेमदेखील निर्माण होताना पहायला मिळतं.

मित्रांनो, प्रेम नसताना प्रेमविवाह करवून देण्यात येणं असं बोलणं याला काय म्हणायचं? आपण आपल्या बळावर कमाई करून जगू शकतो या विचाराने अनेक नाती आज तुटताना पहायला मिळतात यावर काय म्हणालं? प्रेम नसेल किंवा असेल नात्यांबाबत कोणती गोष्ट तुम्हाला मोलाची वाटते? आपली उत्तरे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद!