Breaking News

मराठीतील या अभिनेत्याची पत्नी आहे सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट मधील या उच्च पदावर

मराठी चित्रपट असो किंवा एखादे नाटक असो किंवा सिरीयल असो आपल्या उर्त्कृष्ठ भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे अभिनेते अजय पुरकर यांना तर आपण चांगलेच ओळखत असाल.

अजय पुरकर यांचा फर्जंद हा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला होता. या चित्रपटाला खूपच पसंती मिळाली होती. या चित्रपटामध्ये कोंडाजीचा मामा म्हणजेच मोत्याजी मामा रवळेकर यांच्या मुख्य भूमिकेमध्ये अभिनेते अजय पुरकर यांना पाहिले गेले होते.

गनिमिकाव्यामधील एक उत्कृष्ठ योद्धा आणि एक अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या मोहिमेची सर्व जबाबदारी त्यांच्याकडेच सोपवली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाची आपल्याला नक्कीच प्रचीती येते.

अजय पुरकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण सेठ दगडुराम कटारिया हायस्कुल येथून पूर्ण केले तर पुढील शिक्षण त्यांनी पुण्यातील गरवारे कॉलेजमधून घेतले होते.

ढाई अक्षर प्रेम के, प्रेमाची गोष्ट, संघर्ष, कोडमंत्र या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी आपल्या उत्कृष्ठ अभिनयाची चुणूक दाखवली आहेत.

दर्शकांनीदेखील त्याच्या अभिनयाला चांगलीच दाद दिली होती. टीव्हीवरील अनेक सिरियल्समध्ये देखील त्यांनी विशेष भूमिका साकारल्या आहेत. पु. लं. देशपांडे यांच्यावर आधारित नाटक भाई व्यक्ती की वल्ली मध्ये देखील त्यांनी उत्कृष्ठ साभिनय साकारून दर्शकांची मने जिंकली आहेत.

फक्त मराठीच नाही तर हिंदी इंडस्ट्रीमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. अजय पुरकर हे एक अभिनेतेच नाहीत तर ते एक उत्कृष्ठ गायकदेखील आहेत.

स्वरविलास या शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत कार्यक्रमामध्ये देखील त्यांनी आपली हि कला सादर केली आहे. त्याचबरोबर विं दा करंदीकर यांच्या कवितांचे सादरीकरण करण्याचे काम देखील त्यांनी केले आहे. फर्जंद चित्रपटामधील मल्हारी हे गाणे त्यांच्या आवाजामध्ये स्वरबद्ध करण्यात आले आहे.

अजय पुरकर यांच्या पत्नीचे नाव मेधा पुरकर असे आहे. मेधा पूरकर या फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहणेच जास्त पसंत करतात.

पुण्याच्या सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट मध्ये त्या एका उच्च पदावर काम करतात. विदेशी आणि भारतीय भाषा विभागाच्या त्या हेड म्हणून सर्व कार्यभार सांभाळत असतात.

सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांना नेहमी वेगवेगळी माहिती मिळावी यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील राहतात. अजय आणि मेधा पुरकर यांना एक मुलगीसुद्धा आहे.

About admin

Check Also

“लगिर झालं जी” फेम नितीश चव्हाण म्हणजेच आपला लाडका फौजी आज्या, आहे या मराठमोळ्या अभिनेत्रींच्या प्रेमात….

लागीर झालं जी या फौजीच्या व त्याच्या परिवाराच्या जीवनावर आधारित असेलेल्या मालिकेला आज कोण ओळखत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *