मांत्रिकाने ’तुमच्या मुलीच्या अंगात भूत शिरलय‘ सांगून घरी बोलवले आणि मग …

Daily News

महाराष्ट्रात अनेक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना नगर शहरात समोर आली आहे.लहान अल्पवयीन मुलीच्याअंगामध्ये  भूत असल्याचे सांगत हे भूत बाहेर काढण्यासाठी महिला मांत्रिकासोबत आणखीन दोन जणांनी मुलीच्या कुटुंबीयांकडून तब्बल आठ हजार रुपये घेतले आणि हे पैसे परत त्यांनी परत मागितले असता तीन जणांनी या कुटुंबीयांना मा-रहाण देखील केली.

शहरातील वैदुवाडी याठिकाणी 18 नोव्हेंबरला ही घटना घडली आहे. उपलब्ध माहितीनुसार, पंधरा वर्षे पीडित मुलीने झालेल्या प्रकाराबद्दल 7 डिसेंबरला तो-फखाना पोलीस ठाण्यात तक्रार  दिली असून अविनाश धनगर, आरती अविनाश धनगर यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात मा-रहाण तसेच अं-धश्रद्धा निर्मूलन का-यद्याअंतर्गत गु-न्हा दा-खल करण्यात आला आहे.

वैदूवाडी येथील एक मुलगी वारंवार फा-शी घेण्याचा प्रयत्न करत होती म्हणून तिच्यावर उ-पचार करण्याच्या उद्देशाने तिची आई तिला आरती धनगर हिच्या घरी घेऊन गेली त्यावेळी आरती हिने ‘ तुमच्या मुलीला भूत लागले आहे ‘ असे सांगून त्यांना दुसऱ्या दिवशी उपचारासाठी बोलावले.

सदर मुलीला तिन्ही आरोपींनी होम तयार करून त्याच्या समोर बसवले त्यावेळी तिथे एक कोंबडा देखील का-पण्यात आला तसेच तुमच्या मुलीच्या अंगात फा-शी घेऊन मेलेल्या एका मुलीचे भूत आहे ते आता राहिलेले नाही. आम्ही जा-दूटोणा करून ते भू-त पळून लावलेले आहे, असे सांगत मुलीच्या परिवाराकडून आठ हजार रुपये घेतले.

अं-धश्रद्धा असल्याचे भासवत फ-सवून पैसे घेतल्याने ते पैसे मागितले तेव्हा आरोपींनी मुलीच्या कुटुंबीयांना मा-रहाण केली असे फि-र्यादीत म्हटले आहे. तो-फखाना पोलिसांनी अविनाश व आरती धनगर यांना अ-टक केली केली होती.

माहितीनुसार, वैदूवाडी परिसरात एका मुलीने काही दिवसापूर्वी आ-त्मह-त्या केली होती. तिच्या या आ-त्मह-त्येच्या घटनेनंतर परिसरातील एका व्यक्तीचा हृद-यविकाराने मृ त्यू झाला तर परिसरातील एका अल्पवयीन मुलीने देखील आ-त्मह-त्येचा प्रयत्न केला त्यामुळे या सर्व प्रकारामागे त्या मयत मुलीचे भूतच आहे अशी अफवा परिसरात पसरली.

परिसरातील नागरिकांचा अशा प्रकारावर विश्वास झटकन बसला आणि आ-त्मह-त्येचा प्रयत्न केलेल्या या मुलीमध्ये तिचेच भूत शिरले आहे या अं-धश्र-द्धेतून पुढील प्रकार घडला.

तर मित्रांनो आजकालच्या बदलत्या विज्ञानाच्या जगात अजूनही आपण अश्या मांत्रिक बाबांवर विश्वास ठेवणे योग्य आहे का ??. तुम्हाला काय वाटते कॉमेंट करून नक्की कळवा .