महिला नारळ का फोडत नाहीत – जाणून घ्या ह्यामागील हे खरे कारण..

Astrology

हिंदू ध-र्मातील एक अत्यंत शुभ फळ म्हणून नारळ मानले जाते, बऱ्याचदा लोकांना कोणत्याही कामाची सुरवात करायची असेल तर प्रथम नारळ फोडून त्या कामाची सुरवात केली जात.

नारळ हे श्रीफळ म्हणून ओळखले जाते. जेव्हा भगवान विष्णुने पृथ्वीवर अवतार घेतला होता तेव्हा त्यांनी आपल्यासोबत तीन गोष्टी लक्ष्मी, नारळ आणि कामधेनु आणले होते.

श्री म्हणजे लक्ष्मी याचाच अर्थ नारळ हे लक्ष्मी आणि विष्णुचे फळ म्हणजे श्रीफळ आहे. नारळ मध्ये ब्रह्मा, विष्णु आणि महेशचा वास असल्याचे मानले जाते. श्रीफळ भगवान शिवकचे सर्वात प्रिय फळ आहे. मान्यतेनुसार, नारळामध्ये तीन डोळे त्रिदेव म्हणून पाहिले जाते. नारळ खाण्यामुळे श रीराची कमजोरी दूर केली जाते.

कुलदेवतेला नारळ अर्पण केल्यामुळे धनाची स मस्या संपते. भारतीय पूजेच्या पद्धतीमध्ये नारळ म्हणजेच एक महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय पद्धतीमध्ये स्त्रिया कधीच नारळ फोडत नाहीत. एखादी महिला मंदिरात किंवा मंदिराच्या बाहेर पूजा करीत असताना इकडे-तिकडे पाहत असते.

अशावेळी लाहन मुलगा, युवक किंवा पुरुष जाताना दिसला तर ती त्याला नारळ फोडून देण्याची विनंती करते. पुजेनंतर हेच नारळ फोडून सर्वांना प्रसाद म्हणून दिला जातो. मात्र, हे नारळ स्त्री कधीच फोडत नाही. मात्र, स्त्री नारळ का फोडत नाही, हे अनेकांना माहिती नाही. चला तर जाणून घेऊन या मागील कारण.

नारळ हे एक बीज स्वरुपात असते, म्हणून ते एक प्रजनन उत्पादन घटक मानले जाते. हेच यामागील एक प्रमख कारण आहे की नारळ हे बीजरूपी असल्यामुळे प्रजनन क्षमतेशी जुळलेले आहे.

महिला बीजरूपातच बाळाला जन्म घालतात. अगदी त्याच्याशी नारळाचा संबंध आहे. म्हणूनच हिंदू धर्म शास्त्रानुसार स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाही. किंबहुना स्त्रियांनी नारळ फोडणे हे हिंदू शास्त्रांमध्ये अशुभ मानले जाते.

शास्त्रानुसार स्त्रियांनी नारळ फोडणे हे अशुभ मानले जाते. यामागे एक कथा ही अशी प्रचलित आहे की, जे ब्रह्मऋषी विश्‍वमित्र होते त्यांनी या विश्‍वाची निर्मिती केली. मात्र, हे विश्‍व निर्माण करण्यापूर्वीच ब्रह्मऋषी विश्‍वमित्र यांनी नारळाची निर्मिती केली होती. म्हणूनच या नारळाला मानवाचे प्रतिरूप मानले जाते.

नारळाच्या ताज्या पाण्याचा त्वरित उपयोग केला पाहिजे. नारळाच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळला असता नारळाच्या पाण्यामध्ये असणारी सी जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघते. नारळाचे पाणी मूत्रगामी असल्याने सर्व प्रकारच्या मूत्रविकारात व मूतखड्यामध्ये ते अत्यंत गुणकारी आहे.

नारळाचे पाणी त्वचारोगावरही उपयुक्‍त असते तसेच अशक्‍तपणात ते सलाईनसारखे काम करते. नारळपाणी मध्ये पोटॅशियम आणि क्लोरीन आहे. जे मातेच्या दुधासारखेच आहे. दूध पचन न होणाऱ्या बाळांना दुधात नारळाचे पाणी घालून द्यावे. डि-हाइड्रेशन मध्ये नारळाचे पाणी हे अमृतासमान आहे.