लवंग खाल्ल्याने दूर होतात हे आजार, जाणून घ्या लवंग खाण्याचे गजब फायदे…

Helth

लवंग औषधी गुणांनी परिपूर्ण असते आणि याचा उपयोग अनेक रोगांवर केला जाऊ शकतो. आपण लवंगाचे सेवन अनेक प्रकारे करू शकतो. काही लोक लवंग भाजीमध्ये घालून खातात.

तर काही लोक भात बनवताना याचा उपयोग करतात. लवंगाचा स्वाद तिखट असतो आणि याचा खूप तेज वास येतो. लवंग गरम स्वभावाची असते यासाठी जेवण बनवताना एक किंवा दोन लवंगचा वापर करावा.

लवंगमध्ये असलेले अनेक गुणधर्म आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करते आणि याचे सेवन केल्यास शरीर निरोगी बनते. लवंग आरोग्याशिवाय त्वचेसाठी सुद्धा गुणकारी मानली जाते आणि हि चेहऱ्यावर लावल्याने त्वचे संबंधी अनेक समस्या दूर होतात.

आरो ग्यासंबंधी लवंगाचे फायदे

पोटामध्ये गॅस बनू देत नाही

पोटामध्ये गॅसची समस्या झाल्यास लवंगाचे सेवन करावे. लवंग खाल्ल्याने गॅस दूर होईल. गॅस बरोबरच बद्धकोष्ठता सुधारण्यासाठी देखील लवंग मदत करते. गॅस आणि बद्धकोष्ठता झाल्यास एक ग्लास गरम पाणी घ्या आणि या पाण्यामध्ये लवंगाच्या तेलाचा एक थेंब टाका.

हे पाणी पिल्यास गॅस आणि बद्धकोष्ठता पासून आराम मिळेल. जर तुम्हाला हे लवंगाचे पाणी प्यायचे नसेल तर भाजी बनवताना त्यामध्ये दोन लवंग घालावे.

तोंडाची दुर्गंधी दूर करते

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लवंगाचे पाणी खूप प्रभावी सिद्ध होते. तोंडातून दुर्गंधी येत असल्यास एक ग्लास पाण्यामध्ये चार लवंग बारीक करून घालाव्या. हे पाणी चांगले उकळून घ्यावे.

जेव्हा हे पाणी थंड होईल तेव्हा या पाण्याने गुळण्या कराव्यात. लवंगाच्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडातून दुर्गंधी येणे बंद होईल. तुम्ही सतत हा उपाय एक आठवडा करावा. लवंगाच्या पाण्याने गुळण्या करण्याशिवाय तुम्हाला हवे असेल तर एक लवंग देखील खाऊ शकता.

दातदुखी दूर करते

दातदुखी दूर करण्यासाठी लवंगाचे तेल खूप फायदेशीर ठरते. दातदुखी होत असेल तर लवंगाचे तेल लावावे. कापसामध्ये थोडे लवंगाचे तेल लावून हा कापूस दातावर ठेवावा आणि १० मिनिटे हा कापूस दातावर राहू द्यावा.

दिवसातून दोन वेळा हे तेल दातावर लावल्याने दातदुखीपासून पूर्णपणे आराम मिळेल. दातदुखी दूर करण्याशिवाय हे तेल हिरड्यावरील कीड देखील नाहीशी करते.

चेहऱ्यासंबंधी लवंगाचे फायदे

डार्क सर्कल कमी करते

डार्क सर्कल झाले असतील तर लवंगाचे फेस पॅक त्यावर लावावे. लवंगाचे फेस पॅक डार्क सर्कलवर लावल्याने डार्क सर्कल कमी होऊ लागतात. एक चमचा बेसनामध्ये थोडे लवंगाचे पावडर आणि गुलाब जल मिसळावे. हे फेस पॅक डार्क सर्कलवर लावावे. लवंगाचे हे फेस पॅक आठवड्यातून दोनवेळा लावावे.

काळे डाग दूर करते

चेहऱ्यावर काले डाग असतील तर लवंगाचे फेस पॅक लावणे खूप उत्तम ठरते. लवंगाचे फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यास डाग हलके पडतात आणि नंतर गायब होतात. लवंगाचे फेस पॅक तयार करण्यासाठी लवंगाचे पावडर आणि थोडी मुलतानी माती आणि पाणी एकत्र करावे. चेहऱ्यावर जिथे डाग आहेत तिथे हे फेस पॅक लावावे. डाग दूर होतील.

केस गळणे बंद होते

केस गळत असतील तर लवंगाच्या पाण्याने केस धुवावेत. असे केल्याने केस मजबूत होतात आणि केस गळणे बंद होते. त्याचबरोबर केसांचा कोरडेपणादेखील दूर होतो.