विराट कोहली आणि अनुष्का शर्मा देशातील एक असे कपल आहे ज्यांच्याबद्दल सर्वात जास्त चर्चा होत असते. आणि का नाही होणार शेवटी ते देशातील लोकप्रिय हस्तींपैकी एक आहेत.
हे कपल या वर्षाच्या सुरवातीपासूनच नेहमीच चर्चेमध्ये राहिले आहे. हे कपल आपले फोटो सर्वांसोबत शेयर करण्यात आणि भेटण्यास कधी संकोच करत नाही.
विराट कोहली जो सध्या क्रिकेटच्या जगतातील एक महान खेळाडूपैकी एक आहे तर अनुष्का शर्मा बॉलीवूडमधील सर्वात उत्कृष्ठ अभिनेत्रींपैकी एक आहे. आणि हे दोघे देशातील सर्वात सुंदर आणि मनमोहक कपल दिसतात.
एका टीव्ही जाहिरातीमध्ये काम करताना हे दोघे पहिल्यांदा २०१३ मध्ये भेटले होते. यानंतर दोघेही खूपच चांगले मित्र बनले आणि वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट केले गेले. अल्पावधीतच या दोघांनी एकमेकांना डेट केल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या होत्या.
मात्र आपले संबंध मिडियापासून दूर ठेवत असताना या दोघांना नेहमी वादामध्ये ओढले गेले. तरीही या दोघांचे नाते यशस्वी राहिले आणि अखर ११ डिसेंबर २०१७ रोजी त्यांनी इटलीमध्ये लग्न केले.
मात्र अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या अचानक लग्नामुळे सर्वच हैराण झाले. कारण दोघांनी अशा वेळी लग्न करण्याचा निर्णय घेतला ज्यावेळी अनुष्का आपल्या करियरच्या शिखरावर होती आणि विराट मैदानामध्ये धावांची बरसात करत होता.
भलेहि दोघांच्या लग्नाला तीन वर्षे लोटली आहेत तरीही लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे कि अनुष्काने इतक्या लवकर लग्न का केले? वास्तविक दोघांनी २०१७ मध्ये लग्न केले होते आणि त्यावेळी अनुष्का शर्मा २९ वर्षांची होती.
या प्रश्नाचे उत्तर देताना अनुष्काने सांगितले कि, होय मी लग्न करू इच्छित होते. मला एक कुटुंब बनवायचे होते. भले हि मी एक अभिनेत्री आहे पण मी एक सरळ आणि सामान्य महिला आहे आणि मी नेहमीच एक साधारण जीवन जगले आहे.
माझे मानणे होते कि माझे लग्न तेव्हाच होईल जेव्हा मी यासाठी मानसिकरित्या तयार असेल. आजही आमची ऑडियंस जास्त बदलेली नाही. ऑडियंस कलाकारांना फक्त पडद्यावर बघू इच्छिते त्यांना वैयक्तिक जीवनाशी काही खास देणेघेणे नसते.
ऑडियंसला फरक पडत नाही कि कलाकाराचे लग्न झाले आहे का नाही. होय मी वयाच्या २९ व्या वर्षी लग्न केले, जे बॉलीवूडमध्ये खूपच कमी पाहायला मिळते कि कोणतीही अभिनेत्री इतक्या कमी वयामध्ये लग्न करेल. परंतु मी असे यामुळे केले कारण मला विराटवर प्रेम झाले होते.
अनुष्का पुढे म्हणाली कि, जेव्हा मी या नात्यामध्ये होते, तेव्हा मी माझ्या करियरच्या चांगल्या काळामधून जात होते. माझे त्या चित्रपटांसाठी कौतुक होत होते जे मी करत होते. पण अचानक लोक माझ्या नात्याबद्दल बोलू लागले. मला वाटते हे नेहमी मुलींच्यासोबतच होत असते.
अनुष्का शर्माने जीरो चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटामध्ये काम केलेले नाही आणि कोणतीही नवीन चित्रपटाची अनाउंसमेंट सुद्धा केलेली नाही. जीरो चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आणि यानंतर अनुष्काला कोणतेहि काम नव्हते.
तथापि काही दिवसांपूर्वीच अशा बातम्या समोर आल्या होत्या कि ती कोणत्यातरी महिला क्रिकेटरच्या बायोपिकवर अनुष्का काम करत आहे पण आतापर्यंत त्याची अधिकृत घोषणा झाली नाही आणि कोणतेही कंफर्मेशन केले गेले नाही.