लग्नानंतर आठ वर्षांनी करिनाने उघड केले ते रहस्य, बोलली ह्या कारणामुळे करावे लागले सैफ सोबत लग्न…

Bollywood Entertenment

तुम्हाला माहितीच आहे, की सैफ अली खान आणि करीना कपूर हे बॉलिवूडमधील सगळ्यात प्रसिद्ध जोडपे आहे. हे दोघे १६ ऑक्टोबर २०१६ मध्ये  विवाह बंधनात अडकले. आता त्यांच्या लग्नाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. आपल्या वैवाहिक आयुष्यात हे दोघे खूप सुखी आहेत.

तसेच या दोघांचे पहिले अपत्य म्हणजे तैमूर अली खान हा देखील स्टार किड्स मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की या दोघांच्या वयामध्ये अंतर आहे, म्हणजेच करीना ही सैफपेक्षा १० वर्षांनी लहान आहे. पण या गोष्टीमुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात काहीही फरक पडला नाही, ते एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात.

करीनाचे लग्न सैफसोबत व्हावे असे चाहत्यांना वाटत नव्हते:- सैफचे एक लग्न झालेले होते, अमृता सिंग बरोबर. आता सैफचे हे करीनासोबतचे दुसरे लग्न होते. त्याचा अमृता सिंगपासून घटस्फोट घेऊन झाला होता. त्यामुळे करीनाने एका घट स्फो टीत माणसाशी लग्न करावे अशी तिच्या चाहत्यांची इच्छा नव्हती. करीनाने ही गोष्ट स्वत: कबूल केली होती, जेव्हा ती करण जौहरचा शो “कॉफी विथ करण” मध्ये आली होती.

या शोमध्ये तिच्या सोबत आणखी एक अभिनेत्री होती ती म्हणजे प्रियांका चोप्रा. करिनाने या शोमध्ये स्पष्टपणे सांगितले की जेव्हा तिने सैफसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा बर्‍याच लोकांनी तिला पुनर्विचार करण्याबद्दल सुचविले होते.

करीनाने दोन मुलांचे वडील असलेल्या सैफबरोबर लग्न का केले:- “कॉफी विथ करण” शोमध्ये करणने करिनाच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना उत्तर देताना करीनाने सांगितले की “जेव्हा मी सैफशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी माझी समजूत काढायचा प्रयत्न केला, की सैफला आधीच दोन मुले आहेत. तो घटस्फोटीत आहे. तुमचा लग्नाचा निर्णय पक्का आहे का?”

करीना पुढे म्हणाली, की त्यावेळी माझ्याकडे सर्व काही होते. माझ्या चित्रपटांना प्रसिद्धी मिळत होती.  पैसा त्याचबरोबर प्रसिद्धी सर्वकाही माझ्याकडे होते. पण “टशन” नावाच्या चित्रपटात काम करत असताना आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो आणि त्याचवेळी माझी सैफशी चांगल्या प्रकारे व खूप घट्ट मैत्री झाली होती.

मग आम्ही या मैत्रीला पुढे घेवून जाण्याचा विचार केला. सैफने तिला सांगितले होते की लग्न झाल्यावर तिला चित्रपटात काम करायची इछा असेल, तर ती करू शकते, त्याची काहीही आडकाठी नाही. त्याचा हाच समजूतदारपणा त्यावेळी मला खूप आवडला आणि आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्नामुळे करियर संपुष्टात येईल:- करीनाने स्पष्ट केले, की काही लोकांचे असे म्हणणे होते, की जर मी सैफबरोबर लग्न केले तर माझे करिअर संपेल. तेव्हा असे वाटले की प्रत्येकाचे म्हणणे ऐकणे म्हणजे गुन्हा आहे किंवा माझ्या लग्नाचा निर्णय हाच गुन्हा आहे. मग मात्र मी ठरविले हे करून पाहूया.

आमचे नाते आम्ही कधीही लपवले नाही:- या “कॉफी विथ करण” टॉक शोमध्ये करीना म्हणते, आमच्या आधीच्या काळात चित्रपटसृष्टीतील लोक आपले नाते लपवत असत, पण आम्ही तसे होऊ दिले नाही. आम्ही आमचे नाते उघड केले. पूर्वीच्या अभिनेत्री मात्र आपल्या नात्याबद्दल कोणाशीही काही बोलत नसत.

करीनाने वर्क फ्रंटबद्दल बोलताना म्हटले की तिने शेवटी अंग्रेजी मीडियम चित्रपटात काम केले होते. तिच्यासोबत अभिनेता इरफान खान, राधिका मदन आणि दीपक डोबरियाल मुख्य भूमिकेत होते. लग्नापूर्वी करीनाचा अक्षय कुमारसोबत  असलेला “गुड न्यूज”  हा चित्रपट आला होता.

करीना साधारण एक वर्षांत कमीत कमी दोन चित्रपट करते. लग्नाला आठ वर्षे झाली आहेत आणि ही अशी अभिनेत्री आहे, जिचे करीयर लग्नानंतर संपलेले नाही. आजकालच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये करीनाने आपला संपूर्ण वेळ आपल्या कुटुंबाला दिला आहे व ती मजेत कुटुंबाबरोबर वेळ घालवते  आहे.