बॉलीवूडमध्ये आपले करियर करताना अनेक संघर्ष वाट्याला येत असतात. बॉलीवूड फिल्मी जगतामध्येहि आपण अशा संघर्षकथा नेहमी ऐकत आलेलो आहोत.
नुकतेच एका दिग्गज अभिनेत्रीने आपल्या आयुष्यातील खडतर प्रवास आपल्या चाहत्यांसोबत शेयर केला आहे. त्यामुळे सर्वांनाच एक धक्का बसला आहे.
या बॉलीवूड अभिनेत्रीला एक स्ट्राँग लेडी आणि सिंगल वूमन म्हणून देखील ओळखले जाते. आम्ही कोणाबाबतीत बोलत आहोत हे एव्हाना आपल्याला समजलेच असेल. होय, आम्ही बोलत आहोत अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याबद्दल.
त्याकाळामध्ये नीना गुप्ताने लग्नाआधीच आई होण्याचा एक धाडसी निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे तिला चांगल्या वाईट परिणामांचा सामना करावा लागला. आता इतक्या वर्षानंतर नीनाने याबाबतीत एक मोठा खुलासा केला आहे.
नुकतेच मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान नीनाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक रहस्यांचा खुलासा केला आहे.
जर मला माझ्या वैयक्तिक आयुष्यामधील एखादी चूक सुधारायची संधी मिळाल्यास मी सर्वात आधी लग्नाआधीच आई होण्याची चूक सुधारण्याचा प्रयत्न करेन, असे नीना म्हणाली.
यामागच्या कारणाचा खुलासादेखील त्यांनी केला कि, प्रत्येक मुलाला आई-वडील या दोघांच्याही प्रेमाची तितकीच गरज असते. मी माझी मुलगी मासाबाशी वेळोवेळी प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे शेयर करत आले आहे.
मी एकही गोष्ट तिच्यापासून लपवलेली नाही. याच कारणामुळे माझ्या आणि तिच्या नात्यामध्ये कोणताही दुरावा आला नाही. पण तिच्याही वाट्याला तितकाच मोठा संघर्ष आला आहे, हे मला ठाऊक आहे.
नीना गुप्ताने आपल्या अभिनय करियरची सुरवात मालिकेद्वार सुरु केली होती. नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा अनेक चित्रपटांमध्ये ती आपल्याला पाहायला मिळाली. परंतु नीना तिच्या एका बोल्ड निर्णयामुळेच सर्वाधिक चर्चेमध्ये आली होती.
८० च्या दशकामध्ये त्यांच्या एका बोल्ड निर्णयामुळे ती प्रचंड चर्चेमध्ये आली होती. यासाठी तिच्यावर चाहत्यांकडून टीकेचा भडीमारदेखील करण्यात आला होता.
पण स्वताचे वेगळे विचार असलेल्या नीनाने जगाची पर्वा केली नाही आणि आपल्या निर्णयावर तिने अमलबजावणी केली. वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार आणि खेळाडू विवियन रिचर्ड्ससोबत तिने लग्न न करताच एका मुलीला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता. ८० च्या दशकामध्ये तिच्याद्वारे घेतलेला निर्णय हा खरोखरच क्रांतिकारी निर्णय होता.
आजही नीना तितकीच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसते. अलीकेडेच आपली साठी ओलांडल्यानंतरचे काही बोल्ड फोटो आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन शेयर करण्याचे धाडस त्या दाखवत असते.
आणि विशेष म्हणजे त्या म्हणतात कि, माझ्या बोल्ड फोटोवर लाखो कमेंट्सचा वर्षाव होतो, आणि मी देखील ते एन्जॉय करत असते.