बॉलीवूड म्हणजे एक मायानगरी आहे. इथे कधी काय घडेल काही सांगता येत नाही. बॉलीवूडमध्ये अश्या अनेक जोड्या आहेत ज्या नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात.
या जोड्यांचे नाते एवढे घट्ट आहेत कि कधीही त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला नाही. तरीही बऱ्याचवेळा असे सुद्धा घडले आहे कि अश्या अभिनेत्यांचे लग्नानंतरही लिंकअपच्या बातम्याने एक गरम माहोल तयार झाला होता.
बरेच असे कलाकार आहेत जे खुलेआम दुसऱ्या व्यक्तीबरोबर फ्लर्ट करताना पकडले गेले आहेत. चला तर मग बघुयात असे कोणकोणते कलाकार आहेत ज्यांचे लग्नानंतरही अफेयर असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
अजय देवगन
अजय देवगन बॉलीवूडमधील मोठ्या अभिनेत्यापैकी एक आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेत सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
अजय देवगन आणि काजोल बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडप्यांमधील एक जोडी आहे. मधल्या काळामध्ये अजय देवगन आणि कंगना रनौत यांच्या प्रेमसंबंधाबद्दल खूप चर्चा झाल्या होत्या. काही वेळा तर अजय देवगनला कंगना रनौतसोबत आपण पाहिले देखील असेल.
पण त्यांच्या या नात्याला कधी दुजोरा मिळाला नाही. मिडियाच्या माहितीनुसार अजय देवगनला काजोलने पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर अजय देवगन स्वतःला सावरत यातून बाहेर पडला. आणि त्याच्या वैवाहिक संबधाला कोणताही धोका पोहोचला नाही.
अक्षय कुमार
बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या अक्षय कुमारचे प्रेमाचे किस्से खूप गाजले होते. अक्षय कुमारचे लग्नाआधीही अनेक अभिनेत्रींच्या सोबत नाव जोडले गेले आहे. पण कधीही अक्षय कुमारने ते उघडपडे जाहीर केले नाही. त्यामुळे हे किस्से गुलदस्त्यातच राहिले.
ट्विंकल खन्नासोबत लग्न केल्यानंतर काही दिवसातच अक्षय कुमारचे नाव प्रियांका चोप्रासोबत जोडण्यात आले होते. मध्यंतरी बॉलीवूडमधील अनेक पार्टीमध्ये ते आपल्याला एकत्र पहावयास मिळाले होते.
याची बातमी जेव्हा ट्विंकलला लागली त्यावेळी त्यांच्या इथपर्यंत वाद झाले होते कि त्यांचे वैवाहिक सं बंध संपुष्टात येण्याची वेळ आली होती. असे म्हंटले जाते कि या आश्वासनावर अक्षयला माफ केले होते कि तो प्रियांकाशी कोणताही संपर्क करणार नाही किंवा तिच्याबरोबर कोणताही चित्रपट करणार नाही. त्यानंतर अक्षय कुमारच्या कोणत्याही अफेयरच्या बातम्या समोर आल्या नाहीत.
शाहरुख खान
बॉलीवूडचा बादशहा समजल्या शाहरुख खानचे सुद्धा अफेयरचे किस्से समोर आले होते. शाहरुख खान आणि गौरी खानचे नाते किती अतूट आहे हे आपल्याला माहितीच आहे.
दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे जगजाहीर आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा शाहरुख खानचे नाव प्रियंका चोप्राशी जोडण्यात आले होते. मधल्या काळामध्ये त्यांच्या अफेयरचे किस्से खूप व्हायरल झाले होते.
ज्यावेळी प्रियांका चोप्राला तिच्या माजी प्रीयकराबाद्द्ल विचारले होते त्यावेळी तिने एक लेदर जॅकेटकडे बोट केले होते. आणि ते जॅकेट शाहरुख खानचे होते. पण शाहरुख खान आणि गौरी खानमधील वाद जगासमोर कधी आले नाहीत.
अमिताभ बच्चन
बॉलीवूडचे शंहशाह अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे नाते तर सर्वश्रुत आहे. जया बच्चनसोबत अमिताभ बच्चनने लग्न केल्यानंतरहि दोघांच्या अफेयरच्या बातम्या समोर येत होत्या. पण जया बच्चनने काही कठोर पावले उचलल्यामुळे हे नाते संपुष्टात आले.
शत्रुघ्न सिन्हा
शॉटगन शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या प्रेमसंबंधाचे किस्सेतर त्यावेळी खूप गाजले होते. मिडिया रिपोर्ट्सनुसार शत्रुघ्नच्या पत्नी पूनम सिन्हा यांनी त्यांना खूपवेळा रंगेहात पकडले होते.