टीव्हीवरील सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या मालिकांमध्ये ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘कुंडली भाग्य’चा समावेश होतो. या मालिकांमध्ये प्रिताची भुमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे श्रध्दा आल्या होय. या भूमिकेमुळे श्रद्धाने प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. तिच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणात पसंत केली जाते.
झी टीव्हीच्या कुंडली भाग्य या हिंदी मालिकेद्वारे लोकप्रिय झालेली टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या ही टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. आर्याची सर्वोत्कृष्ट भव्य जीवनशैली जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कुंडली भाग्य या मालिकेत आर्याने प्रिताची भुमिका साकारली आहे. प्रीता एका गरीब कुटुंबातील मुलगी म्हणून दाखवण्यात आली आहे.पण खऱ्या आयुष्यात प्रीताची भूमिका करणारी श्रद्धा आर्या पूर्णपणे वेगळं आणि अलिशान आयुष्य जगते.
काही वर्षांपूर्वी सीरियलमध्ये करणशी लग्न करणाऱ्या प्रीताने २०२१ मध्ये खऱ्या आयुष्यात विवाह बं’धनात अडकली. श्रध्दा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तसेच सोशल मीडियावर श्रध्दाचे करोडो चाहते आहेत. श्रध्दाने सोशल मीडियावर पोस्ट केलेले फोटो लगेच व्हायरल होतात. श्रद्धाने लक्ष्मी तेरे आंगन की, तुम्हारी पाखी आणि ड्रीमगर्ल यासह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
इन्स्टाग्रामवर श्रद्धाचे खूप मजबूत फॅन फॉलोअर आहेत, ५ मिलियनहून अधिक जास्त लोक श्रद्धाला फॉलो करतात. या चित्रपटांशिवाय श्रद्धाने तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि पंबाजी चित्रपटांमध्येही काम केले आहे.मालिकांव्यतिरिक्त तिने निशब्द आणि पाठशाला यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
जेव्हा श्रध्दा १९ वर्षांची होती, तेव्हा तिचा तामिळ चित्रपट कलवानी कधली प्रदर्शित झाला होता. एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच, श्रद्धा ही एक चांगली विद्यार्थिनी देखील आहे, तिने तिचे शालेय शिक्षण दिल्लीच्या हंसराज मॉडेल स्कूल, दिल्ली कॉलेज ऑफ आर्ट्समधून केले आहे. कॉमर्स आणि कॉमर्समध्ये आणि त्यांनी मुंबईच्या कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
२००६पासूनच श्रद्धाने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती हे फार कमी लोकांना माहिती असेल. श्रध्दाच्या वैद्यकीय आयुष्या विषयी बोलायचे झाले, तर २०१५ मध्ये श्रद्धाची एनआरआय जयंतसोबत एंगेजमेंट झाली होती, मात्र जयंतला श्रद्धाच्या अभिनय कारकिर्दीवर आक्षेप होता, त्यामुळे दोघांनी एंगेजमेंटवर आपले नाते संपवले.
दरम्यान, अभिनेत्री श्रद्धा आर्या नुकतेच तिच्या आयुष्यात लग्नबं’धनात अडकली आहे. श्रध्दाचे लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तिने नौदल सेनेचा अधिकारी राहुल शर्मासोबत सात फेरे घेतले आहे. अशातच लग्नानंतर त्यांचे रिसेप्शन झाले आहे. दरम्यान त्यांच्या या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. जे पाहून चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा पाऊसच पाडला.