८ वर्षांत इतकी बदलली आहे टीव्ही हि छोटी कृष्ण, आता ओळखणे देखील आहे कठीण

Entertenment

तसे तर टीव्हीवर अनेक बालकलाकारांनी काम केले आहे, पण काही बालकलाकार असे आहेत ज्यांनी दर्शकांची मने जिंकली आहेत. या बालकलाकारांनी फक अक्टिंगचं नाही तर आपल्या निरागसतेमुळे देखील लोकांना वेडे केले. 

तुम्हाला बड़े अच्छे लगते हैं सिरीयल मधील पीहू तर माहितीच असेल. होय छोट्या आणि लाडक्या पीहूने आपल्या निरागसतेमुळे अनेकांची मने जिंकली होती.

अशी आणखी एक मुलगी होती जिने आपल्या अॅ क्टिंगने आपल्या सर्वांना मोहित केले होते. कलर्स टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या जय श्रीकृष्ण मध्ये एक छोटी मुलगी कृष्णची भूमिका साकारत होती.

या मुलीला पाहून असे वाटत होते कि हेच खरे बालपणीचे कृष्ण आहेत. हि सिरीयल दर्शकांना खूपच आवडली होती. आज आम्ही त्याच छोट्या मुलीबद्दल बोलत आहोत जिने या सिरीयलमध्ये श्री कृष्णची बालपणीची भूमिका साकारली होती.

श्रीकृष्णची भूमिका साकारणाऱ्या या छोट्या मुलीचे नाव धृति भाटिया असे आहे. या सिरीयल मध्ये काम केल्यानंतर धृति भाटिया पुन्हा टीव्हीवर कमीच पाहायला मिळाली.

परंतु आज आम्ही तुम्हाला धृति भाटियाचे काही लेटेस्ट फोटो दाखवणार आहोत ज्यामध्ये ती खूपच गोंडस आणि सुंदर दिसत आहे. तिचे हे नवीन फोटो पाहून नक्कीच तुम्ही तिचे फॅन बनाल.

जय श्रीकृष्ण शिवाय धृति काही सिरियल्स मध्ये पाहायला मिळाली. परंतु जितके प्रेम आणि प्रसिद्धी तिला कृष्णच्या भूमिकेमध्ये मिळाली तितकी इतर कोणत्याही सिरीयलमध्ये मिळाली नाही. याशिवाय ती इस प्यार को क्या नाम दूं आणि माता की चौकी सारख्या सिरीयल मध्ये सुद्धा पाहायला मिळाली.

या सिरियल्स शिवाय तिने काही कमर्शियल अॅतड्स देखील केल्या. एका मुलाखतीदरम्यान धृति म्हणाली कि जय श्रीकृष्ण मधील माझी भूमिका आणि हि सिरीयल मी कधीही विसरू शकत नाही.

तिने ती वेळ आठवली जेव्हा ती कशी अचानक देव बनत होती आणि लोक तिची खूपच रिस्पेक्ट करत होते. ऑफ स्क्रीन असो किंवा ऑन स्क्रीन लोक तिला बाळ गोपाळचा अवतार मानत होते.

सेट वर सर्व लोक तिला कन्हैया नावाने बोलवत होते आणि ती आपली शुटींग मजेत पूर्ण करत होती. इतक्या वर्षांमध्ये धृति आता खूपच मोठी झाली आहे आणि आता तिने आपले सर्व लक्ष शिक्षणावर केंद्रित केले आहे.

तिने आपल्या शिक्षणाचा आणि कामाचा व्यवस्थित समतोल राखला आहे. धृतिच्या नवीन फोटोमध्ये तिला ओळखणे खूप कठीण आहे परंतु या फोटोंमध्ये आजही ती तितकीच निरागस आणि सुंदर दिसते.