‘KGF 2’ ने आमिरच्या ‘दंगल’ च्या रेकॉर्डला केले भुईसपाट,5 दिवसात बनला सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ..

Bollywood Entertenment

मुंबईचा साऊथ सुपरस्टार यशचा KGF Chapter 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने केवळ 5 दिवसांत हिंदी पट्ट्यात 219 कोटींची कमाई केली आहे. पाचव्या दिवशी, KGF 2 ने हिंदी पट्ट्यात 25.57 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याच वेळी, सोमवारी चित्रपटाची कमाई भारतातील सर्व भाषांमध्ये सुमारे 47 कोटी झाली होती. यासोबतच, चित्रपटाने भारतात एकूण 427.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

या आकडेवारीसह KGF 2 ने दंगल, 2.0 आणि बाहुबली 2 चे रेकॉर्ड देखील मोडले आहेत. Koimoi.com च्या रिपोर्टनुसार असे समजले आहे की, आमिर खानच्या दंगल चित्रपटाने भारतात एकूण 387.39 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्याच वेळी, अक्षय कुमार आणि रजनीकांतच्या 2.0 चित्रपटाने भारतीच्या सर्व भाषांमध्ये 408 कोटींची कमाई केली आहे.

प्रभासच्या बाहुबलीने 418 कोटी रुपये कमवले होते. तर यशच्या KGF Chapter 2 या चित्रपटाने अवघ्या 5 दिवसांत 427.50 कोटींची कमाई करून या सर्व चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. KGF Chapter 2 ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. KGF Chapter 2 हा अजून काही दिवसांमध्ये त्याची कमाई सर्व चित्रपटाचे रेकॉर्ड मोडून टाकणार आहे.

आता KGF 2 समोर फक्त हे दोन चित्रपट :- भारतीय भाषांमध्ये कमाईच्या बाबतीत KGF चॅप्टर 2 च्या पुढे आता फक्त दोनच चित्रपट आहेत. यामध्ये बाहुबली 2 पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने 1031 कोटींचा व्यवसाय केला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर RRR आहे, ज्याने आतापर्यंत 747 कोटींची कमाई केली आहे. KGF 2 या दोघांच्या रेकॉर्डकडे वेगाने वाटचाल करत आहे. चित्रपटाची कमाई पाहता तो RRR चा रेकॉर्ड सहज मोडेल असे वाटत आहे.

KGF 2 चे कलेक्शन जगभरात 600 कोटींवर पोहोचले: – जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे तर KGF Chapter 2 ने जगभरात 600 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटासोबतच साऊथचा सुपरस्टार विजयचा बीस्ट हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता, पण KGF च्या वादळात बीस्ट कुठे हरवला हे कळले नाही. बीस्टचे जगभरातील कलेक्शन फक्त 150 कोटी इतके आहे.

KGF Chapter 2हा चित्रपट तुम्ही बघितला आहे का बघितल्यास कसा वाटला ? हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला कसा वाटला? हे आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.

Sagar Avhad

Sagar Avhad Writer and Editor at live36daily.com and he have more than 2 year experience in Writing and as Editor. Email : [email protected]

https://live36daily.com/