करोडो कमावल्यानंतरहि कंगाल झाले आहे हे स्टार्स, हे आहे त्यामागील सत्य….

Daily News

मनी मॅनेजमेंट करणे हे कोणाचेहि काम नसते. ज्याला चांगल्या प्रकारे आणि योग्यरीत्या मनी मॅनेजमेंट करणे माहित आहे त्याची संपत्ती नेहमी वाढतच राहते. पण ज्याला मनी मॅनेजमेंट करायला येत नाही त्याला कंगाल व्हायला वेळ लागत नाही.

आज आम्ही तुम्हाला काही अशा सेलेब्रिटीज बद्दल सांगणार आहोत जे योग्यरित्या मनी मॅनेजमेंट करू शकले नसल्यामुळे कंगाल झाले. तसे तर काही लोकांनी पुन्हा आपली गेलेली संपत्ती प्राप्त केली पण काही असे करण्यात अपयशी ठरले.

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चनची एकूण प्रॉपर्टी १९९९ मध्ये ६२.५२ करोड रुपये इतकी होती. तर त्यांचि सध्या एकूण संपत्ती २८८६.६६ करोड रुपये इतकी आहे.

जेव्हा अमिताभ बच्चन ५७ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये खूपच वाईट काळ आला होता. त्यांची अमिताभ बच्चन कॉरपोरेशन लिमिटेड जवळ जवळ ९० करोड लॉसमध्ये गेली.

त्यावेळी अमिताभ बच्चन जवळ कोणताही चित्रपट नव्हता किवा पैसे नव्हते. अमिताभ बच्चन एका खटल्यामध्ये देखील वाईटरित्या अडकले होते आणि त्यांच्या घरी नेहमी कर भरण्यासाठी नोटीसा येत होत्या.

अमिताभ बच्चनची कंपनी एबीसीएलने आपल्या क्षमतेपेक्षा अधिक खर्च करायला सुरु केला होता. जसे त्यांनी मिस वर्ल्ड एजेंट सारख्या आयोजनामध्ये आपले सर्व पैसे लावले होते.

यानंतर एबीसीएलने बँकेकडून कर्ज घेतले ज्यामध्ये ते डिफॉल्ट झाले. अमिताभ बच्चन रिटायर झाले होते आणि त्यांच्या जवळ कोणतेही इनकम किंवा सेविंग्स नव्हते.

ए के हंगल

ए के हंगलने नेहमी चरित्र भूमिका केल्या. त्यांनी २२५ हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटांमध्ये शोले, बावर्ची सारखे चित्रपट आहेत. ए के हंगलच्या एकूण संपत्तीची अधिक माहिती नाही. पण त्यांच्याजवळ खूप संपत्ती होती. ए के हंगलचा वाईट काळ २००७ सुरु झाला.

जेव्हा त्यांना काम मिळणे बंद झाले. २०१२ मध्ये ए के हंगल चा मृत्यू झाला. तेव्हापर्यंत ते खूपच गरीब परिस्थितीमध्ये पोहोचले होते. ए के हंगल ९८ वर्षे जिवंत राहिले यामुळे रिटायरमेंटमध्ये त्यांची सर्व बचत संपली. इनकमचे कोणतेही सोर्स नसल्यामुळे आणि उपचारासाठी होणाऱ्या खर्चांनी आर्थिक समस्या अधिक वाढवली.

विजय माल्या

२००७ मध्ये यूनाइटेड ब्रेवरीज ग्रुप चा चेयरमन विजय माल्याची एकूण प्रॉपर्टी ११५०० करोड रुपये होती. २०१६ मध्ये त्याचा वाईट काळ सुरु झाला. ज्यादिवशी १७ सरकारी बॅंकांच्या समूहाने ९००० करोड रुपये वसूल करण्यासाठी डेट रिकवरी ट्रिब्यूनल द्वारे नोटीस पाठवली.

तेव्हा माल्या भारतामधून फरार झाला होता. विजय माल्याने २००५ मध्ये किंगफिशर एयरलाइंस सुरु केली होती. जून २०१२ मध्ये हि कंपनी बंद झाली. हळू हळू याचे नुकसान वाढत गेले एयरलाइंसला चालवण्यासाठी माल्या सारखा कर्ज घेत राहिला. जे तो परत करू शकला नाही. त्याने आपली अलिशान लाईफसुद्धा चालू ठेवली.

निकोलस केज

निकोलस एके काळी हॉलीवूडमधील सर्वात जास्त कमाई करणारा अभिनेता होता. निकोलसची एकूण प्रॉपर्टी १०७५ करोड रुपये इतकी होती. पूर्ण जगामध्ये त्याची १५ घरे होती.

याशिवाय निकोलसजवळ अनेक लक्झरी कार आणि बर्यायच पुरातन वस्तू देखील होत्या. त्याचा वाईट काळ २००९ पासून सुरु झाला. जेव्हा त्याला नाईलाजाने १०० करोडचा कर भरावा लागला. कर भरण्यासाठी निकोलसला आपली काही प्रॉपर्टीसुद्धा विकावी लागली.

अति खर्च आणि महागडी लाइफस्टाइल निकोलसला खूपच भारी पडली. निकोलसने इन्वेस्टमेंटसाठी चुकीचे पर्याय निवडले. जसे त्याने डायनासोर स्कल, आईलैंड आणि कासल खरेदी केले.

माइक टायसन

वयाच्या २० व्या वर्षीच माइक टायसनने वर्ल्ड हेवीवेट बॉक्सिंग चँपियनशिप जिंकली. त्याची कमाई ४१९० करोड रुपये इतकी झाली होती. कंगालीच्या काळामध्ये माइक टायसनने टीव्ही शो, चित्रपट आणि पुस्तकांचा देखील सहारा घेतला.

सध्या माइक टायसनची एकूण प्रॉपर्टी फक्त २१ करोड रुपये राहिली आहे. २००३ मध्ये माइक टायसनने कोर्टामध्ये दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला होता. त्याच्यावर आईआरएस डिवोर्स लॉयर आणि पूर्व पत्नीचे १९३ करोड देणे होते. खूपच महागड्या लाइफस्टाइलमुळे आणि लक्झरी कारच्या आवडीमुळे तो पूर्णपणे कंगाल झाला. त्याच्याकडे ११० लक्झरी कार्स होत्या.