प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे समाजामध्ये चांगले आणि वाईट अशा दोन प्रकारच्या व्यक्ती असतात. बॉलीवूड मध्येही असेच आहे.
आपल्याला टीव्हीवर बॉलिवूडचे जीवन पाहून असे वाटते की त्यांचे जीवन खूप मजेशीर आहे. त्यांचे जीवन पाहून आपल्याला खूप आनंद होत असतो. परंतु बॉलीवूडमधील सेलिब्रिटींना त्यांच्या आयुष्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो.
हे सेलेब्रिटी जेव्हा एखाद्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांच्या फॅन्सची गर्दी त्यांच्याभोवती होत असते. बर्याच वेळा त्यांचे चाहते गर्दीचा फा-यदा घेतात आणि त्यांच्याबरोबर काहीतरी चुकीचे कृत्य करतात.
अशावेळी गर्दीमध्ये त्यांच्या फॅन्सच्या घा-णेरड्या गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांना गर्दीच्या वेळी त्यांच्या फॅन्सच्या घा-णेरड्या कृत्येचा सामना करावा लागला आहे. तर चला जाणून घेऊया नेमके काय घडले आहे.
दीपिका पादुकोण:- दीपिका पादुकोण आज बॉलीवूडमधील टॉपची अभिनेत्री आहे. पण तीसुद्धा अशा प्रसंगापासून वाचलेली नाही. २०१४ मध्ये गर्दीच्या ठिकाणी तिच्या चाहत्यांनी चुकीच्या पद्धतीने तीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता.
त्यावेळी दीपिका सिक्योरिटी गार्डच्या मदतीने तेथून बाहेर पडण्यात यशस्वी झाली. काही दिवसांपूर्वी एका रेस्टॉरंटच्या बाहेर दीपिका पादुकोणचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये दीपिका तिच्या गाडीतून उतरत असताना एक महिला तिची बॅग खेचत होती. मात्र तिच्या सिक्योरिटीने असे होऊ दिले नाही.
कॅटरिना कैफ:- बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफच्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. एकदा ती गर्दीत असताना तिच्याबरोबर अशाप्रकारची घटना घडली होती. २०१० मध्ये जेव्हा कॅटरिना चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती
त्यावेळी ती अचानक गर्दीमध्ये घेरली गेली त्यावेळी तिचे फॅन्स तिच्या श-रीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते पण त्याठिकाणी अभिनेता अक्षयकुमारने तीला या अ-त्याचारातून वाचवले. अक्षयकुमार आणि कॅटरिनाचा तीस मार खान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी घाटकोपरला गेले होते. हे सर्व सिटी मॉलमध्ये घडले.
सोनम कपूर:- अनिल कपूर यांची मुलगी आणि बॉलिवूडची फॅशन आयकॉन म्हणून फेमस असलेली सोनम कपूर सोबतसुद्धा अशीच एक घटना घडली आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात सोनमला अशा घटनांचा सामना करावा लागला आहे.
सोनम आणि धनुष हे दोघे रांझणा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चंदन सिनेमाला गेले होते. त्यावेळी तिच्यासोबत ही घटना घडली होती. त्यावेळी सोनमकडे पाहून सगळे फॅन्स भारावून गेले होते. सोनमच्या फॅन्सने इतकी गर्दी केली होती की तिच्या सिक्योरिटीलाही त्यांचा सामना करता आला नाही.
करीना कपूर खान:- बॉलिवूड अभिनेत्री सैफअली खानची पत्नी करीना कपूरची देखील अशाच एका गर्दीच्या ठिकाणी फसवणूक झाली होती. जेव्हा बजरंगी भाईजान या चित्रपटाचे प्रमोशन सुरु होते तेव्हा ही घटना घडली होती. तेव्हा करीना तिच्या फॅन्सच्या इतक्या गर्दीमध्ये सापडली होती की तीला त्या ठिकाणाहून हालतासुद्धा येत नव्हते.
सोनाक्षी सिन्हा:- बॉलिवूडमध्ये दबंग गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली सोनाक्षी सिन्हा अशाच एका ठिकाणी तिच्या फॅन्सच्या गर्दीमध्ये अडकली होती. सोनाक्षी जेव्हा वन्स अपॉन ए टाईम इन मुंबईच्या चित्रपट यशस्वी होण्सायाठी प्रार्थना करण्यासाठी अजमेर दर्गा येथे गेली होती तेव्हा त्या ठिकाणी ही घटना घडली होती.
या दरम्यान तिथे अक्षयकुमार देखील उपस्थित होता. यावेळी अनेक फॅन्सनी सोनाक्षीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अक्षयकुमारने चारी बाजूंनी आपल्या हाताने कवर करून सोनाक्षीला वाचवले.