बॉलिवूडमध्ये ड्रीम गर्ल म्हणून ओळखल्या जाणार्या हेमा मालिनीला सगळेच ओळखतात आजच्या काळात ती केवळ अभिनेत्रीच नव्हे तर राजकीय जगातही सक्रिय आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल असे काही सांगणार आहोत जे कदाचित तुम्हाला माहित नसेल.
वास्तविक आम्ही त्या वेळेबद्दल बोलतो जेव्हा हेमाने करिअरची सुरुवात केली होती आणि त्या काळातील ती सर्वात जास्त डिमांडिंग असणारी अभिनेत्री बनली होती ज्यामुळे तिचे डोके स्टारडमच्या नशेत होते परंतु आपणास माहित आहे की तिचा अभिमान मनोज कुमार यांनी मोडून काढला होता.
त्यावेळी एक अभिनेता होता जो देशभक्तीच्या रंगात रंगला होता आणि तो म्हणजे मनोज कुमार. एवढेच नव्हे तर मनोज कुमार एक असे अभिनेता आहेत ज्यांच्याकडे मुली नेहमीच अभिनयापेक्षा कमी त्यांच्या सौंदर्यामुळे जास्त आ कर्षित होत असत.
वास्तविक मनोज कुमार हा एक अत्यंत शांत प्रकारचे माणूस मानले जायचे. पण एकदा त्याने हेमा मालिनीसोबत असे काही केले की ती चिडली आणि त्यांच्यापसून दूर गेली.जेव्हा मनोजकुमार क्रांती चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते त्यावेळी हेमा मालिनीचीही निवड केली गेली होती पण शूटिंगच्या वेळी ती बर्याचदा नखरे करयाची प्रत्येक वेळी ती वेळचे कारण देवून फक्त एक तास शूट करत असे.
पण त्यावेळी तिने कमल अमरोही दिग्दर्शित रझिया सुल्तान हा चित्रपट साईन केला होता. एवढेच नाही तर ती क्रांती चित्रपटाकडे लक्ष देत नसे आणि रझिया सुल्तान हा चित्रपट तिला बरेच नाव आणि कीर्ती देईल असे तिला वाटत होते.
एकदा क्रांती चित्रपटाच्या शूटिंगवर ती उशीरा आली आणि थेट मनोजकुमार यांच्याकडे गेली आणि म्हणाली की त्यांनी 1 तासातच तिचे शूट करावे त्यानंतर ती निघून जाईल. अशा परिस्थितीत रागामुळे मनोजकुमारने हेमाकडे लक्षही दिले नाही आणि संध्याकाळपर्यंत तिला सेट वर बसवून ठेवले त्या दिवशी तीचे एकही शूट त्यांनी केले नाही.
ज्यामुळे हेमा मालिनी खूप चिडली आणि ती तेथून निघून गेली. कमल अमरोही यांना याबाबत तिने तक्रार दिली. पण जेव्हा मनोजकुमार यांना यामागचे कारण विचारले गेले तेव्हा ते म्हणाले की क्रांती चित्रपटावर सही केल्यानंतर तिने या चित्रपटाला डेट दिल्या आहेत मग ती दुसर्या फिल्मवर कशी जाऊ शकते. मग यानंतर हेमाला तिच्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला.
मनोज कुमार यांच्याकडे कलासृष्टीत मोठ्या अदबीनं पाहिलं जातं. अशा या कलाकारासोबतचा अमिताभ बच्चन यांचा किस्सा अनेकदा चर्चांच्या वर्तुळात पुनरिज्जिवीत केला जातो. असं म्हटलं जातं की चित्रपटांमध्ये वारंवार अपयश आल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी या कलाविश्वातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला होता.
तेव्हा खुद्द मनोज कुमार यांनी त्यांना थांबवलं आणि रोटी कपडा और मकान या चित्रपटात त्यांना संधी दिली. अमिताभ बच्चन या कलाविश्वात फार पुढचा पल्ला गाठणार हे त्यांनी फार आधीच हेरलं होतं.
मुख्य म्हणजे त्यांची ही पारखी नजर खरी ठरली आणि पाहता पाहता या कलाविश्वात अमिताभ बच्चन यांनी आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला. अशा या दुरदृष्टी असणाऱ्या अभिनेत्याला दादासाहेब फाळके पद्मश्री फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कार या आणि अशा बऱ्याच पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.