या जगामधून जेव्हा एक माणूस निघून जातो परंतु तेव्हा तो आपल्या कथांमधून सर्वांच्यामध्ये अमर राहतो. काही अशीच स्टोरी बॉलीवूडमधील हँडसम अभिनेता विनोद खन्नाची आहे.
जरी ते आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे बरेच चित्रपट आणि कथा आजही आपल्यासमोर आहेत. विनोद खन्नाने संघर्षातून ज्याप्रकारे अरबोंची प्रॉपर्टी कमावली ती कोणच्याही आवाक्यातील गोष्ट नाही.
अरबोंचे मालक विनोद खन्नाच्या जवळ कधी राहण्यासाठी घरदेखील नव्हते पण नंतर ते मर्सिडीजमध्ये फिरू लागले. पण हि कंगाली त्यांच्या अभिनेता बनण्यानंतर आली होती. चला तर जाणून घेऊया हे कसे घडले होते?
बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये विनोद खन्ना एक चर्चित नाव आहे आणि त्यांनी आपल्या करियरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची एक वेगळी फॅन्स फॉलोइंग राहिली आहे आणि त्यांना हि सफलता खूप मेहनत केल्यानंतर मिळाली.
चित्रपटांमधील सफलतेनंतर विनोद खन्नाने स्वतःसाठी मर्सिडीज कार खरेदी केली आणि असे म्हंटले जाते कि त्यांना कार्सची खूपच आवड होती. पण वेळ हि कधीही कोणासाठी एकसारखी नसती असे विनोद खन्नासोबत देखील झाले.
विनोद खन्नाने रामानंद सागरचा मुलगा निर्माता शांति सागरचा चित्रपट आखिरी डाकूच्या शुटींगदरम्यान आपली पहिली मर्सिडीज खरेदी केली होती. विनोद खन्नाने खूपच वेगाने सफलता मिळवली.
इतकेच नाही तर त्यावेळी लोकांना असे वाटत होते कि ते मोठ मोठ्या अभिनेत्यांना मागे टाकू शकतात. विनोद खन्ना खूपच शानदार आयुष्य जगत होते आणि ते मर्सिडीजशिवाय कोणत्याही गाडीत बसत नव्हते.
पण एक वेळ अशी सुद्धा आली होती कि त्यांना टॅक्सीने प्रवास करावा लागला होता. सफलतेच्या शिखरावर विनोद खन्नाच्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक गुरु आचार्य रजनीश (ओशो) सुद्धा आले, ज्यांचे संभोगापासून समाधीपर्यंतचे प्रवचन जगामध्ये खूप प्रचलित राहिले.
८० च्या दशकामध्ये जेव्हा त्यांचे करियर शिखरावर होते तेव्हा ते त्यांचे भक्त बनले होते. विनोद खन्ना दिवसरात्र रजनीशचे ऑडियो कॅसेट ऐकत असत आणि हे कॅसेट ते फक्त ऐकतच नव्हते तर दुसऱ्यांनादेखील ऐकण्यासाठी सांगत असत.
यादरम्यान त्यांनी मिडियाला बोलावले आणि फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय सांगितला. त्यावेळी त्यांनी विचार देखील केला नव्हता कि लाखो करोडो रुपये लावलेल्या निर्मात्यांचे काय होईल. एक दिवस ते सर्वकाही सोडून ओशोकडे अमेरिकेला गेले.
आपल्या आयुष्यातील ८ वर्षे विनोदने ओशोच्या बगिच्यामध्ये बागकाम करताना घालवले होते. नंतर त्यांना आयुष्यामध्ये अनेक कमतरता जाणवल्या तेव्हा ते मुंबईला परतले.
त्यांची पत्नी गीतांजलीने दोन्ही मुलांना एकटेच मोठे केले आणि त्यावेळी विनोद खन्नाजवळ राहण्यासाठी घर देखील नव्हते. सर्वकाही विकले गेले होते आणि त्यांच्याजवळ पैसे सुद्धा नव्हते.
त्यावेळी त्यांना मुकेश आणि महेश भट्टने मदत केली आणि नंतर हळू हळू त्यांना दुसऱ्या निर्मात्यांनी साईन करायला सूर केले. त्यांच्या घरामध्ये आध्यात्मिक गुरु रजनीशचे फोटो नेहमी पाहायला मिळत असत.
विनोद खन्नाने आपल्या करियरमध्ये अनेक चित्रपट केले पण यामध्ये मेरा गांव मेरा देश, अमर अकबर एन्थोनी, मुकद्दर का सिकंदर, कुर्बानी, दयावान, परवरिश, चांदनी, मेरे अपने, हेरा फेरी, फरिश्ते, खून-पसीना, इंकार, जुर्म, हाथ की सफाई, दबंग, वॉन्टेड, आन मिलो सजना, द बर्निंग ट्रेन, सच्चा-झूठा सारखे सुपरहिट चित्रपट दिले.
त्यांचा शेवटचा चित्रपट दिलवाले होता ज्यामध्ये त्यांनी शाहरुख खानच्या पित्याची भूमिका साकारली होती. २०१७ मध्ये त्यांचे कर्करोगाच्या आजारामुळे निधन झाले.