बॉलीवूडमध्ये असे अनेक किस्से आहेत जे ऐकल्यानंतर फिल्मी दुनियेमध्ये रस असणाऱ्यांना खूप आश्चर्य वाटते. असेच काही अभिनेत्री वहिदा रहमानसोबत सुद्धा झाले आहे जेव्हा त्या चित्रपटाचे शुटींग करत होत्या.
बॉलीवूडचे शहंशाह म्हणजेच अमिताभ बच्चन वहिदा रहमानचे खूप मोठे फॅन राहिले आहेत आणि एकदा जेव्हा त्यांना वहिदा रहमानच्या चित्रपटाचे शुटींग पाहण्याची संधी मिळाली तेव्हा एका सीनवेळी वहिदा रहमान उन्हामध्ये अनवाणी चालत होती.
आणि त्यांच्या पायाला चटके बसू लागले तेव्हा अमिताभ बच्चनने स्वतः त्यांना शूज घातले होते. चला जाणून घेऊयात बॉलीवूडचा हा मजेदार किस्सा.
बॉलीवूडमध्ये चौदहवीं का चांद नावाने फेमस अॅक्ट्रेस वहिदा रहमान खूपच सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ३ फेब्रुवारी १९३८ रोजी तामिळनाडूच्या चेंगलपट्टू येथे जन्मलेल्या वहीदा रहमानला बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्धी मिळाली.
वयाच्या ८३ व्या वर्षीदेखील वहिदा रहमानच्या चेहऱ्यावरील चमक सांगते कि त्यांच्या काळामध्ये त्या किती सुंदर होत्या.
सामान्य व्यक्तीच नाही तर स्वतः अमिताभ बच्चन देखील त्यांचे खूप मोठे फॅन आहेत. जेव्हा त्यांना विचारले गेले होते कि तुमचा फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वात फेवरेट कोण आहे तेव्हा त्यांनी दिलीप कुमार आणि वहीदा रहमान यांचे नाव घेतले होते आणि वहिदाच्या प्रती प्रेम जाहीर करताना म्हणाले कि, ते एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान वहिदा रहमानच्या मागे शूज घेऊन धावले होते.
अमिताभ बच्चनने स्वतः खुलासा करताना सांगितले कि, मी वहिदजींसोबत काम करण्यासाठी खूप तरसत होतो. मला हि सोनेरी संधी १९७१ मध्ये रेश्मा आणि शेरामध्ये चित्रपटामध्ये मिळाली.
वहिदा रहमानसोबत तो माझा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान एक असा सीन आला कि वहिदाजी आणि सुनील दत्त यांना मातीवर अनवाणी चालायचे होते. त्यावेळी गरमी खूपच होती आणि मातीवर चालायला खूप त्रास होत होता.
याच गोष्टीला पूर्ण करताना अमिताभ बच्चन पुढे म्हणाले कि, तिथे इतकी गरमी होती कि शूज घालून देखील चालायला समस्या येत होती. मग अनवाणी शुटींग करताना वहिदाजींना किती त्रास होत होता हे पाहिले. मग जेव्हा वहिदाजींनी शुटींग पूर्ण केले आणि दिग्दर्शकाने ब्रेक घ्यायला सांगितले.
तेव्हा मी वहिदाजींचे शूज घेतले आणि पळत जाऊन त्यांना ते घातले. मी नाही सांगू शकत कि तो क्षण माझ्यासाठी किती मोलाचा होता. वहिदा रहमान ६० च्या दशकातील महान हस्ती होती आणि त्यांची जोडी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अॅक्टर गुरुदत्त यांच्यासोबत चांगलीच जमत होती.
वहिदा रहमान आणि गुरुदत्त यांचे अफेयर देखील चांगलेच चर्चिले गेले होते आणि असे म्हंटले जाते कि वहिदाजींच्या यशामागे गुरुदत्त यांचा मोठा हात होता.
वहिदाने बॉलीवूडमध्ये प्यासा, कागज के फूल, चौदवीं का चांद, साहिब बीवी और गुलाम, गाइड, नील कमल, लम्हे, खामी, पत्तर के सनम, कूली, राम और श्याम, आदमी, बात एक रात की, चांदनी, डेल्ही-6, काला बाजार, मशाल, बीस साल बाद सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले आहे.