कपिल शर्मा शो हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो आहे. या कार्यक्रमाच्या मागच्या काही भागात खूप मजा आली. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्यावेळी कपिलच्या शो मध्ये आला होता. नवाजुद्दीन त्याच्या आगामी मोतीचूर चकनाचूर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये आला होता. नवाज सोबत या चित्रपटाची नायिका अथिया शेट्टी देखील सामील झाली होती.
यादरम्यान प्रत्येकाने त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी सं-बंधित गमतीदार किस्से सांगितले. अर्चना पूरन सिंग यांनी सांगितलेला त्यांचा मजेदार किस्सा ऐकून सर्वजण हसू लागले. अर्चनाने सांगितले एकदा तिला व तिच्या पतीला पोलिसांनी रात्री उशीरा कारमध्ये रो-मान्स करताना रंगेहात पकडले होते.
त्यावेळी रात्री जोरदार पाऊस पडत होता. अर्चनाला पावसात भिजायला खुप आवडते. त्यामुळे ती पती परमीत बरोबर भर पावसात लाँग ड्राईव्हवर गेली होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोमा-न्स करताना पकडले. पोलिसांना पाहून अर्चना व परमीत खुप घाबरले होते. त्यांनी आम्ही पती पत्नी आहोत असेही सांगितले त्यानंतर त्यानंतर खुप विनवणी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडले.
अर्चना म्हणाली आता हा किस्सा आठवून मला खुप हसू येते परंतु त्यावेळी मी खूप घाबरली होती. खरं तर हे खुप रि-स्की होते. तेव्हापासून आम्ही रात्री उशीरापर्यंत बाहेर फिरणे टाळतो. अभिनेत्री अर्चना पुरण सिंगला आपण नेहमीच हसताना आणि लहान लहान जोक्सचा आनंद लुटताना पाहत असतो.
पण त्यांच्या आयुष्यात एक काळ असा देखील आला होता जेव्हा त्यांचं प्रेम या गोष्टीवरून विश्वास पूर्णपणे उडाला होता. अर्चना यांचं लग्न फार कमी वयात असताना झाले आणि काही कारणास्तव हे लग्न टिकू शकलं नाही.
लग्नाविषयी त्यांनी एका मुलाखतीत म्हणाले की पहिल्या लग्नात अपयश मिळाल्यानंतर मला माझ्या आयुष्यात पुन्हा कोणतीच पुरुष व्यक्ती नको होती. मात्र परमीतला भेटल्यानंतर माझी विचारसरणी बदलली. पुरुषसुद्धा प्रेमळ काळजी घेणारे असू शकतात हे मला परमीतला भेटल्यावर समजले.
३० जून १९९२ साली या दोघांनी लग्न केले. आमच्या मुलांना ओळख मिळावी म्हणून आम्ही हे लग्न केले असे अर्चना सांगते. जवळपास चार वर्षे आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो. आमच्या लग्नाला फार लोकं हजर नव्हते. त्यामुळे लग्नानंतरही चार वर्षे आम्ही लोकांना सांगितलं नव्हतं की आमचं लग्न झालं आहे. कारण लग्न ही गोष्ट तेवढी महत्त्वाची वाटली नव्हती.
लग्न हे नात्याला दिलेलं एक नाव आहे. लिव्ह इनमध्ये आम्ही एकमेकांना तेवढीच साथ देत होतो. कदाचित आम्ही लग्न केलंही नसतं. पण आमच्या मुलांना ओळख मिळावी म्हणून लग्न करण्याचा निर्णय आम्ही त्यावेळी घेतला. आजही मी आणि परमीत एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत असं अर्चनाने सांगितले.
उत्तम अभिनय आणि कॉमेडीच्या जोरावर या अभिनेत्रीने आज प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. अलिकडेच अर्चनाने इन्स्टाग्राम लाइव्हवर येवून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी प्रेक्षकांच्या कमेंट वाचून ती त्यावर तीचे मत विचार आणि चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर देत होती.
त्यातच अनेकांनी तिला तिच्या वाढत्या वयावरुन ट्रोल करण्यास सुरुवात केली. प्रेक्षकांच्या या कमेंट वाचल्यानंतर अर्चना खूप इमोशनल झाली आणि तिने याविषयी तिचं मत मांडलं. ती म्हणाली की मी वयस्कर झाले असले तरीदेखील माझी मुलं आणि माझा नवरा माझ्यावर अजूनही तितकेच प्रेम करतो.