मराठी अभिनेत्रीचा भूतकाळ: चित्रपटाच्या बदल्यात निर्माता म्हणाला होता- ‘एक रात्र..

Bollywood

मराठी सिनेविश्वातला प्रसिद्ध चेहरा असलेली अभिनेत्री श्रुती मराठेने तिला आलेल्या का-स्टिंग काऊचचा किस्सा शेअर केला आहे. यात श्रुतीने चित्रपटाच्या ऑडिशन दरम्यान का-स्टिंग काउचला कसे बळी पडावे लागले याबद्दल एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे.

एका निर्मात्यानं मला वन नाइट स्टँडसाठी विचारलं अभिनेत्री व्हायचं असेल तर या तडजोडी कराव्या लागतात असं त्यानं मला सांगितलं मात्र मी त्याला सडेतोड उत्तर देत चित्रपटातून बाहेर पडली असं श्रुती म्हणाली.

का-स्टिंग काउचच्या घटनेबद्दल श्रुती म्हणाली:- एकदा एका निर्मात्याने मला मुख्य भूमिकेची ऑफर दिली. प्रथम तो प्रोफेशनल होता परंतु नंतर त्याने समझौता आणि वन नाईटसारखे शब्द बोलण्यास सुरवात केली.

श्रुतीने लिहिले – एका निर्मात्यानं चित्रपटासाठी शरीरसुखाची मागणी माझ्याकडे केली होती. चित्रपटात काम करायचं असेल तर अशा तडजोडी कराव्या लागतात असं तो मला म्हणाला पण जर अभिनेत्री होण्यासाठी मला एखाद्याची शय्यासोबत करावी लागणार असेल तर हिरो होण्यासाठी तुम्ही त्याला काय करायला सांगता? असा रोखठोक सवाल मी त्या निर्मात्याला विचारला होता. माझ्या बोचऱ्या सवालानं तोही स्तब्ध झाला होता.

श्रुती पुढे म्हणाली की मी इतरांना ही घटना सांगितली. यानंतर त्याला तो प्रोजेक्ट सोडायला सांगण्यात आलं. मला निर्भिड व्हायला फक्त १ मिनिट लागला. मी फक्त माझ्यासाठी उभी राहिली नाही तर मी त्या महिलांसाठी देखील  उभी राहिले ज्यांना सहज ज ज केलं जातं.

एवढंच बोलून श्रुती थांबली नाही. ती पुढे म्हणाली माझ्या कपड्यांवरून मी काय आहे हे कोणी ठरवू शकत नाही. माझं टॅलेंट मेहनत यश यावर मी कोण आहे हे कळतं. मला ठाम वाटतं की हीच योग्य वेळ आहे जेव्हा लोक या गोष्टीला समजतील.

श्रुतीने तिच्या पोस्टमध्ये प्रथमच स्क्रीनवर बि-किनी परिधान करण्याच्या अनुभवाचे वर्णन देखील केले. तिने सांगितले की माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मला साउथ मूव्हीमध्ये बि-किनी घालायला सांगितले गेले होते. मी दोनदा विचार न करता यास सहमती दर्शविली. माझ्या मनात बिकिनीचा प्रश्नच नव्हता.

मराठी मनोरंजन विश्वात काम करण्याबरोबच श्रुतीनं दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलं आहे. श्रुतीची रुपेरी पडद्यावरील मालिका गाजल्यानंतर एका दाक्षिणात्य चित्रपटातील तिचा बि-किनीचा फोटो व्हायरल झाला होता.

लोकांनी या फोटोवरून श्रुतीला मोठ्या प्रमाणत ट्रोल केलं होतं. श्रुतीनं तो अनुभवही मुलखातीत सांगितला. मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळत होती. मी क्षणाचाही विलंब न करता बि-किनी घालायला तयार झाली. मी कोणतेही प्रश्न तेव्हा त्यांना विचारले नाहीत.

मात्र नंतर याच फोटोवरून माझ्यावर टीका झाली. अशा प्रसंगामुळे तुम्ही मेहनतीनं कमावलेली प्रतिष्ठा मातीमोल होते असंही ती म्हणाली. मी जे काही आहे ते माझी मेहनत आणि माझ्या अभिनयामुळे कमावलं आहे ही गोष्ट आता प्रत्येकानं समजून घेतली पाहिजे असे तीने सांगितले.

सध्या श्रुती मराठेची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. श्रुतीचे चाहते या पोस्टसाठी तिचं भरभरून कौतुक करत आहेत. श्रुतीने टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. श्रुती ही मराठी चित्रपटसृष्टीची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. श्रुतीची मराठी इंडस्ट्रीमध्ये चांगली फॅन फॉलोइंग आहे. ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह देखील राहते.