ह्या आहे अमिताभ बच्चन यांच्या जीवनातील तीन सर्वात मोठ्या चुका ,ज्यांचा पच्छाताप त्यांना आजही आहे .

Bollywood

 बॉलिवूड मध्ये बिग बी या नावाने ओळखले जाणारे अमिताभ बच्चन हे नेहमी लोकांना चुकीचे करु नका असा सल्ला देत असतात पण आपणास माहिती आहे काय की त्यांनी देखील त्यांच्या आयुष्यात अशा अनेक नको त्या चुका केल्या आहेत ज्याचा त्यांना आज ही पश्चाताप वाटतो. होय हे सर्व खरे आहे अमिताभ बच्चन यांनी देखील आयुष्यात चुका केल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यालाही आपल्या बॉलीवूड करीयर बद्दल पश्चाताप वाटतो हे ऐकून तुम्हाला नवल वाटले असेल. बिग बी अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच स्वतःबद्दल बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या ज्यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांनीही काही असे चुकीचे निर्णय घेतले आहेत ज्याबद्दल आज ही त्यांना वाईट व दुखः वाटते.

१. ते राजकारणात उतरणे ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती:- राजकारणात येणे ही अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती हे अनेकदा ते स्वत: कबूल करताना दिसतात. अमिताभ भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सांगण्यानुसार राजकारणात उतरले होते.

वर्ष १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या नि धनानंतर राजीव गांधी आपल्या खास लोकांची एक टीम तयार करीत होते आणि त्यांना विरोधी पक्ष नेत्यांवि रूद्ध एक मोठा ताकदीचा उमेदवार उभे करण्याची गरज पडत होती ज्यामुळे विरोधक निवडणुकीतून पळ काढतील आणि कॉंग्रेस चा पराभव निश्चित करण्यासाठीचे सर्व मार्ग बंद होतील. अशा परिस्थितीत त्यांनी अलाहाबादमधून हेमवती नंदन यांच्या विरु द्ध  अमिताभचे नाव निवडले होते आणि त्यांना अपेक्षित निकाल देखील मिळाला होता. अमिताभ यांनी हेमवती नंदनला प्रचंड मतांनी पराभूत करून निवडणूक जिंकून दाखवली.

यानंतर अमिताभ एक अभिनेता तसेच नेता असे दोन्ही झाले. अमिताभ चित्रपट आणि राजकारण असे दोन्ही काम एकत्रितपणे करत होते. पण याच दिवसात अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपटही रिलीज झाले ज्यात मर्द चित्रपटाने खूप सुपरहि*ट झाला होता.

चित्रपटांमध्ये बीजी असल्यामुळे अमिताभ राजकारणापासून दूर दूर जात होते त्यांचे राजकारणाकडे दुर्लक्ष होत होते याचाच विरोधकांनी जोरदारपणे फा-यदा उठविला आणि पाणबुडी सारख्या घोटाळ्यांमध्ये अमिताभचे नाव त्यांनी ओढले. हा दबाव आणि हा आ*रोप अमिताभ सहन करू शकले नाही आणि त्यांनी राजकारणातून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला.

1984 मध्ये अलाहाबादमधून निवडणूक जिंकल्यानंतरही अमिताभनी तीन वर्षांत अलाहाबादच्या राजकीय परिस्थितीतून स्वताचे अवलोकन केले. याबद्दल जेव्हा अमिताभ यांना विचारले गेले तेव्हा त्यांचे म्हणाले की स रकारी विषयांमध्ये ते पूर्ण चुकीचे ठरत होते. त्यावेळी त्यांना समजले की राजकीय क्षेत्रात भावना पूर्णपणे वेग वेगळ्या आहेत. म्हणून त्यांनी राजकारणातून सन्या स घेण्याचा निर्णय घेतला.

टीव्ही मिडिया पत्रकारांशी भांडले होते:- वर्ष 1996 मध्ये मीडिया हाऊस सोबत अमिताभ बच्चन यांचे अनेक भांडण झाले होते. अगदी अमिताभ बच्चन यांनी स्टारडस्ट बंद करण्याचा प्रयत्न केला पण ते यात अयशस्वी ठरले. यानंतर मीडिया बरोबर मोठे भांडण झाल्यानंतर  अमिताभ यांना आणखीन अनेक मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले होते.

बूम आणि निशब्द या सारख्या अ*श्लील बी -ग्रे ड चित्रपटात काम करणे:- अमिताभ यांनी या सिनेमात काम करण्याच्या आधी अजिबात पुढचा विचार केला नाही परंतु ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरली.

या अ*श्लील पिक्चरमधील बिग बीच्या असामान्य सीन भारतीय प्रेक्षकांच्या मनाला काही पटले नाहीत. या चित्रपटतील अशा भूमीकेमुळे अमिताभ यांची असेलली एक आदर्श प्रतिमा खूप खराब झाली होती.

बी-ग्रेड चित्रपटात काम करून त्यांना बराच टीकेचा सामना करावा लागला आणि त्यांनी स्वत: ला असले चित्रपट का केले हे समजवू शकले नाहीत. आजही त्यांना या चित्रपटातील त्यांचे सीन्स बघून स्वताची लाज वाटते.